UPI - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Mon, 03 Jul 2023 04:34:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 चुकीच्या UPI ID वर पाठवले पैसे? अशाप्रकारे मिळवा रिफंड, जाणून घ्या प्रोसेस https://www.91mobiles.com/marathi/transferred-money-to-wrong-upi-id-know-what-you-should-do-to-get-refund/ https://www.91mobiles.com/marathi/transferred-money-to-wrong-upi-id-know-what-you-should-do-to-get-refund/#respond Sun, 02 Jul 2023 03:45:16 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17679 UPI मुळे भारतीयांचं आयुष्य मोठ्या प्रमाणावर बदललं आहे. लोक आता कॅशच्या ऐवजी स्मार्टफोनचा वापर करून थेट बँक अकाऊंट्समधून पैसे ट्रांसफर करतात. UPI सिस्टम सुरक्षित आहे परंतु तरीही यात अनेकदा समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा पैसे डेबिट झाल्यानंतर ट्रँजॅक्शन अडकतं किंवा लोक UPI फ्रॉडला बळी पडतात. कधी कधी तर चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे जातात. भारतीय युपीआयवरून पैसे […]

The post चुकीच्या UPI ID वर पाठवले पैसे? अशाप्रकारे मिळवा रिफंड, जाणून घ्या प्रोसेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
UPI मुळे भारतीयांचं आयुष्य मोठ्या प्रमाणावर बदललं आहे. लोक आता कॅशच्या ऐवजी स्मार्टफोनचा वापर करून थेट बँक अकाऊंट्समधून पैसे ट्रांसफर करतात. UPI सिस्टम सुरक्षित आहे परंतु तरीही यात अनेकदा समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा पैसे डेबिट झाल्यानंतर ट्रँजॅक्शन अडकतं किंवा लोक UPI फ्रॉडला बळी पडतात. कधी कधी तर चुकीच्या अकाऊंटमध्ये पैसे जातात.

भारतीय युपीआयवरून पैसे पाठवण्याआधी समोरच्याचा नंबर घेतात, त्याला ‘hi’ पाठवतात आणि नंतर एक रुपया पाठवून कन्फर्म करतात. एवढी काळजी घेऊन तसेच युपीआयमध्ये सेफ्टी फीचर्स असून देखील चुका होतात. युजर घाई घाईत चुकीच्या फोन नंबर किंवा QR कोडवर पैसे पाठवतात. त्यामुळे ज्या व्यक्तीला पैसे जायला हवे त्याला जात नाहीत आणि चुकीच्या अकाऊंटवर गेलेले पैसे पुन्हा कसे मिळवायचे हे अनेकांना माहित देखील नसतं. परंतु यावर काही उपाय आहेत.

UPI अ‍ॅप सपोर्टचा वापर करा

RBI च्या गाईडलाइन्सनुसार, युजरने सर्वप्रथम पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडरकडे चुकीचं ट्रँजॅक्शन रिपोर्ट केला पाहिजे. GPay, PhonePe, Paytm किंवा UPI अ‍ॅपच्या कस्टमर केयर सपोर्ट द्वारे ट्रँजॅक्शन रिपोर्ट करावं. ग्राहकांना सहकार्य करण्यासाठी सर्व्हिस प्रोव्हायडर्सकडे सिस्टम आहेत. तुम्ही तुमची समस्या फ्लॅग करू शकता आणि रिफंडची मागणी करू शकता. हे देखील वाचा: Instagram Video Download: इन्स्टाग्रामवरील कोणताही व्हिडीओ डाउनलोड करण्याची सर्वात सोपी ट्रिक

NPCI पोर्टलवर नोंदवा तक्रार

जर UPI अ‍ॅपच्या कस्टमर्स सर्व्हिसकडून जास्त मदत मिळाली नाही, तर तुम्ही NPCI पोर्टलवर देखील तक्रार करू शकता. यासाठी…

  • NPCI च्या ऑफिशियल वेबसाइट npci.org.in वर जा.
  • त्यानंतर ‘What we do tab’ वर क्लिक करा
  • त्यानंतर UPI वर टॅप करा
  • मग Dispute Redressal Mechanism सिलेक्ट करा
  • कम्प्लेंट सेक्शन मध्ये UPI ट्रँजॅक्शन आयडी, व्हर्च्युअल पेमेंट अ‍ॅड्रेस, ट्रांसफर केलेली अमाउंट, ट्रँजॅक्शन डेट, ईमेल आयडी आणि मोबाइल नंबरसह तुम्ही सर्व ट्रँजॅक्शन डिटेल द्या.
  • कम्प्लेंटचे कारण ‘Incorrectly transferred to another account’ निवडा.
  • तुमची तक्रार सबमिट करा.

बँकेशी करा संपर्क

अजूनही जर तुमच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नसेल तर तुम्ही पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर बँक आणि त्यानंतर बँक (जिथे रिसिव्हर कस्टमरचे अकाऊंट असेल) कडे तक्रार PSP अ‍ॅप/TPAP अ‍ॅपवर पाठवू शकता. हे देखील वाचा: ‘No Network’ मध्ये देखील फोनवरून करता येतो कॉल; जाणून घ्या ही शानदार ट्रिक

The post चुकीच्या UPI ID वर पाठवले पैसे? अशाप्रकारे मिळवा रिफंड, जाणून घ्या प्रोसेस first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/transferred-money-to-wrong-upi-id-know-what-you-should-do-to-get-refund/feed/ 0
UPI अ‍ॅप्स भीम, पेटीएम, गुगल पे आणि फोनपे मधून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा, जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/paytm-google-pay-and-phonepe-madhun-bank-account-check/ https://www.91mobiles.com/marathi/paytm-google-pay-and-phonepe-madhun-bank-account-check/#respond Mon, 12 Jun 2023 03:35:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20202 यूपीआय (यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) आधारित डिजिटल पेमेंट्स अ‍ॅप भीम, पेटीएम, गुगल पे (जीपे) आणि फोनपेच्या मदतीनं युजर्स एकमेकांना ऑनलाइन पैसे पाठवू शकतात, खरेदीनंतर पेमेंट करू शकतात आणि गरज पडल्यास फोन रिचार्ज व बिलचं पेमेंट करू शकतात. यासाठी युजर्सना हे अ‍ॅप्स आपल्या बँक अकाऊंटशी लिंक करावे लागतात. परंतु तुम्हाला माहित आहे का भीम, पेटीएम, जीपे आणि […]

The post UPI अ‍ॅप्स भीम, पेटीएम, गुगल पे आणि फोनपे मधून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • यूपीआय अ‍ॅप्स मधून बँक बॅलेन्स चेक करता येतो.
  • भारतात डिजिटल पेमेंटसाठी यूपीआय खूप लोकप्रिय आहे.
  • भीम, पेटीएम, फोनपे प्रमुख यूपीआय आधारित अ‍ॅप आहेत.

यूपीआय (यूनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) आधारित डिजिटल पेमेंट्स अ‍ॅप भीम, पेटीएम, गुगल पे (जीपे) आणि फोनपेच्या मदतीनं युजर्स एकमेकांना ऑनलाइन पैसे पाठवू शकतात, खरेदीनंतर पेमेंट करू शकतात आणि गरज पडल्यास फोन रिचार्ज व बिलचं पेमेंट करू शकतात. यासाठी युजर्सना हे अ‍ॅप्स आपल्या बँक अकाऊंटशी लिंक करावे लागतात. परंतु तुम्हाला माहित आहे का भीम, पेटीएम, जीपे आणि फोनपे मधून लिंक्ड बँक अकाऊंटचा बॅलेन्स तुम्ही सहज चेक करू शकता. पुढे आम्ही या अ‍ॅप्स मधून बँक बॅलेन्स चेक करण्याची पद्धत सांगितली आहे.

भीम अ‍ॅप मधून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा?

स्टेप 1 : तुमच्या फोनमध्ये भीम अ‍ॅप ओपन करा.

स्टेप 2 : सर्वात वर बँक अकाऊंट्सवर क्लिक करा.

स्टेप 3 : ज्या बँकेचं अकाऊंट चेक करायचं आहे त्याच्या चेक बँलेन्स ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 3 : यूपीआय पिन टाकून तुम्ही बँक बॅलेन्स चेक करू शकता.

पेटीएम मधून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा?

स्टेप 1 : सर्वप्रथम फोनमध्ये Paytm अ‍ॅप सिलेक्ट करा.

स्टेप 2 : नंतर बॅलेन्स अँड हिस्ट्री ऑप्शनवर क्लिक करा.

स्टेप 3 : तिथे बँकेच्या नावासमोरील चेक बॅलेन्स बटनवर टॅप करा.

स्टेप 4 : तुमचा यूपीआय पिन टाकून तुम्ही तुमचा बँक अकाऊंट बॅलेन्स चेक करू शकता.

जीपे मधून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा?

स्टेप 1 : तुमच्या स्मार्टफोनमध्ये गुगल पे अ‍ॅप ओपन करा.

स्टेप 2 : होम पेजवर थोडं स्क्रोल केल्यावर चेक बँक बॅलेन्सचा ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

स्टेप 3 : यूपीआय पिन टाकून सबमिट बटनवर टॅप करा आणि बँक बॅलेन्स चेक करा.

फोनपेवरून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा?

स्टेप 1 : तुमच्या फोनमध्ये फोन पे अ‍ॅप ओपन करा.

स्टेप 2 : होम स्क्रीनवर मनी ट्रांसफर सेक्शनवर चेक बँक बॅलेन्स ऑप्शनवर टॅप करा.

स्टेप 3 : आता तुमची बँक सिलेक्ट करा आणि यूपीआय पिन एंटर करून बँक बॅलेन्स पाहू शकता.

यूपीआय आधारित अ‍ॅप्स भीम, पेटीएम, गुगल पे आणि फोनवर युजर्स एकापेक्षा जास्त बँक अकाऊंट लिंक करू शकतात. डिजिटल पेमेंटसह युजर्स सहज आपलं बँक बॅलेन्स चेक करू शकतात आणि अ‍ॅप मधून केलेले ट्रँजॅक्शन देखील बघू शकतात.

The post UPI अ‍ॅप्स भीम, पेटीएम, गुगल पे आणि फोनपे मधून बँक बॅलेन्स कसा चेक करायचा, जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/paytm-google-pay-and-phonepe-madhun-bank-account-check/feed/ 0
फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास पेटीएम, गुगल पे, फोनपे कसं करायचं ब्लॉक, जाणून घ्या पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-payment-apps/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-payment-apps/#respond Wed, 03 May 2023 12:21:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20674 भारतात डिजिटल पेमेंटसाठी लोक PhonePe, Google Pay, Paytm इत्यादी सारखे पेमेंट अ‍ॅप्स मोठ्याप्रमाणावर वापरता येतात. बहुतांश लोकांच्या स्मार्टफोनमध्ये कोणतं ना कोणतं UPI App असतंच. परंतु जर तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर हे पेमेंट अ‍ॅप्स ब्लॉक करणे आवश्यक आहे, नाही तर तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. चला जाणून घेऊया पेटीएम, गुगल पे किंवा फोन […]

The post फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास पेटीएम, गुगल पे, फोनपे कसं करायचं ब्लॉक, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
भारतात डिजिटल पेमेंटसाठी लोक PhonePe, Google Pay, Paytm इत्यादी सारखे पेमेंट अ‍ॅप्स मोठ्याप्रमाणावर वापरता येतात. बहुतांश लोकांच्या स्मार्टफोनमध्ये कोणतं ना कोणतं UPI App असतंच. परंतु जर तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर हे पेमेंट अ‍ॅप्स ब्लॉक करणे आवश्यक आहे, नाही तर तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. चला जाणून घेऊया पेटीएम, गुगल पे किंवा फोन पे अकाऊंट ब्लॉक करण्याची पद्धत.

पेटीएम अकाऊंट

फोन चोरी झाल्यास किंवा हरवल्यास तुमचं Paytm account तात्पुरतं ब्लॉक करता येतं. त्यासाठी पद्धत खूप सोपी आहे.

  • पेटीएम पेमेंट्स बँक हेल्पलाइन नंबर 01204456456 वर कॉल करा. लॉस्ट फोनचा पर्याय निवडा त्यानंतर एक वेगळा नंबर नोंदवण्याचा पर्याय निवडा आणि तुमचा हरवलेला फोन नंबर नोंदवा.
  • हे देखील वाचा: PDF Files एडिट करण्याची सोपी पद्धत; दोन फाइल मर्जही करता येणार

  • त्यानंतर सर्व डिवाइसेसवरून लॉग-आउट करण्याचा पर्याय निवडू शकता. त्यानंतर पेटीएम वेबसाइटवर जा आणि 24×7 हेल्प लाइनची निवड करण्यासाठी खाली स्क्रॉल करा. इथे ‘रिपोर्ट अ फ्रॉड’ चा ऑप्शन निवडा आणि कोणत्याही श्रेणीवर क्लिक करा.
  • त्यानंतर ‘एनी इश्यू’ वर क्लिक करा आणि सर्वात खाली ‘मेसेज अस’ बटनवर क्लिक करा. आता तुम्हाला अकाऊंट ऑनरशिपचा पुरावा द्यावा लागेल ज्यात डेबिट/क्रेडिट कार्डची माहिती, पेटीएम अकाऊंटवरील व्यवहार, पेटीएम अकाऊंटवरील व्यवहारचा एक कंफर्मेशन ईमेल किंवा एसएमएस, फोन नंबरच्या मालकीचा पुरावा किंवा हरवलेल्या फोनची पोलीस कंप्लेंट प्रूफ म्हणून वापरता येईल. ही माहिती दिल्यानंतर पेटीएम तुमचं अकाऊंट ब्लॉक करेल. त्यानंतर तुम्हाला कंफर्मेशन मेसेज मिळेल.
  • गुगल पे अकाऊंट

    जर तुमच्या फोनवर पेमेंटसाठी गुगल पे अकाऊंटचा वापर करत असाल तर फोन चोरी झाल्यास किंवा हरवल्यास ब्लॉक करता येईल.

  • Google Pay Account ब्लॉक करण्यासाठी युजर्स हेल्पलाइन नंबर 18004190157 वर कॉल करू शकता आणि आवडीची भाषा निवडू शकता.
  • इथे ‘अदर इश्यू’ चा पर्याय निवडा. त्यानंतर एक्सपर्टकडे बोलण्याचा पर्याय निवडा जो तुमचं गुगल प्ले अकाऊंट ब्लॉक करण्यास मदत करेल. तसेच अँड्रॉइड युजर आपला डेटा रिमोटली देखील डिलीट करू शकतात.
  • फोनपे अकाऊंट

    तुमचं फोन पे अकाऊंट देखील तुम्ही सहज ब्लॉक करू शकता. यासाठी पुढील स्टेप फॉलो करा.

  • फोन पे युजर्सना 08068727374 किंवा 02268727374 वर कॉल करावा लागेल. आवडीची भाषा निवडल्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल की तुमच्या Phonepe Account मधील एखादी समस्या रिपोर्ट करायची आहे का? त्यानुसार नंबर दाबा.
  • त्यानंतर तुम्हाला रजिस्टर नंबर टाका आणि कन्फर्मेशनसाठी एक OTP पाठवला जाईल. त्यानंतर ओटीपी प्राप्त न झाल्याचा पर्याय निवडा. तुम्हाला सिम किंवा डिवाइस हरवल्याची पर्याय दिला जाईल, त्यातून निवड करा.
  • हे देखील वाचा: Facebook Video अँड्रॉइड आणि आयफोनवर कसा करायचा डाउनलोड, जाणून घ्या पद्धत

  • त्यानंतर एक प्रतिनिधीकडे कॉल ट्रान्सफर केला जाईल, जे काही फोन नंबर, ईमेल आयडी, शेवटचं पेमेंट, इत्यादी माहिती विचारतील. त्यानंतर फोन पे अकाऊंट ब्लॉक करण्यास तुमची मदत केली जाईल. अशाप्रकारे हरवलेल्या फोनमधील पेमेंट्स अ‍ॅप्स ब्लॉक करता येतील.
  • The post फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास पेटीएम, गुगल पे, फोनपे कसं करायचं ब्लॉक, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/how-to-block-payment-apps/feed/ 0
    इंटरनेटविना करा UPI Payment; बटनवाल्या फोनवरून देखील होतील पैसे ट्रान्सफर, जाणून घ्या पद्धत https://www.91mobiles.com/marathi/upi-payment-without-internet/ https://www.91mobiles.com/marathi/upi-payment-without-internet/#respond Thu, 27 Apr 2023 12:32:26 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20533 तुमच्यासोबत देखील कधी तरी असं झालं असेल की यूपीआयनं पैसे पाठवायचे आहेत परंतु तुमच्या फोनमध्ये इंटरनेटच चालत नाही? अशावेळी खूप अडचण होते. Paytm, PhonePe किंवा Google Pay असो किंवा इतर डिजिटल वॉलेट, गरज असताना जेव्हा हे बंद पडतात तेव्हा राग येतोच. परंतु आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत जिच्या माध्यमातून तुम्ही इंटरनेटविना UPI Payment […]

    The post इंटरनेटविना करा UPI Payment; बटनवाल्या फोनवरून देखील होतील पैसे ट्रान्सफर, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    तुमच्यासोबत देखील कधी तरी असं झालं असेल की यूपीआयनं पैसे पाठवायचे आहेत परंतु तुमच्या फोनमध्ये इंटरनेटच चालत नाही? अशावेळी खूप अडचण होते. Paytm, PhonePe किंवा Google Pay असो किंवा इतर डिजिटल वॉलेट, गरज असताना जेव्हा हे बंद पडतात तेव्हा राग येतोच. परंतु आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत जिच्या माध्यमातून तुम्ही इंटरनेटविना UPI Payment करू शकता.

    बिना इंटरनेट यूपीआय पेमेंट कसं करायचं

    साधारणतः UPI Payment साठी आपण एखाद्या डिजिटल वॉलेट किंवा अ‍ॅपची मदत घेतो. परंतु भारत सरकार आणि NPCI (National Payments Corporation of India) नं यूएसएसडी (अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंट्री सर्व्हिस डेटा) आधारित मोबाइल बँकिंग सर्व्हिस देखील जारी केली आहे जिच्या माध्यमातून इंटरनेटविना यूपीआय पेमेंट करता येतं. हा USSD कोड *99# आहे.

    Offline UPI Payments कसं करायचं

    1) Offline UPI Payments साठी सर्वप्रथम तुमच्या फोनवरून *99# डायल करा.

    2) USSD कोडवरील कॉल लागल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरशी लिंक बँक अकाऊंटची माहिती समोर येईल.

    3) बँक अकाऊंटच्या नावासमोर पुढील सात ऑप्शन्स दिसतील:

  • Send Money (पैसे पाठवणे)
  • Request Money (पैशांची विनंती पाठवणे)
  • Check Balance (बॅलेन्स चेक करणे)
  • My Profile (प्रोफाईल)
  • Pending Request ( पेंडिंग रिक्वेस्ट)
  • Transactions (ट्रँजॅक्शन्स)
  • UPI PIN (यूपीआय पिन)
  • 4) पैसे पाठवण्यासाठी पहिला पर्याय ‘सेंड मनी’ निवडा आणि 1 लिहून रिप्लाय करा.

    5) समोर चार ऑप्शन येतील, यातील एका पर्यायाची निवड करा. ऑप्शन्स असे असतील:

  • Mobile No. (मोबाइल नंबर)
  • UPI ID (यूपीआय आयडी)
  • Saved Beneficiary (सेव्ड बेनिफिशियरी)
  • IFSC, A/C No. (आयएफएससी, अकाऊंट नंबर)
  • 6) जर तुम्हाला मोबाइल नंबरवर पैसे पाठवायचे असतील तर 1 लिहून रिप्लाय करा.

    7) आता तो फोन नंबर टाका ज्यावर पैसे पाठवायचे आहेत.

    8) फोन नंबर लिहून सेंड बटन प्रेस करताच त्या नंबरच्या मालकाचे नाव समोर येईल.

    9) पुढे तुम्हाला रक्कम टाकावी लागेल, जे पैसे तुम्हाला त्या नंबरवर पाठवायचे आहेत.

    10) रक्कम टाकल्यानंतर ‘रिमार्क’ लिहण्याचा पर्याय देखील येईल, यात तुम्ही पैसे पाठवण्याचे कारण टाकू शकता.

    11) जर रिमार्क नको असेल तर 1 लिहून रिप्लाय करा.

    12) तुमच्या मोबाइल स्क्रीनवर सुरु असलेल्या ट्रँजॅक्शनची माहिती येईल ज्यात पाठवत असलेले पैसे आणि नंबर दोन्ही दिसतील.

    13) डिटेल्स योग्य असतील तर तुमचा यूपीआय पिन टाकून रिप्लाय करा.

    14) UPI PIN टाकताच तुमच्या अकाऊंटवरून पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये जातील आणि त्याचा रेफरेंस आयडी सोबतच कंफर्मेशन तुमच्या मोबाइल स्क्रीनवर येईल.

    The post इंटरनेटविना करा UPI Payment; बटनवाल्या फोनवरून देखील होतील पैसे ट्रान्सफर, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/upi-payment-without-internet/feed/ 0
    यूपीआयशी क्रेडिट कार्ड जोडण्याची सोपी पद्धत जाणून घ्या https://www.91mobiles.com/marathi/credit-cardne-upi-payment-karnyachi-paddhat/ https://www.91mobiles.com/marathi/credit-cardne-upi-payment-karnyachi-paddhat/#respond Fri, 21 Apr 2023 11:39:34 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20396 देशात यूपीआयनं डिजिटल पेमेंट लोकप्रिय केलं आहे. यूपीआयमध्ये आधी युजर्स फक्त बँक अकाऊंट द्वारे पेमेंट करू शकत होते परंतु आता क्रेडिट कार्डनं देखील पेमेंट करू शकतात. यूपीआयशी सध्या फक्त रूपे क्रेडिट कार्डच लिंक करता येतात. तसेच हे पेमेंट फक्त मर्चेंट क्यूआर कोड स्कॅन केल्यावर करता येईल. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मित्राला पैसे ट्रांसफर करायचे असतील […]

    The post यूपीआयशी क्रेडिट कार्ड जोडण्याची सोपी पद्धत जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • आता तुम्ही यूपीआय पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड देखील वापरता येतं.
    • सध्या काही बँकांच्या रुपे क्रेडिट कार्डवर ही सुविधा उपलब्ध आहे.
    • इथे आम्ही यूपीआय अ‍ॅपशी क्रेडिट कार्ड लिंक करण्याची पद्धत सांगितली आहे.

    देशात यूपीआयनं डिजिटल पेमेंट लोकप्रिय केलं आहे. यूपीआयमध्ये आधी युजर्स फक्त बँक अकाऊंट द्वारे पेमेंट करू शकत होते परंतु आता क्रेडिट कार्डनं देखील पेमेंट करू शकतात. यूपीआयशी सध्या फक्त रूपे क्रेडिट कार्डच लिंक करता येतात. तसेच हे पेमेंट फक्त मर्चेंट क्यूआर कोड स्कॅन केल्यावर करता येईल. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या मित्राला पैसे ट्रांसफर करायचे असतील तर तुम्हाला बँक टू बँक ट्रँजॅक्शन करावं लागेल.

    क्रेडिट कार्डनं यूपीआय पेमेंट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला यूपीआय पेमेंट अ‍ॅपशी क्रेडिट कार्ड लिंक करावं लागेल. या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला यूपीआय अ‍ॅप मध्ये पेमेंटसाठी क्रेडिट कार्ड कसं लिंक करायचं याची माहिती देत आहोत. तसेच यूपीआय पेमेंटमध्ये क्रेडिट कार्ड कस वापरायचं हे देखील सांगणार आहोत.

    यूपीआय पेमेंट अ‍ॅपशी क्रेडिट कार्ड लिंक करण्याची पद्धत

    BHIM अ‍ॅपमध्ये क्रेडिट कार्ड लिंक कसं करायचं

    स्टेप 1: सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉइड किंवा आयओस डिवाइसमध्ये BHIM अ‍ॅप ओपन करा.

    स्टेप 2: नंतर भीम अ‍ॅपमध्ये लॉग इन करा.

    स्टेप 3: मग ‘Bank Accounts’ सेक्शनवर क्लिक करा.

    स्टेप 4: इथे + आयकॉनवर क्लिक करा. पुढील पेजवर तुम्हाला अ‍ॅड क्रेडिट कार्डच्या ऑप्शनवर क्लिक करा.

    स्टेप 5: आता क्रेडिट कार्ड इश्यू करणारी बँक सिलेक्ट करा आणि क्रेडिट कार्डशी संबंधित सर्व माहिती काळजीपूर्वक भरा आणि ओटीपी टाकून सबमिट करा.

    फोनपेमध्ये क्रेडिट कार्ड लिंक कसं करायचं

    स्टेप 1: सर्वप्रथम फोनमध्ये फोनपे ओपन करा आणि प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.

    स्टेप 2: आता व्यू ऑल पेमेंट मेथड ऑप्शन सिलेक्ट करा.

    स्टेप 3: नवीन पेजवर क्रेडिट/डेबिट कार्ड ऑप्शनवर टॅप करून कार्डची माहिती भरा आणि ओटीपी टाकून सबमिट करा.

    GPay मध्ये क्रेडिट कार्ड कसं लिंक करायचं

    स्टेप 1: सर्वप्रथम फोनमध्ये GPay अ‍ॅप ओपन करा आणि प्रोफाईल फोटोवर क्लिक करा.

    स्टेप 2: इथे तुम्हाला सेट या अप पेमेंट मेथड किंवा पे बिजनेससवर क्लिक करा.

    स्टेप 3: मग क्रेडिट कार्ड सिलेक्ट करा म्हणजे कार्ड स्कॅनसाठी कॅमेरा ओपन होईल. तुम्ही मॅन्युअली देखील कार्ड डिटेल्स टाकू शकता.

    स्टेप 4: आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर ओटीपी येईल तो भरा आणि कार्ड लिंक होईल.

    क्रेडिट कार्डनं यूपीआय पेमेंट कसं करायचं

    यूपीआयशी लिंक क्रेडिट कार्ड फक्त मर्चेंट अकाऊंटमध्ये पेमेंट करू शकेल. मर्चेंट क्यूआर कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला बँक किंवा क्रेडिट कार्ड सिलेक्ट करण्याचा ऑप्शन दिसेल. क्रेडिट कार्ड सिलेक्ट करा आणि प्रोसीड बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या फोनवर ओटीपी येईल. तो सबमिट केल्यावरच पेमेंट पूर्ण होईल. लक्षात असू दे 2000 रुपयांपेक्षा जास्त पेमेंट वर 1.1 टक्के चार्ज द्यावा लागेल. त्यापेक्षा कमी ट्रँजॅक्शन फ्री असतील.

    यूपीआय सध्या या बँकांच्या रुपे कार्डला सपोर्ट करतो.

    • एचडीएफसी बँक
    • इंडियन बँक
    • पंजाब नॅशनल बँक
    • यूनियन बँक
    • बँक ऑफ बडोदा
    • कॅनरा बँक

    The post यूपीआयशी क्रेडिट कार्ड जोडण्याची सोपी पद्धत जाणून घ्या first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/credit-cardne-upi-payment-karnyachi-paddhat/feed/ 0
    UPI PIN without ATM card: ATM कार्डविना सेट करा UPI PIN, जाणून घ्या सोपी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-set-upi-pin-without-atm-card/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-set-upi-pin-without-atm-card/#respond Fri, 06 Jan 2023 11:39:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16637 देशात डिजिटल आणि कॅशलेस पेमेंटला चालना देण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NCPI) नं UPI (यूनिफाइड पेमेंट इंटरफेस) मजबूत करण्यासाठी नवीन सिस्टम आणली आहे. आता युजर्सना UPI पिन सेट करण्यासाठी डेबिट कार्डची गरज पडणार नाही. युजर्स आधार कार्डच्या मदतीनं यूपीआय पिन सेट करता येईल. यासाठी बँक अकाऊंटशी आधार लिंक असणं आवश्यक आहे. सध्या काही बँका […]

    The post UPI PIN without ATM card: ATM कार्डविना सेट करा UPI PIN, जाणून घ्या सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    देशात डिजिटल आणि कॅशलेस पेमेंटला चालना देण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NCPI) नं UPI (यूनिफाइड पेमेंट इंटरफेस) मजबूत करण्यासाठी नवीन सिस्टम आणली आहे. आता युजर्सना UPI पिन सेट करण्यासाठी डेबिट कार्डची गरज पडणार नाही. युजर्स आधार कार्डच्या मदतीनं यूपीआय पिन सेट करता येईल. यासाठी बँक अकाऊंटशी आधार लिंक असणं आवश्यक आहे. सध्या काही बँका आणि यूपीआय अ‍ॅप्सच या सिस्टमशी जोडले गेले आहेत. पुढे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप डेबिट कार्डविना आधार कार्डनं UPI पिन कसा सेट करता येईल याची माहिती दिली आहे.

    आधार द्वारे UPI PIN सेट करण्याची सर्व्हिस

    UPI पेमेंट आधीपेक्षा जास्त सोयीस्कर बनवण्यासाठी आधारद्वारे पिन सेट करण्याचं फिचर आणण्यात आलं आहे. आता असे युजर्स देखील UPI अकाऊंट तयार करू शकतील ज्यांच्याकडे बँक अकाऊंट तर आहे परंतु डेबिट कार्ड नाही. म्हणजे यूपीआय-आधारित पेमेंट सिस्टमशी जोडले जाण्यासाठी युजर्सना डेबिट किंवा एटीएम कार्डची गरज पडणार नाही.

    परंतु यासाठी युजर्सचं आधार कार्ड आणि मोबाइल नंबर बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. NCPI च्या या नव्या फिचरमुळे आता आणखी जास्त लोक यूपीआय पेमेंटशी जोडले जातील आणि छोट्या मोठ्या गरजांसाठी कॅशचा वापर कमी होईल. हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत येतायत दोन Samsung 5G phone; Galaxy A14 5G व A23 5G भारतीय लाँचचा खुलासा

    आधार कार्डनं PayTM, Google Pay सारख्या अ‍ॅप्सवर UPI पिन कसा सेट करायचा

    यूपीआय संचालित करणाऱ्या सरकारी अथॉरिटी – नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनसीपीआय) नं यूपीआय आयडी बनवण्यासाठी आणि पेमेंट पिन जनरेट करण्यासाठी आधार कार्ड व्हेरिफिकेशन सर्व्हिस सुरु केली आहे, जी खूप सोपी प्रक्रिया आहे.

    स्टेप 1 – सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये BHIM UPI किंवा अन्य UPI-पेमेंट अ‍ॅप जसे की– PayTM, Google Pay, PhonePe डाउनलोड करा. हे अ‍ॅप तुम्हाला तुमच्या फोनच्या ऑफिशियल अ‍ॅप स्टोर – Google Play Store किंवा Apple App Store वरून डाउनलोड करावे लागतील.

    स्टेप 2 – अ‍ॅप ओपन करा आणि UPI ID सिलेक्ट करा. यासाठी तुम्हाला मोबाइल नंबर टाकावा लागेल जो बँक अकाऊंटशी लिंक आहे. तसेच ते सिम तुमच्या फोनमध्ये असावं. त्यानंतर बँक सिलेक्ट करा.

    स्टेप 3 – आता तुमचा UPI ID बनवण्यासाठी ‘Aadhaar based verification’ वर क्लिक करा आहे आणि सर्व टर्म अँड कंडीशन अ‍ॅक्सेप्ट करा.

    स्टेप 4 – आता तुम्हाला आधार कार्ड नंबरनं तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण कर ‘confirm’ वर टॅप करा. पुढील पेजवर तुम्हाला UPI पिन सेट करण्यास सांगितलं जाईल.

    स्टेप 5 –आता तुमच्या आधार कार्डवरील रजिस्टर मोबाइल नंबरवर एक OTP येईल जो एंटर केल्यानंतर तुमचा आधार बेस्ड UPI आयडी तयार होईल. त्यानंतर पुन्हा पिन टाकावा लागेल.

    पिन कंफर्मेशन नंतर तुमचा UPI PIN पेमेंटसाठी तयार होईल. तुम्ही कोणत्याही UPI इनेबल मोबाइल नंबरवर किंवा QR कोड स्कॅनकरून पेमेंट करू शकाल.

    नोट : आधार कार्ड आधारित यूपीआय पिन सेवा सध्या निवडक यूपीआय-आधारित अ‍ॅपसाठी उपलब्ध आहे. तसेच नेमक्याच बँका देखील आधार बेस्ड UPI रजिस्ट्रेशन करू देतात. सध्या देशातील फक्त 11 बँका आधार कार्ड बेस्ड यूपीआय पिन जनरेट करण्याची सुविधा देत आहेत. हे देखील वाचा: Shahid Kapoor करणार वेब सीरीजच्या विश्वात पदार्पण; ‘Farzi’ च्या रिलीज डेटची घोषणा

    आधार बेस्ड UPI पिन सर्व्हिसला सपोर्ट करणाऱ्या बँका

    सेंट्रल बँक ऑफ इंडिया
    कॉसमॉस कॉपरिटिव्ह बँक
    इंडसइंड बँक
    केरळ ग्रामीण बँक
    कर्नाटका ग्रामीण बँक
    कॅनरा बँक
    करूर वैश्या बँक
    राजस्थान कॉपरेटीव्ह बँक
    यूको बँक
    पंजाब सिंध बँक
    सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

    The post UPI PIN without ATM card: ATM कार्डविना सेट करा UPI PIN, जाणून घ्या सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/how-to-set-upi-pin-without-atm-card/feed/ 0