शक्तिशाली प्रोसेसर अत्यंत कमी किंमतीत; वनप्लसला धोबीपछाड देण्यासाठी येतेय Redmi K60 Series

Redmi k60

शाओमी आपल्या रेडमी ब्रँड अंतर्गत के सीरिज स्मार्टफोन सादर करत असते, जे कमी किंमतीत फ्लॅगशिप अनुभव देतात. आता बातम्या येत आहे की कंपनी आपल्या नवीन Redmi K60 series वर काम करत आहे जी डिसेंबरमध्ये टेक मंचावर येऊ शकते. कंपनीनं अधिकृतपणे माहिती दिली नाही परंतु चर्चा आहे की सीरीज अंतगर्त Redmi K60, Redmi K60 Pro आणि Redmi K60 Gaming Edition लाँच केले जातील. आज एक नवीन लीकमध्ये या सीरीजच्या कॅमेरा सेग्मेंटचे डिटेल्स देखील समोर आले आहेत. पुढे माहिती देण्यात आली आहे की रेडमी के60, रेडमी के60 प्रो आणि रेडमी के60 गेमिंग 5जी फोन कोणत्या स्पेसिफिकेशन्ससह येतील.

Redmi K60 Series चा कॅमेरा

रेडमी के60 सीरीजच्या कॅमेरा सेगमेंटची माहिती डिजिटल चॅट स्टेशनच्या माध्यमातून समोर आली आहे. लीकनुसार Redmi K60 Pro स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. तसेच Redmi K60 Gaming 5G फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. तसेच सीरीजचा बेस मॉडेल Redmi K60 स्मार्टफोन 48 मेगापिक्सल कॅमेरा लेन्ससह लाँच केला जाईल. लीकनुसार Redmi K60 Series चे सर्व स्मार्टफोन optical image stabilisation (OIS) ला सपोर्ट करतील. हे देखील वाचा: Jio 5G vs Airtel 5G: जियो की एयरटेल? कोणाचं 5G आहे वेगवान? स्पीड टेस्टचे रिझल्ट आले समोर

Redmi K60 Series चा प्रोसेसर

लीकनुसार रेडमी के60 स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 8200 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. हा चिपसेट 3.1गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर काम करू शकतो. तसेच रेडमी के60 प्रो मीडियाटेक डिमेनसिटी 9200 चिपसेटसह बाजारात येईल. लीकनुसार खास गेमिंगच्या चाहत्यांसाठी बनवण्यात येत असलेला रेडमी के60 गेमिंग एडिशन पावरफुल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह बाजारात लाँच केला जाऊ शकतो. जो क्वॉलकॉमचा आगामी फ्लॅगशिप प्रोसेसर असेल.

अन्य फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता या सीरीजमध्ये 144हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला 2के डिस्प्ले दिला जाऊ शकतो. पवार बॅकअपसाठी 5,500एमएएच बॅटरी आणि 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते. आशा आहे की कंपनी पुढील काही दिवसांत ही सीरीज टीज करण्यास सुरुवात करेल तसेच Redmi K60, Redmi K60 Pro आणि K60 Gaming 5G चा लाँच अनाउंस करेल. हे देखील वाचा: एकच नंबर! 84 दिवस रोज 5GB Data, रात्री वापरलेल्या डेटा पॅकमधून कट होणार नाही

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here