13 हजारांच्या बजेटमध्ये Redmi चा 5G Phone; क्वॉलकॉमच्या नव्या प्रोसेसरसह Redmi Note 12 5G लाँच

Redmi Note 12 5G Launch price specifications details

Redmi Note 12 Launched: Redmi Note 12 Pro series मध्ये Redmi Note 12 Pro, Redmi Note 12 Pro+ आणि Redmi Note 12 Explorer Edition लाँच करण्यासोबतच रेडमी ब्रँडनं रेडमी नोट 12 देखील टेक मंचावर सादर केला आहे. Redmi Note 12 5G स्मार्टफोन 120Hz AMOLED Display, 48MP Camera, Qualcomm Snapdragon 4 Gen 1 चिपसेट आणि 33W Fast Charging सारख्या स्पेसिफिकेशन्सना सपोर्ट करतो ज्याची संपूर्ण माहिती पुढे देण्यात आली आहे.

Redmi Note 12 5G Specifications

Redmi Note 12 अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 13 वर लाँच झाला आहे ज्यात ऑक्टाकोर प्रोसेसरसह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे. रेडमी नोट 12 स्मार्टफोनमध्ये 8 जीबी पर्यंतच्या रॅम तसेच 256 जीबी पर्यंतच्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन LPDDR4x RAM आणि UFS 2.2 storage टेक्नॉलॉजीवर चालतो. हे देखील वाचा: 210W Fast Charging आणि 200MP Camera! तुमच्या बजेटमध्ये आला Redmi Note 12 Explorer Edition, 9 मिनिटांत फुल चार्ज

Redmi Note 12 5G Launch price specifications details

रेडमी नोट 12 स्मार्टफोन 2400 x 1080 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच झाला आहे. पंच-होल स्टाइल ही स्क्रीन सॅमसंग अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 120हर्ट्ज रिफ्रेश रेट तसेच 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. या फोनच्या डिस्प्लेमध्ये 1200निट्स पिक ब्राइटनेस, 4096लेव्हल डिमिंग, 4500000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.

Redmi Note 12 5G Launch price specifications details

फोटोग्राफीसाठी रेडमी नोट 12 स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 2 मेगापिक्सल डेप्थ सेन्सरसह चालतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Redmi Note 12 मोबाइल फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Redmi Note 12 5G Launch price specifications details

Redmi Note 12 ड्युअल सिम फोन आहे जो 5जी व 4जी दोन्ही नेटवर्कवर चालतो. 3.5एमएम जॅक आणि आयआर ब्लास्टर सोबतच या स्मार्टफोनमध्ये सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे पावर बॅकअपसाठी हा स्मार्टफोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. रेडमी नोट 12 आयपी53 रेटेड आहे त्यामुळे हा फोन वॉटर प्रूफ बनतो. हे देखील वाचा: जबरदस्त! सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत 200MP Camera! दमदार Redmi Note 12 Pro आणि Note 12 Pro Plus लाँच

Redmi Note 12 5G Price

रेडमी नोट 12 चार व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 4 जीबी रॅमसह 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 1199 युआन म्हणजे 13,700 रुपयांच्या आसपास आहे. तसेच 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 1299 युआन म्हणजे भारतीय करंसीनुसार 14,700 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. Redmi Note 12 8GB + 128GB मॉडेल 1,499 युआन (जवळपास 17,000 रुपये) मध्ये तसेच 8GB + 256GB स्टोरेज मॉडेल व्हेरिएंट 1699 युआन (जवळपास 19,200 रुपये) मध्ये लाँच केला गेला आहे. रेडमी नोट 12 स्मार्टफोन black, white आणि blue कलरमध्ये विकत घेता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here