गुगल प्ले सपोर्टेड डिवाइसेसच्या यादीत दिसला Vivo Y78+; लवकरच येऊ शकतो बाजारात

Vivo Y52 5G 2022
Highlights

  • Vivo लवकरच आपला नवीन फोन Vivo Y78+ लाँच करू शकते.
  • हा डिवाइस आता गुगल प्ले सपोर्टेड डिवाइसेसच्या लिस्टमध्ये दिसला आहे.
  • लिस्टिंगमुळे डिवाइस लवकरच लाँच होण्याचा इशारा मिळाला आहे.

विवो कथितरित्या एक नवीन वाय-सीरीज स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. या नवीन फोनबद्दल अफवा आहे की याचे नाव विवो वाय78+ असेल आणि एप्रिल 2023 मध्ये हा चीनी मार्केटमध्ये सादर केला जाईल. आता ऑफिशियली लाँच होण्यापूर्वीच हा डिवाइस गुगल प्ले सपोर्टेड डिवाइसेसच्या लिस्टमध्ये दिसला आहे. या लिस्टिंगवरून फक्त याचे नाव समजले आहे. परंतु लिस्टिंगवरून हा फोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो, असा अंदाज लावला जात आहे. चला एक नजर टाकून पाहूया की या आगामी विवो मोबाइलबद्दल आतापर्यंत कोणती माहिती समोर आली आहे.

गुगल प्ले लिस्टिंगमध्ये दिसला Vivo Y78+

गुगल प्ले सपोर्टेड डिवाइसेसच्या लिस्टिंगमध्ये Vivo Y78+ स्मार्टफोन मॉडेल नंबर Vivo V2271A/PD2271 सह लिस्ट करण्यात आला आहे. आशा आहे की हा पुढील महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये चीनी मार्केटमध्ये येऊ शकतो. तसेच Vivo Y78 च्या इंडिया लाँचबद्दल देखील बातम्या येत आहेत. हे देखील वाचा: ओप्पोनं आणखी एक स्वस्त 5जी फोन OPPO A1x; 8GB RAM सह मिळतंय खूप काही

दुर्दैवाने लिस्टिंगमधून डिवाइसच्या स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि डिजाइन बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतु Google Play सपोर्टेड डिवाइस लिस्टिंगनंतर साधरणतः Google Play कंसोल लिस्टिंग होते, ज्यातून डिवाइसच्या डिजाइन आणि महत्वाच्या फीचर्सचा खुलासा होतो. त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये आमच्याकडे डिवाइसबाबत अधिक माहिती येऊ शकते. हे देखील वाचा: आजपासून मोफत बघा Jio Cinema वर IPL! Jio चं सिम असण्याची आवश्यकता नाही

अलीकडेच विवो वाय78+ स्मार्टफोन 3C सर्टिफिकेशन वेबसाइटवर दिसला होता. या साइटवरून समजले आहे की डिवाइसमध्ये 5,000mAh ची बॅटरी असेल, ज्यात USB टाइप-सी चार्जिंग पोर्टसह 44W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट देखील असेल. त्याचबरोबर डिवाइसमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल, असं देखील सांगण्यात आलं आहे. सॉफ्टवेयर पाहता, Vivo Y78+ लेटेस्ट Android 13-बेस्ड FunTouchOS 13 किंवा OriginOS 13 वर चालू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here