32MP Selfie Camera सह OPPO A98 5G फोनचे फुल स्पेसिफिकेशन लीक; लवकरच येऊ शकतो बाजारात

Highlights

 • OPPO A98 5G फोन लवकरच लाँच होऊ शकतो.
 • हा Qualcomm Snapdragon 695 सह सादर केला जाऊ शकतो.
 • ओप्पो ए78 5जी मध्ये 64MP रियर आणि 32MP फ्रंट कॅमेरा मिळू शकतो.

ओप्पोनं वर्षाच्या सुरुवातीला भारतीय बाजारात OPPO A78 5G फोन लाँच केला होता जो 18,999 रुपयांमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. आता बातमी आली आहे की कंपनी याचा नेक्स्ट जेन अ‍ॅडव्हान्स व्हर्जन OPPO A98 5G घेऊन येत आहे आणि हा ओप्पो मोबाइल 27 एप्रिलला मार्केटमध्ये सादर केला जाईल. लाँचपूर्वीच ओप्पो ए98 5जी फोनचे स्पेसिफिकेशन्स लीकमधून समोर आले आहेत.

ओप्पो ए98 5जी चे स्पेसिफिकेशन्स

 • LTPS LCD Panel
 • 120Hz Refresh Rate
 • 6.7″ Full HD+ display

समोर आलेल्या लीकनुसार OPPO A98 5G मध्ये 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले पंच-होल स्टाईलसह दिला जाऊ शकतो. ही स्क्रीन एलटीपीएस एलसीडी पॅनलसह 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकते. लीकनुसार, ओप्पो आपला फोन पांडा ग्लासनं प्रोटेक्ट करेल तसेच स्क्रीनवर 391पीपीआय पिक्सल डेन्सिटी मिळेल. हे देखील वाचा: वनप्लसचा पहिला टॅबलेट अधिकृतपणे लाँच; जाणून घ्या OnePlus Pad ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

 • 8GB LPDDR4X RAM
 • Android 13 + ColorOS 13
 • Qualcomm Snapdragon 695

OPPO A98 5G फोन अँड्रॉइड 13 आधारित कलरओएस 13 वर लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार प्रोसेसिंगसाठी या मोबाइल फोनमध्ये ऑक्टाकोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर दिला जाईल जोडीला ग्राफिक्ससाठी एड्रेनो 619 जीपीयू मिळेल. समोर आलेल्या माहितीनुसार हा फोन 8जीबी रॅम + 128जीबी मेमरीसह मार्केटमध्ये येऊ शकतो.

 • 32MP Front Camera
 • 64MP Triple Rear Camera

फोटोग्राफीसाठी ओप्पो ए98 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. लीकनुसार फोनच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर असेल जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सर तसेच 2 मेगापिक्सल मॅक्रो लेन्ससह येईल. तसेच हा कॅमेरा EIS (इलेक्ट्रॉनिक ईमेज स्टॅबिलायजेशन) फीचरला सपोर्ट करेल, असं देखील लीकमध्ये सांगण्यात आलं आहे. OPPO A98 5G मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा असल्याचं देखील समोर आलं आहे. हे देखील वाचा: पॅन कार्डशी आधार कार्ड लिंक करण्याची पद्धत, जाणून घ्या

 • 67W SuperVOOC
 • 5,000mAh battery

लीकनुसार ओप्पो ए98 5जी मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची मोठी बॅटरी दिली जाईल जी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह चालेल. तसेच सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये साइड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर दिला जाऊ शकतो. लीकनुसार OPPO A98 5G फोन आयपीएक्स4 रेटेड असेल ज्यामुळे काही प्रमाणात हा फोन पाण्यापासून सुरक्षित राहू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here