Tecno Spark 10 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 26 Apr 2023 06:20:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 7 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला नवीन Tecno Spark 10; यात मिळते 16GB RAM ची पावर https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-mobile-tecno-spark-10-4g-phone-launched-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-mobile-tecno-spark-10-4g-phone-launched-know-price-and-specifications/#respond Wed, 26 Apr 2023 06:20:51 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20474 टेक्नो ब्रँडनं भारतात आपल्या ‘स्पार्क 10’ सीरीज अंतगर्त Spark 10 5G आणि Spark 10 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये या सीरीजचा विस्तार करत कंपनीनं नवीन Tecno Spark 10 4G देखील सादर केला आहे. हा मोबाइल फोन सध्या फिलिफिन्समध्ये लाँच झाला आहे ज्याची किंमत 7 हजारांच्या रेंजमध्ये आहे. टेक्नो स्पार्क 10 चे स्पेसिफिकेशन्स […]

The post 7 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला नवीन Tecno Spark 10; यात मिळते 16GB RAM ची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Tecno Spark 10 4G फिलिपिन्समध्ये लाँच झाला आहे.
  • या फोनची किंमत 7,400 रुपयांच्या आसपास आहे.
  • 8GB Extended RAM मुळे इंटरनल रॅम 16GB पर्यंत वाढवता येतो.

टेक्नो ब्रँडनं भारतात आपल्या ‘स्पार्क 10’ सीरीज अंतगर्त Spark 10 5G आणि Spark 10 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. आता इंटरनॅशनल मार्केटमध्ये या सीरीजचा विस्तार करत कंपनीनं नवीन Tecno Spark 10 4G देखील सादर केला आहे. हा मोबाइल फोन सध्या फिलिफिन्समध्ये लाँच झाला आहे ज्याची किंमत 7 हजारांच्या रेंजमध्ये आहे.

टेक्नो स्पार्क 10 चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.6″ HD+ Display
  • 90Hz Refresh Rate

Tecno Spark 10 4G फोन 720 x 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. ही स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते. डिस्प्लेच्या तीन कडा बेजल लेस आहेत तसेच खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट आहे. स्क्रीनच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप वॉटरड्रॉप नॉच देण्यात आली आहे. हे देखील वाचा: वनप्लसचा पहिला टॅबलेट अधिकृतपणे लाँच; जाणून घ्या OnePlus Pad ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

  • 8GB Extended RAM
  • MediaTek Helio G37

टेक्नो स्पार्क 10 4जी फोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे ज्यात प्रोसेसिंगसाठी मीडियाटेक हीलियो जी37 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा मोबाइल फोन 8जीबी एक्सटेंडेड रॅम टेक्नॉलॉजीसह येतो जो फोनच्या इंटरनल 8जीबी रॅमसह मिळून 16जीबी रॅमची पावर देतो.

  • 50MP Rear Camera
  • 8MP Selfie Camera

फोटोग्राफीसाठी Tecno Spark 10 4जी स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल सेकंडरी लेन्ससह येतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे जो ड्युअल फ्लॅशसह आहे.

  • 18W fast charging
  • 5,000mAh battery

Tecno Spark 10 4G फोन पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. याची मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी नवीन टेक्नो फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येतो. टेक्नो स्पार्क 10 4जी एक ड्युअल सिम फोन आहे ज्यात 3.5एमएम जॅक आणि एनएफसी देखील मिळते. हे देखील वाचा: 32MP Selfie Camera सह OPPO A78 5G फोनचे फुल स्पेसिफिकेशन लीक; लवकरच येऊ शकतो बाजारात

टेक्नो स्पार्क 10 ची किंमत

Tecno Spark 10 4G फोन फिलिपिन्समध्ये सिंगल मेमरी व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. यात 8जीबी रॅमसह 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. स्पार्क 10 4जीची किंमत $90 आहे जी भारतीय करंसीनुसार 7,400 रुपयांच्या आसपास आहे. या फोननं META Black, META Blue आणि META White कलरमध्ये मार्केटमध्ये एंट्री घेतली आहे.

The post 7 हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला नवीन Tecno Spark 10; यात मिळते 16GB RAM ची पावर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-mobile-tecno-spark-10-4g-phone-launched-know-price-and-specifications/feed/ 0
16जीबी रॅम आणि 5,000एमएच बॅटरीसह Tecno Spark 10 आणि Spark 10C झाले ऑफिशियल https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-10-spark-10c-key-specifications-officially-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-10-spark-10c-key-specifications-officially-revealed/#respond Fri, 31 Mar 2023 06:39:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19916 Tecno नं गेल्या आठवड्यातच भारतीय बाजारात Spark 10 5G स्मार्टफोन सादर केला होता. आता कंपनीनं गुपचूप आपल्या ग्लोबल वेबसाइटवर स्पार्क-सीरीजमध्ये दोन फोन्स लिस्ट केले आहेत. Tecno Spark 10 आणि Tecno Spark 10C स्मार्टफोन्स सर्व स्पेसिफिकेशन्ससह कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार या फोन्समध्ये 16GB RAM (8GB+8GB) आणि 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते. परंतु […]

The post 16जीबी रॅम आणि 5,000एमएच बॅटरीसह Tecno Spark 10 आणि Spark 10C झाले ऑफिशियल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • कंपनीच्या ग्लोबल साइटवर Tecno Spark 10 आणि Spark 10C लिस्ट.
  • दोन्ही फोनमध्ये 16GB रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी आहे.
  • सध्या किंमत आणि सेलबद्दल कंपनीनं माहिती दिली नाही.

Tecno नं गेल्या आठवड्यातच भारतीय बाजारात Spark 10 5G स्मार्टफोन सादर केला होता. आता कंपनीनं गुपचूप आपल्या ग्लोबल वेबसाइटवर स्पार्क-सीरीजमध्ये दोन फोन्स लिस्ट केले आहेत. Tecno Spark 10 आणि Tecno Spark 10C स्मार्टफोन्स सर्व स्पेसिफिकेशन्ससह कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार या फोन्समध्ये 16GB RAM (8GB+8GB) आणि 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते. परंतु अजूनही किंमत आणि सेल डेटची कोणतीही माहिती समोर आली नाही. चला जाणून घेऊया या दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन्स.

Tecno Spark 10 आणि Spark 10C ची किंमत आणि उपलब्धता

या स्मार्टफोन्सच्या किंमतीची अधिकृत माहिती वेबसाइटवर देण्यात आली नाही. तसेच हे फोन्स कधीपासून विक्रीसाठी येतील हे देखील सांगण्यात आलं नाही. इंडिया लाँचबद्दल देखील कंपनीनं अजूनही खुलासा केला नाही. हे देखील वाचा: आजपासून मोफत बघा Jio Cinema वर IPL! Jio चं सिम असण्याची आवश्यकता नाही

Tecno Spark 10 आणि Spark 10C चे स्पेसिफिकेशन्स

टेक्नो स्पार्क 10 मेटा ब्लॅक, मेटा ब्लूृ आणि मेटा व्हाइटमध्ये सादर करण्यात आला आहे. तर टेक्नो स्पार्क 10सी मेटा ब्लॅक, ब्लू आणि ग्रीनमध्ये उपलब्ध होईल. दोन्ही फोन बॉक्सी डिजाइनसह आले आहेत. तसेच डिवाइसमध्ये मागच्या बाजूला आयफोन सारखी कॅमेरा डिजाइन देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स पाहता दोन्ही स्मार्टफोनमध्ये जवळपास एक सारखे फीचर्स मिळतात. दोन्ही फोनमध्ये एचडी प्लस रिजोल्यूशनसह 6.6 इंचाचा डिस्प्ले मिळतो. यात 90Hz रिफ्रेश रेट आणि वॉटरड्रॉप नॉच डिजाइन देण्यात आला आहे.

फोन्सच्या प्रोसेसरची कोणतीही माहिती कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध नाही. परंतु असं सांगण्यात आलं आहे की डिवाइसमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोनमधील 8 जीबी व्हर्च्युअल रॅम फीचरमुळे गरज पडल्यास 16जीबी रॅमची पावर मिळवता येईल.

कॅमेराच्या बाबतीत दोन्ही वेगळा आहेत. Tecno Spark 10 फोनमध्ये 50एमपीचा रियर कॅमेरा मिळेल. तर Spark 10C मध्ये कंपनीनं 16एमपीचा मेन कॅमेरा दिला आहे. जोडीला आणखी कॅमेरा सेन्सर (ज्याची माहिती देण्यात आली नाही) आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच दोन्ही फोन्सच्या फ्रंटला 8एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. हे देखील वाचा: गुगल प्ले सपोर्टेड डिवाइसेसच्या यादीत दिसला Vivo Y78+; लवकरच येऊ शकतो बाजारात

सिक्योरिटीसाठी दोन्ही स्मार्टफोन्समध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. दोन्ही हँडसेटमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बॅटरी चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप सी सपोर्ट मिळतो.

The post 16जीबी रॅम आणि 5,000एमएच बॅटरीसह Tecno Spark 10 आणि Spark 10C झाले ऑफिशियल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-10-spark-10c-key-specifications-officially-revealed/feed/ 0