वनप्लसचा पहिला टॅबलेट अधिकृतपणे लाँच; जाणून घ्या OnePlus Pad ची किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

Highlights

  • OnePlus Pad ची किंमत 37,999 रुपयांपासून सुरु होत आहे.
  • हा टॅबलेट डिवायस 2 मे पासून विकत घेता येईल.
  • वनप्लस पॅडमध्ये 67W चार्जिंग आणि 9,510mAh ची बॅटरी आहे.

वनप्लसनं फेब्रुवारीमध्ये OnePlus 11 आणि OnePlus 11R स्मार्टफोन लाँच करण्यासोबतच OnePlus Pad देखील सादर केला होता. पहिल्यांदाच कंपनीनं मोबाइल फोनच्या पुढे जात एखादा टॅबलेट डिवायस सादर केला आहे. आज वनप्लस पॅड ऑफिशियली लाँच करत कंपनीनं याची किंमत, फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देखील सार्वजनिक केली आहे.

वनप्लस पॅडची भारतातील किंमत

  • 8GB RAM + 128GB Storage = 37,999 रुपये
  • 12GB RAM + 256GB Storage = 39,999 रुपये

OnePlus Pad भारतात दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. तसेच बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 12जीबी रॅमसह 256जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. किंमत पाहता वनप्लस टॅबलेटची किंमत 37,999 रुपयांपासून सुरु होऊन 39,999 रुपयांपर्यंत जाते. वनप्लस पॅडची विक्री 2 मेपासून सुरु होईल. हे देखील वाचा: OPPO Reno 10 Pro+ स्मार्टफोन 100W फास्ट चार्जिंगसह 3C सर्टिफिकेशनवर लिस्ट; अशी असतील वैशिष्ट्ये

वनप्लस पॅडवर ऑफर्स

OnePlus Pad च्या खरेदीच्यावेळी आयसीआयसीआय बँक कार्डचा वापर केल्यास 2,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. हा टॅब 12 महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयवर देखील विकत घेता येईल. OnePlus Xchange Program अंतगर्त जुना वनप्लस स्मार्टफोन दिल्यास 5,000 रुपयांची सूट पण मिळेल. 28 एप्रिल ते 2 मे दरम्यान वनप्लस पॅड प्री-ऑर्डर केल्यास लोकांना 1499 रुपयांची फोलियो केस मोफत दिली जाईल.

वनप्लस पॅडचे स्पेसिफिकेशन्स

  • 11.61″ Display
  • 7:5 Aspect Ratio
  • 144Hz Refresh Rate

OnePlus Pad 7:5 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर बनला आहे ज्याला कंपनीनं ReadFit Screen असं नाव दिलं आहे. हा 2800 × 2000 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 11.61 इंच डिस्प्लेला सपोर्ट करतो जो एलसीडी पॅनलवर बनला आहे तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करतो. स्क्रीनवर एचडीआर 10+, 500निट्स ब्राइटनेस आणि 296पीपीआय सारखे फीचर्स मिळतात. या टॅबलेट डिवायसची जाडी फक्त 6.54एमएम आहे तसेच याचे वजन 552ग्राम आहे.

  • 12GB RAM
  • MediaTek Dimensity 9000

वनप्लस पॅड स्टाईलिश आहेच तसेच पावरफुल देखील आहे. हा टॅबलेट मीडियाटेक डिमेनसिटी 9000 प्रोसेसरवर चालतो. हा डिवायस 12 जीबी रॅमला सपोर्ट करतो जो LPDDR5 RAM टेक्नॉलॉजीवर चालतो. तसेच वनप्लस पॅडमध्ये UFS 3.1 Storage देण्यात आली आहे. हा वनप्लस टॅबलेट लेटेस्ट अँड्रॉइड ओएस 13 वर सादर करण्यात आला आहे.

  • 13MP Rear Camera
  • 8MP Front Camera

फोटोग्राफीसाठी वनप्लस पॅडच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा सिंगल रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा टॅबलेट डिवायस 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या टॅबलेटमध्ये ईआयएस स्टेबीलायजेशन फीचर देण्यात आलं आहे तर रियर कॅमेऱ्यात 4के व्हिडीओ तसेच फ्रंट कॅमेऱ्यात 1080पी व्हिडीओ रेकॉर्ड करता येतो. हे देखील वाचा: मोठ्या बॅटरीसह पुन्हा लाँच झाला Nokia 105 4G (2023); जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स

  • 67W Fast Charging
  • 9,510mAh Battery

पावर बॅकअपसाठी OnePlus Pad 9,510एमएएचच्या दमदार बॅटरीसह येतो. तसेच मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी यात 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता, याच्या बॅक पॅनलवर 13 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here