Twitter - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 08 Nov 2022 09:28:13 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Elon Musk ची भारतात मोठी कारवाई! 90 टक्क्यांपेक्षा जास्त Twitter कर्मचाऱ्यांना दिला ‘नारळ’ https://www.91mobiles.com/marathi/elon-musk-fired-more-than-90-percent-twitter-employees-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/elon-musk-fired-more-than-90-percent-twitter-employees-in-india/#respond Tue, 08 Nov 2022 09:28:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14706 Twitter ला Elon Musk नं खरेदी केल्यानंतरपासून हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सतत चर्चेत येत आहे. मस्क यांच्या नेतृत्वाखाली वारंवार ट्विटर कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली जात आहे आणि त्यांना नोकरीवरून काढून टाकलं जात आहे. दरम्यान Twitter नं भारतात देखील मोठी कारवाई केली आहे. एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली ट्विटरनं भारतात आपल्या 90 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. […]

The post Elon Musk ची भारतात मोठी कारवाई! 90 टक्क्यांपेक्षा जास्त Twitter कर्मचाऱ्यांना दिला ‘नारळ’ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Twitter ला Elon Musk नं खरेदी केल्यानंतरपासून हा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सतत चर्चेत येत आहे. मस्क यांच्या नेतृत्वाखाली वारंवार ट्विटर कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली जात आहे आणि त्यांना नोकरीवरून काढून टाकलं जात आहे. दरम्यान Twitter नं भारतात देखील मोठी कारवाई केली आहे. एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली ट्विटरनं भारतात आपल्या 90 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकलं आहे. Elon Musk यांच्या आदेशावरून ट्विटर इंडिया ऑफिसमधून जवळपास 90% कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे आणि सर्वांची नोकरी गेली आहे.

ट्विटर इंडियामध्ये झाली कपात

Elon Musk यांनी Twitter च्या इंडिया ऑफिसमध्ये जवळपास 90 टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. रिपोर्टनुसार, कंपनीच्या भारतीय ऑफिसमध्ये 200 च्या आसपास कर्मचारी होते ज्यातील आता फक्त 10-12 कर्मचारी उरले आहेत. म्हणजे ट्विटरनं जवळपास 180 ट्विटर कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली आहे. याआधी बातमी आली होती की ट्विटर भारतात 50 टक्के कर्मचारी काढून टाकेल. परंतु आता कंपनीनं 90 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले आहे. हे देखील वाचा: शक्तिशाली प्रोसेसर अत्यंत कमी किंमतीत; वनप्लसला धोबीपछाड देण्यासाठी येतेय Redmi K60 Series

Elon Musk यांनी Twitter का विकत घेतल्यापासून संपूर्ण जगभरात कर्मचारी कमी केले जात आहे. Parag Agrawal, Ned Segal आणि Vijaya Gadde याना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर इलॉन मस्क प्रत्येक देशातील ट्विटर ऑफिसमध्ये लोकांच्या नोकऱ्या घालवत आहे. अनेक रिपोर्ट्स असे देखील येत आहेत, ज्यानुसार इलॉन मस्क यांनी ट्विटरमधून काढून टाकलेले काही कर्मचारी पुन्हा बोलावेल आहेत. त्या कर्मचाऱ्यांना मस्क यांनी म्हटलं आहे की त्यांनी चुकून नोकरीवरून काढून टाकण्यात आलं होतं.

Twitter जॉब

रिपोर्टनुसार Twitter नं काढलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणावर प्रोडक्ट आणि इंजीनियरिंग डिपार्टमेंटचे लोक आहेत. या दोन्ही विभागांचे जवळपास 70 टक्के कर्मचारी आहेत. तसेच मार्केटिंग, पब्लिक पॉलिसी आणि कॉर्पोरेट कम्युनिकेशन जैसे डिपार्टमेंट्सवरून देखील लोकांना हाकलण्यात आलं आहे.

जगभरात जवळपास 3700 ट्विटर कर्मचारी होते जे आता खूप कमी झाले आहेत. भारतात दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरूमधील ट्विटर ऑफिसमधून कर्मचारी काढले जात आहेत. हे देखील वाचा: Jio 5G vs Airtel 5G: जियो की एयरटेल? कोणाचं 5G आहे वेगवान? स्पीड टेस्टचे रिझल्ट आले समोर

ब्लु टिकसाठी द्यावे लागणार पैसे

इलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेताच मोठे निर्णय घेण्यास सुरुवात केली. ब्लू टिक युजर्सना प्रत्येक महिन्याला 8 डॉलर द्यावे लागणार असल्याची घोषणा केली होती, आता या निर्णयाची अंबलबजावणी करण्यास काही देशांमध्ये सुरुवात देखील झाली आहे. ट्विटरनं 8 डॉलर रुपयांत ब्लू टिक व्हेरिफिकेशन सेवा सुरू केली. ही सेवा सध्या आयफोनसाठी उपलब्ध असून, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ब्रिटन या देशांमध्ये सध्या हा निर्णय लागू करण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Elon Musk ची भारतात मोठी कारवाई! 90 टक्क्यांपेक्षा जास्त Twitter कर्मचाऱ्यांना दिला ‘नारळ’ first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/elon-musk-fired-more-than-90-percent-twitter-employees-in-india/feed/ 0
इलॉन मस्कनी विकत घेतलं ट्विटर, पदावरून हटवल्यावर CEO पराग अग्रवाल यांना मिळाला मोठा मोबदला https://www.91mobiles.com/marathi/elon-musk-takes-over-twitter-fires-ceo-parag-agrawal-and-others/ https://www.91mobiles.com/marathi/elon-musk-takes-over-twitter-fires-ceo-parag-agrawal-and-others/#respond Fri, 28 Oct 2022 07:26:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=14410 अमेरिकन बिजनेसमॅन इलॉन मस्क यांनी अखेरीस ट्विटर डील फायनल केली आहे. आता इलॉन मस्क ट्विटरचे नवीन मालक बनले आहेत. तसेच त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेत ट्विटरचे सीईओ पराग जैन यांना पदावरून काढून टाकलं आहे. The Washington Post च्या रिपोर्टनुसार, Tesla CEO मस्कनी Twitter चे सीईओ पराग अग्रवाल, फायनान्स चीफ नेड सेगल आणि लीगल हेड विजया गड्डे […]

The post इलॉन मस्कनी विकत घेतलं ट्विटर, पदावरून हटवल्यावर CEO पराग अग्रवाल यांना मिळाला मोठा मोबदला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अमेरिकन बिजनेसमॅन इलॉन मस्क यांनी अखेरीस ट्विटर डील फायनल केली आहे. आता इलॉन मस्क ट्विटरचे नवीन मालक बनले आहेत. तसेच त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेत ट्विटरचे सीईओ पराग जैन यांना पदावरून काढून टाकलं आहे. The Washington Post च्या रिपोर्टनुसार, Tesla CEO मस्कनी Twitter चे सीईओ पराग अग्रवाल, फायनान्स चीफ नेड सेगल आणि लीगल हेड विजया गड्डे यांना हटवलं आहे. इलॉन मस्क यांनी गेल्या एप्रिलमध्ये ट्विटर खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

इलॉन मस्क यांनी गेल्या काही दिवसांमध्ये ट्विटरसह 44 बिलियन डॉलरची आपली डील पूर्ण करत मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेतली आहे. याआधी एप्रिलमध्ये त्यांनी ट्रिटर खरेदी करण्याचा विचार केला होता. परंतु त्यानंतर त्यानी फेक अकाऊंट आणि स्पॅममुळे ट्विटर डील मध्यंतरी रद्द करण्यात आली होती. इलॉन मस्कनी माघार घेतल्यानंतर ट्विटरनं कोर्टाचा मार्ग स्वीकारला होता, त्यानंतर कोर्टाने इलॉन मस्कनां 28 ऑक्टोबर पर्यंत डील पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. इलॉन मस्क यांनी एक दिवस आधीच डील पूर्ण करून सर्वांना धक्का दिला. हे देखील वाचा: 13 हजारांच्या बजेटमध्ये Redmi चा 5G Phone; क्वॉलकॉमच्या नव्या प्रोसेसरसह Redmi Note 12 5G लाँच

सिंक घेऊन गाठलं ट्विटर HQ

इलॉन मस्क ट्विटर डील पूर्ण झाल्यानंतर सिंक घेऊन ट्विटरच्या कार्यालयात पोहोचले होते. मस्क यांनी द्विटरच्या मुख्यालयात जातानाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमधील व्हिडीओत ते स्वतः चिनी मातीचे बेसिन हातात घेऊन जाताना दिसतात. सोबत त्यांनी लिहिले आहे की, द्विटरच्या मुख्यालयात जात आहे, लेट दॅट सिक इन. ट्विटरमधून जवळपास 75 टक्के कर्मचाऱ्यांची हकालपट्टी केली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. Insider च्या रिपोर्टनुसार, पराग अग्रवाल यांना पदावरून हाकलवण्याचा मोबदला म्हणून 38.7 मिलियन डॉलर, नेड सेगल को 25.4 मिलियन डॉलर आणि विजया गड्डे यांना 12.5 मिलियन डॉलर मिळतील.

ट्विटर बायो केला अपडेट

ट्विटर डील पूर्ण झाल्यानंतर ट्विटरवर इलॉन मस्क यांनी आपला बायो अपडेट करत ‘Chief Twit’ असं लिहलं आहे. तसेच त्यांनी ट्विटरवरील जाहिरातदारांना एक पत्र देखील लिहलं आहे, त्यांनी लिहलं आहे की येणाऱ्या पिढ्यांकडे एक कॉमन डिजिटल स्पेस असावी, जिथे वेगवेगळ्या विचारधारा आणि विश्वासाचे लोक कोणत्याची घृणेविना एकमेकांशी संवाद साधू शकतील. हे देखील वाचा: 210W Fast Charging आणि 200MP Camera! तुमच्या बजेटमध्ये आला Redmi Note 12 Explorer Edition, 9 मिनिटांत फुल चार्ज

या पत्रात त्यांनी पुढे लिहलं आहे की ट्विटरची डील पैसे कमवण्यासाठी करण्यात आली नाही. हा मानवतेसाठी करण्यात आलेला सौदा आहे. लेटेस्ट ट्वीटमध्ये त्यांनी लिहलं आहे की ट्विटर फ्री झालं आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post इलॉन मस्कनी विकत घेतलं ट्विटर, पदावरून हटवल्यावर CEO पराग अग्रवाल यांना मिळाला मोठा मोबदला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/elon-musk-takes-over-twitter-fires-ceo-parag-agrawal-and-others/feed/ 0