Tecno Spark 10C - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 31 Mar 2023 06:39:58 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 16जीबी रॅम आणि 5,000एमएच बॅटरीसह Tecno Spark 10 आणि Spark 10C झाले ऑफिशियल https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-10-spark-10c-key-specifications-officially-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-10-spark-10c-key-specifications-officially-revealed/#respond Fri, 31 Mar 2023 06:39:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=19916 Tecno नं गेल्या आठवड्यातच भारतीय बाजारात Spark 10 5G स्मार्टफोन सादर केला होता. आता कंपनीनं गुपचूप आपल्या ग्लोबल वेबसाइटवर स्पार्क-सीरीजमध्ये दोन फोन्स लिस्ट केले आहेत. Tecno Spark 10 आणि Tecno Spark 10C स्मार्टफोन्स सर्व स्पेसिफिकेशन्ससह कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार या फोन्समध्ये 16GB RAM (8GB+8GB) आणि 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते. परंतु […]

The post 16जीबी रॅम आणि 5,000एमएच बॅटरीसह Tecno Spark 10 आणि Spark 10C झाले ऑफिशियल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • कंपनीच्या ग्लोबल साइटवर Tecno Spark 10 आणि Spark 10C लिस्ट.
  • दोन्ही फोनमध्ये 16GB रॅम आणि 5,000एमएएच बॅटरी आहे.
  • सध्या किंमत आणि सेलबद्दल कंपनीनं माहिती दिली नाही.

Tecno नं गेल्या आठवड्यातच भारतीय बाजारात Spark 10 5G स्मार्टफोन सादर केला होता. आता कंपनीनं गुपचूप आपल्या ग्लोबल वेबसाइटवर स्पार्क-सीरीजमध्ये दोन फोन्स लिस्ट केले आहेत. Tecno Spark 10 आणि Tecno Spark 10C स्मार्टफोन्स सर्व स्पेसिफिकेशन्ससह कंपनीच्या ऑफिशियल वेबसाइटवर लिस्ट करण्यात आले आहेत. त्यानुसार या फोन्समध्ये 16GB RAM (8GB+8GB) आणि 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते. परंतु अजूनही किंमत आणि सेल डेटची कोणतीही माहिती समोर आली नाही. चला जाणून घेऊया या दोन्ही फोनचे स्पेसिफिकेशन्स.

Tecno Spark 10 आणि Spark 10C ची किंमत आणि उपलब्धता

या स्मार्टफोन्सच्या किंमतीची अधिकृत माहिती वेबसाइटवर देण्यात आली नाही. तसेच हे फोन्स कधीपासून विक्रीसाठी येतील हे देखील सांगण्यात आलं नाही. इंडिया लाँचबद्दल देखील कंपनीनं अजूनही खुलासा केला नाही. हे देखील वाचा: आजपासून मोफत बघा Jio Cinema वर IPL! Jio चं सिम असण्याची आवश्यकता नाही

Tecno Spark 10 आणि Spark 10C चे स्पेसिफिकेशन्स

टेक्नो स्पार्क 10 मेटा ब्लॅक, मेटा ब्लूृ आणि मेटा व्हाइटमध्ये सादर करण्यात आला आहे. तर टेक्नो स्पार्क 10सी मेटा ब्लॅक, ब्लू आणि ग्रीनमध्ये उपलब्ध होईल. दोन्ही फोन बॉक्सी डिजाइनसह आले आहेत. तसेच डिवाइसमध्ये मागच्या बाजूला आयफोन सारखी कॅमेरा डिजाइन देण्यात आली आहे.

स्पेसिफिकेशन्स पाहता दोन्ही स्मार्टफोनमध्ये जवळपास एक सारखे फीचर्स मिळतात. दोन्ही फोनमध्ये एचडी प्लस रिजोल्यूशनसह 6.6 इंचाचा डिस्प्ले मिळतो. यात 90Hz रिफ्रेश रेट आणि वॉटरड्रॉप नॉच डिजाइन देण्यात आला आहे.

फोन्सच्या प्रोसेसरची कोणतीही माहिती कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध नाही. परंतु असं सांगण्यात आलं आहे की डिवाइसमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. तसेच फोनमधील 8 जीबी व्हर्च्युअल रॅम फीचरमुळे गरज पडल्यास 16जीबी रॅमची पावर मिळवता येईल.

कॅमेराच्या बाबतीत दोन्ही वेगळा आहेत. Tecno Spark 10 फोनमध्ये 50एमपीचा रियर कॅमेरा मिळेल. तर Spark 10C मध्ये कंपनीनं 16एमपीचा मेन कॅमेरा दिला आहे. जोडीला आणखी कॅमेरा सेन्सर (ज्याची माहिती देण्यात आली नाही) आणि LED फ्लॅश देण्यात आला आहे. तसेच दोन्ही फोन्सच्या फ्रंटला 8एमपीचा सेल्फी कॅमेरा आहे. हे देखील वाचा: गुगल प्ले सपोर्टेड डिवाइसेसच्या यादीत दिसला Vivo Y78+; लवकरच येऊ शकतो बाजारात

सिक्योरिटीसाठी दोन्ही स्मार्टफोन्समध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. दोन्ही हँडसेटमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. बॅटरी चार्जिंगसाठी यात यूएसबी टाइप सी सपोर्ट मिळतो.

The post 16जीबी रॅम आणि 5,000एमएच बॅटरीसह Tecno Spark 10 आणि Spark 10C झाले ऑफिशियल first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tecno-spark-10-spark-10c-key-specifications-officially-revealed/feed/ 0
Tecno Spark 10C स्मार्टफोन 4GB RAM सह गुगल प्ले कन्सोल वेबसाइटवर लिस्ट https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-mobile-phone-tecno-spark-10c-specifications-leaked-google-play-console/ https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-mobile-phone-tecno-spark-10c-specifications-leaked-google-play-console/#respond Thu, 23 Feb 2023 03:43:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18073 स्वस्त मोबाइल बनवण्यासाठी लोकप्रिय असलेला टेक ब्रँड टेक्नो आपल्या स्पार्क सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Tecno Spark 10C नावानं लाँच होईल. कंपनीनं अद्याप आपल्या या नवीन फोनचा उल्लेख अधिकृतपणे केला नाही परंतु हा टेक्नो मोबाइल अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स व फीचर्ससह Google Play Console वर लिस्ट झाला आहे. पुढे ये स्वस्त लो बजेट फोनची […]

The post Tecno Spark 10C स्मार्टफोन 4GB RAM सह गुगल प्ले कन्सोल वेबसाइटवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Tecno Spark 10C गुगल प्ले कसोंल वर लिस्ट झाला आहे.
  • या फोनमध्ये 4GB RAM आणि Unisoc T606 प्रोसेसर मिळू शकतो.
  • स्पार्क 10सी एक लो बजेट स्वस्त टेक्नो मोबाइल असेल.

स्वस्त मोबाइल बनवण्यासाठी लोकप्रिय असलेला टेक ब्रँड टेक्नो आपल्या स्पार्क सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो Tecno Spark 10C नावानं लाँच होईल. कंपनीनं अद्याप आपल्या या नवीन फोनचा उल्लेख अधिकृतपणे केला नाही परंतु हा टेक्नो मोबाइल अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स व फीचर्ससह Google Play Console वर लिस्ट झाला आहे. पुढे ये स्वस्त लो बजेट फोनची माहिती देण्यात आली आहे.

Tecno Spark 10C चे लीक स्पेसिफिकेशन्स

  • 4GB RAM
  • Unisoc T606
  • Android 12 OS

हा टेक्नो फोन गुगल प्ले कंसोल वर Tecno KI5k मॉडेल नंबरसह लिस्ट झाला आहे. लिस्टिंगमध्ये सांगण्यात आलं आहे की हा डिवायस 720 x 1612 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या डिस्प्लेसह लाँच केला जाईल जो एचडी+ रिजोल्यूशनसह येईल तसेच 320पीपीआयला सपोर्ट करेल. लिस्टिंगमधील फोटोजवरून स्पष्ट झालं आहे की या फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉच स्क्रीन दिली जाईल. हे देखील वाचा: आमच्या हाती लागली Samsung Galaxy A34 आणि Galaxy A54 ची माहिती; पाहा फोटो, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन

Tecno Spark 10C स्मार्टफोनमध्ये Unisoc T606 प्रोसेसर असल्याचा खुलासा देखील या लिस्टिंगमध्ये झाला आहे. गुगल प्ले कंसोलवर हा टेक्नो फोन 4जीबी रॅमसह समोर आला आहे. परंतु आणखी मेमरी व्हेरिएंट्स देखील बाजारात येतील अशी अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 12 ओएससह लाँच केला जाईल. फोनचे इतर स्पेसिफिकेशन्ससाठी वाट पाहावी लागेल.

Tecno Pop 7 Pro

  • 6.6″ HD+ Display
  • 3GB RAM + 64GB Storage
  • MediaTek Helio A22
  • 5,000mAh Battery
  • 12MP AI Dual Rear Camera

अलीकडेच टेक्नो पॉप 7 प्रो भारतात लाँच झाला आहे ज्याच्या 2 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 6,799 रुपये आणि 3 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटची प्राइस 7,299 रुपये आहे. हा स्मार्टफोन मीडियाटेक हीलियो ए22 प्रोसेसरवर चालतो. पावर बॅकअपसाठी यात 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. हे देखील वाचा: Free मध्ये IPL 2023 दाखवून देखील Ambani करणार कोट्यवधींची कमाई; जाणून घ्या कसं

Tecno Pop 7 Pro मध्ये 1612 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.56 इंचाचा एचडी+ डिस्प्ले आहे जो 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट आणि 480निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. हा फोन IPX2 रेटेड आहे. फोटोग्राफीसाठी याच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 12 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा टेक्नो मोबाइल 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

The post Tecno Spark 10C स्मार्टफोन 4GB RAM सह गुगल प्ले कन्सोल वेबसाइटवर लिस्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/4gb-ram-mobile-phone-tecno-spark-10c-specifications-leaked-google-play-console/feed/ 0