एकाच दिवसात विकले गेले जवळपास 2 अब्ज रुपयांचे रियलमी 3 फोन, शाओमीला फुटला घाम

रियलमी त्या निवडक ब्रँडस पैकी एक आहे​ ज्याने नेमकेच स्मार्टफोन बाजारात आणले आहेत, पण हे सर्व स्मार्टफोन ​सामान्य लोकांना आवडले आहेत ​रियलमी थोड्याच वेळात देशातील हिट ब्रँडस मध्ये सामील झाला आहे. साल 2019 मध्ये आपल्या पहिल्या स्मार्टफोनच्या स्वरूपात रियलमी ने रियलमी 3 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा फोन मार्चच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च झाला होता जो देशात 2 वेरिएंट्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. रियलमी कंपनी आपला हा नवीन स्मार्टफोन फ्लॅश सेल द्वारे विकत आहे. काल म्हणजे 12 मार्चला रियलमी 3 पहिल्यांदा फ्लॅश सेल साठी उपलब्ध झाला होता आणि पहिल्याच दिवशी या स्मार्टफोनने सेलचा असा रेकॉर्ड केला कि कंपनीने 2 अब्ज रुपयांच्या आसपास रियलमी 3 फोन विकले. हैराण होऊ नका तुम्ही बरोबर वाचले आहे काल एकाच दिवसात रियलमी ने जवळपास 2,00,00,00,000 रुपयांचे रियलमी 3 स्मार्टफोन विकले आहेत.

एकाच दिवशी दोन फ्लॅश सेल
काल म्हणजे 12 मार्चला दुपारी 12 वाजता रियलमी 3 चा पहिला फ्लॅश सेल सुरु झाला होता. हा सेल रियलमीच्या अधिकृत वेबसाइटव्यतिरिक्त फक्त फ्लिपकार्ट वरच आयोजित झाला होता. पहिल्या फ्लॅश सेल मध्ये रियलमी 3 विकत घेणाऱ्यांची इतकी गर्दी झाली कि काही मिनिटांत या फोनचा स्टॉक आउट पण झाला होता. कंपनीचा दावा आहे कि काही मिनिटांत रियलमी 3 चे 1.5 लाखांपेक्षा जास्त यूनिट विकले गेले आहेत.

रियलमी 3 प्रति स्मार्टफोन यूजर्सचे इतके वेड पाहून रियलमी ने दुपारीच घोषणा केली होती कि कालच म्हणजे 12 मार्चलाच रात्री 8 वाजता पुन्हा रियलमी 3 चा फ्लॅश सेल आयोजित होईल. ठरल्यानुसार रात्री 8 वाजता ​रियलमी 3 चा दुसरा फ्लॅश सेल सुरु झाला आणि दुसऱ्या फ्लॅश सेल मध्ये पण काही मिनिटांत रियलमी 3 पुन्हा आउट आफ स्टॉक झाला. कंपनीने दावा केला आहे कि दोन्ही फ्लॅश सेल मध्ये मिळून रियलमी 3 चे एकूण 2,10,000 पेक्षा पण जास्त यूनिट विकले गेले आहेत.

जियोफोन 2 ला टक्कर देण्यास या भारतीय कंपनीने लॉन्च केला फोन, किंमत 2 हजार पेक्षा पण कमी

विकले गेले 2 अब्जांचे रियलमी 3
रियलमीने घोषणा केली आहे कि दोन्ही फ्लॅश सेल मध्ये रियलमी 3 चे 2 लाख 10 हजार पेक्षा पण जास्त यूनिट विकले गेले आहेत. या सेल मध्ये रियलमी 3 च्या कोणत्या वेरिएंटचे किती यूनिट विकले गेले आहेत हे कंपनीने सांगितले नाही. विशेष म्हणजे रियलमी 3 चा 3जीबी/32जीबी वेरिएंट 8,999 रुपये आणि 4जीबी/64जीबी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकला गेला होता. त्यामुळे विकले गेलेले सर्व 2,10,000 यूनिट रियलमी 3 च्या बेस वेरिएंटचे होते असे गृहीत धरले तरी कंपनीने एका दिवसात 1,88,97,90,000 रुपयांचे फोन विकले गेले आहेत. म्हणजे रियलमी 3 मुळे रियलमी ने एकाच दिवसात 2 अब्ज रुपयांची उलाढाल केली आहे.

पुढील सेल 19 मार्च
लो बजेट सेग्मेंट मध्ये हिट झालेल्या रियलमी 3 चे दोन्ही फ्लॅश सेल यशस्वी झाले आहेत. त्यामुळे जे यूजर्स स्टॉक संपल्यामुळे रियलमी 3 विकत घेऊ शकले नाही त्यांच्यासाठी रियलमी ने घोषणा केली आहे कि रियलमी 3 चा पुढील फ्लॅश सेल 19 मार्चला आयोजित केला जाईल. हा फ्लॅश सेल 19 मार्चच्या दुपारी 12 वाजता सुरु होईल जो कंपनीच्या वेबसाइट सोबत फ्लिपकार्ट वर होईल.

लॉन्च जवळ असलेले सॅमसंग गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए40 आणि गॅलेक्सी ए20ई फोन, असतील हे खास फीचर्स

विशेष म्हणजे रियलमी कंपनी लवकरच रियलमी 3 आफलाईन रिटेल स्टोर्स वर पण सेल साठी उपलब्ध करू शकते. दुसरीकडे रियलमी रियलमी 3 प्रो स्मार्टफोन लवकरच बाजरात आणण्याची तयारी करत आहे. यासंबंधित माहिती आम्ही तुम्हाला देत राहू. रियलमी 3 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here