जियोफोन 2 ला टक्कर देण्यास या भारतीय कंपनीने लॉन्च केला फोन, किंमत 2 हजार पेक्षा पण कमी

भारतीय मोबाईल फोन निर्माता कंपनी लावा ने मार्केट मध्ये आपला नवीन फीचर फोन सादर केला आहे. हा फोन लावा 34 सुपर नावाने लॉन्च केला गेला आहे. किंमत आणि फीचर्स पाहता याची थेट टक्कर जियोफोन 2 सोबत. फोन कंपनीने ब्लॅक-रेड आणि सनराइज गोल्ड कलर ऑप्शन मध्ये सादर केला आहे.

किंमत आणि ऑफर्स
लावा 34 सुपर फीचर फोनची किंमत 1,799 रुपये आहे आणि हा ऑफलाइन मार्केट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोन सोबत मिळणाऱ्या ऑफर्स पाहता यूजर्सना या फीचर फोन सोबत एक वर्षाची रिप्लेसमेंट गॅरंटी मिळेल. तसेच ग्राहकांना 6 महिन्यांची ऍक्सेसरीज वरील गॅरंटी पण मिळेल.

लावा 34 सुपर चे स्पेसिफिकेशन्स
या फोन मध्ये 2.4-इंचाचा कलर डिस्प्ले देण्यात आला आहे. सोबत फोन मध्ये ग्रेडिएंट कीपॅड देण्यात आला आहे. हा फोन इंग्रजी आणि हिंदी सोबत तमिळ, तेलुगु, कन्नड, पंजाबी, गुजराती आणि बंगाली सारख्या भाषांना सपोर्ट करतो. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 2,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. बॅटरी तुम्हाला सुपर बॅटरी मोड सह मिळत आहे. बॅटरी बद्दल विशेष म्हणजे इतकी मोठी बॅटरी इतर कोणत्याही फीचर फोन मध्ये तुम्हाला शोधून सापडणार नाही.

लॉन्च जवळ असलेले सॅमसंग गॅलेक्सी ए90, गॅलेक्सी ए40 आणि गॅलेक्सी ए20ई फोन, असतील हे खास फीचर्स

कंपनीचा दावा आहे कि एकदा बॅटरी चार्ज केल्यानंतर 30 तासांचा टॉकटाइम देईल. तसेच फीचर फोन मध्ये फोटोग्राफी साठी 1.3एमपीचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. पण सेल्फी साठी या मोबाईल फोन मध्ये तुम्हाला फ्रंट कॅमेरा मिळत नाही. तसेच या फोन मध्ये 32जीबी स्टोरेज सपोर्ट पण मिळत आहे.

शाओमीचा स्वस्तातला फोन रेडमी 7, 18 मार्चला होईल लॉन्च

या फोनच्या लॉन्चच्या वेळी कंपनीच्या एका अधिकाऱ्याने म्हटले कि “लावा 34 मध्ये पावरफुल बॅटरी आणि सुप्रीम साउंड क्वालिटी मिळेल. तसेच फोन मध्ये अनेक शानदार फीचर्स आहेत जे ग्राहकांना आकर्षित करतील.”

अलीकडेच लावा ने देशातील फीचर फोन मार्केट मध्ये एक नवीन मोबाईल आणला होता, जो लावा ए7 नावाने लॉन्च केला गेला होता. लावा ए7 कंपनी ने बाईक हेल्मेट एवढा मजबूत बनवला आहे. या फोनच्या निर्मितीसाठी लावा ने पॉलीकार्बोनेट मटेरियलचा वापर केला आहे. या पदार्थाचा वापर हेल्मेट बनवण्यासाठी केला जातो. यामुळे लावा ए7 ला हेल्मेट सारखी मजबूती मिळाली आहे. सॉलिड बॉडी सोबत लावा ए7 ला अशी डिजाईन देण्यात आली आहे जी हातात फिट बसते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here