Jio 5G vs Airtel 5G: जियो की एयरटेल? कोणाचं 5G आहे वेगवान? स्पीड टेस्टचे रिझल्ट आले समोर

Jio 5G and Airtel 5G download speed: भारतात रिलायन्स जियो आणि एयरटेलची 5G सर्व्हिस सुरु झाली आहे. सर्वप्रथम 5G लाँच करून Airtel नं जियोला मागे टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु ओकला स्पीडटेस्टच्या मंथली रिपोर्टमध्ये जोरदार झटका लागला आहे. या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की Airtel 5G च्या तुलनेत Jio 5G चा इंटरनेट स्पीड बेस्ट आहेत. मुकेश अंबानींची टेलीकॉम कंपनी भारतातील प्रमुख शहरांमध्ये एयरटेल पेक्षा चांगला स्पीड ऑफर करत आहे. Ookla च्या SpeetTest रिपोर्ट्स मध्ये सांगण्यात आलं आहे की जियोचा 5G स्पीड डाउनलोड 606.53Mbps ते 875.26Mbps पर्यंत आहे ज्यात C-बँड का वापर करण्यात आला आहे. तर एयरटेल 5G चा स्पीड 365.48 Mbps ते 716.85 Mbps पर्यंत आहे.

Ookla नं चार प्रमुख शहरांमध्ये रिलायन्स जियो आणि एयरटेलच्या 5G नेटवर्क मध्ये सरासरी 5G डाउनलोड स्पीडचा डेटा शेयर केला आहे. पुढे आम्ही तुम्हाला Airtel 5G आणि Jio 5G च्या वेगवेगळ्या शहरांच्या सरासरी स्पीडची माहिती दिली आहे.

Jio 5G and Airtel 5G download speed

जियो आणि एयरटेलच्या 5G नेटवर्कच्या दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीमध्ये 5G स्पीडची सरासरी पाहता स्पीडच्या बाबतीत जियोनं एयरटेल खूप मागे टाकलं आहे. हे देखील वाचा: एकच नंबर! 84 दिवस रोज 5GB Data, रात्री वापरलेल्या डेटा पॅकमधून कट होणार नाही

5G download speed Delhi

दिल्ली मधील स्पीड पाहता ओकलानुसार दिल्लीमध्ये जियोचा सरासरी 5G डाउनलोड स्पीड 600Mbps आहे. तर एयरटेलच्या 5G नेटवर्कवर सरासरी डाउनलोडिंग स्पीड 197.98 Mbps आहे.

5G download speed Mumbai

मुंबईमध्ये मुकेश अंबानीच्या टेलीकॉम सर्व्हिस Jio च्या 5G नेटवर्कवर 514.38Mbps सरासरी डाउनलोडिंग स्पीड मिळतो. तर एयरटेल 5G नेटवर्क इथे देखील डाउनलोडिंगमध्ये मागे आहे. Airtel 5G चा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 271.01Mbps आहे.

5G download speed Kolkata

कोलकातामध्ये रिलायन्स जियोच्या 5G नेटवर्कचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड 482.02Mbps आहे. तसेच एयरटेल 5G सर्व्हिसनं कोलकात्यात युजर्सना खूप त्रास दिला आहे. कोलकात्यात एयरटेलचा सरासरी 5G डाउनलोड स्पीड फक्त 33.83Mbps आहे.

5G download speed Varanasi

चार पैकी तीन शहरांमध्ये रिलायन्स जियोचा 5G डाउनलोडिंग स्पीड जास्त असला तरी वाराणसीमध्ये एयरटेलनं बाजी मारली आहे. वाराणसीमध्ये एयरटेलचा सरासरी स्पीड 516.57Mbps आहे. तर जियोचा स्पीड 485.22Mbps आहे. हे देखील वाचा: OPPO A98 वेबसाइटवर लिस्ट! 12GB RAM, 108MP Camera आणि 67W Fast Charging सह येईल बाजारात

जियोच्या स्पीडचं कारण

रिलायन्स जियोचा सरासरी डाउनलोडिंग स्पीड चांगला असण्यामागे कारण म्हणजे स्पेक्ट्रम लिलावात कंपनीनं सर्वात जास्त स्पेक्ट्रम मिळवले आहेत. खासकरून जियोकडे जास्त मागणी असलेला C-बँड स्पेक्ट्रम आहे. भारतात 700 मेगाहर्ट्ज स्पेक्ट्रम बँड फक्त अंबानींच्या टेलीकॉम कंपनीकडे आहे. त्यामुळेच रिलायन्स जियो अन्य कंपन्या जसे की वोडाफोन आयडिया (विआय) आणि एयरटेलपेक्षा चांगला स्पीड देत आहे. 700 मेगाहर्ट्ज लो-बँड स्पेक्ट्रम आहे, जो शहरी आणि ग्रामीण भागात चांगली इंडोर कव्हरेज ऑफर करतो.

रिलायन्स जियोच्या सी-बँडमध्ये 5G चा सरासरी डाउनलोड स्पीड 606.53Mbps आणि 875.26 Mbps दरम्यान होता. तर दुसरीकडे जियोच्या 700 मेगाहर्ट्ज फ्रिक्वेन्सी बँड दरम्यान सरासरी 5G स्पीड 78.69 Mbps ते 95.13 Mbps दरम्यान असतो. एयरटेलच्या C-बँड स्पेक्ट्रमचा सरासरी 5G डाउनलोड स्पीड 365.48 Mbps ते 716.85 Mbps दरम्यान राहील आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here