16जीबी रॅम आणि 5,000एमएच बॅटरीसह Tecno Spark 10 आणि Spark 10C झाले ऑफिशियल

Highlights

  • कंपनीच्या ग्लोबल साइटवर Tecno Spark 10 आणि Spark 10C लिस्ट.
  • दोन्ही फोनमध्ये 16GB रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी आहे.
  • सध्या किंमत आणि सेलबद्दल कंपनीनं माहिती दिली नाही.

Tecno नं गेल्या आठवड्यातच भारतीय बाजारात Spark 10 5G स्मार्टफोन सादर केला होता. आता कंपनीनं गुपचूप आपल्या ग्लोबल वेबसाइटवर स्पार्क-सीरीजमध्ये दोन फोन्स लिस्ट केले आहेत. Tecno Spark 10 आणि Tecno Spark 10C स्मार्टफोन्स सर्व स्पेसिफिकेशन्ससह कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार या फोन्समध्ये 16GB RAM (8GB+8GB) आणि 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते. परंतु अजूनही किंमत आणि सेल डेटची कोणतीही माहिती समोर आली नाही. चला जाणून घेऊया या दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन्स.

Tecno Spark 10 आणि Spark 10C ची किंमत आणि उपलब्धता

या स्मार्टफोन्सच्या किंमतीची अधिकृत माहिती वेबसाइटवर देण्यात आली नाही. तसेच हे फोन्स कधीपासून विक्रीसाठी येतील हे देखील सांगण्यात आलं नाही. इंडिया लाँचबद्दल देखील कंपनीनं अजूनही खुलासा केला नाही. हे देखील वाचा: आजपासून मोफत बघा Jio Cinema वर IPL! Jio चं सिम असण्याची आवश्यकता नाही

Tecno Spark 10 आणि Spark 10C चे स्पेसिफिकेशन्स

टेक्नो स्पार्क 10 मेटा ब्लॅक, मेटा ब्लूृ आणि मेटा व्हाइटमध्ये सादर करण्यात आला आहे. तर टेक्नो स्पार्क 10सी मेटा ब्लॅक, ब्लू आणि ग्रीनमध्ये उपलब्ध होईल. दोन्ही फोन बॉक्सी डिजाइनसह आले आहेत. तसेच डिवाइसमध्ये मागच्या बाजूला आयफोन सारखी कॅमेरा डिजाइन देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स पाहता दोन्ही स्मार्टफोनमध्ये जवळपास एक सारखे फीचर्स मिळतात. दोन्ही फोनमध्ये एचडी प्लस रिजोल्यूशनसह 6.6 इंचाचा डिस्प्ले मिळतो. यात 90Hz रिफ्रेश रेट आणि वॉटरड्रॉप नॉच डिजाइन देण्यात आला आहे.

फोन्सच्या प्रोसेसरची कोणतीही माहिती कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध नाही. परंतु असं सांगण्यात आलं आहे की डिवाइसमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोनमधील 8 जीबी व्हर्च्युअल रॅम फीचरमुळे गरज पडल्यास 16जीबी रॅमची पावर मिळवता येईल.

कॅमेराच्या बाबतीत दोन्ही वेगळा आहेत. Tecno Spark 10 फोनमध्ये 50एमपीचा रियर कॅमेरा मिळेल. तर Spark 10C मध्ये कंपनीनं 16एमपीचा मेन कॅमेरा दिला आहे. जोडीला आणखी कॅमेरा सेन्सर (ज्याची माहिती देण्यात आली नाही) आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच दोन्ही फोन्सच्या फ्रंटला 8एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. हे देखील वाचा: गुगल प्ले सपोर्टेड डिवाइसेसच्या यादीत दिसला Vivo Y78+; लवकरच येऊ शकतो बाजारात

सिक्योरिटीसाठी दोन्ही स्मार्टफोन्समध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. दोन्ही हँडसेटमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बॅटरी चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप सी सपोर्ट मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here