UPI PIN without ATM card: ATM कार्डविना सेट करा UPI PIN, जाणून घ्या सोपी पद्धत

देशात डिजिटल आणि कॅशलेस पेमेंटला चालना देण्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉरपोरेशन ऑफ इंडिया (NCPI) नं UPI (यूनिफाइड पेमेंट इंटरफेस) मजबूत करण्यासाठी नवीन सिस्टम आणली आहे. आता युजर्सना UPI पिन सेट करण्यासाठी डेबिट कार्डची गरज पडणार नाही. युजर्स आधार कार्डच्या मदतीनं यूपीआय पिन सेट करता येईल. यासाठी बँक अकाऊंटशी आधार लिंक असणं आवश्यक आहे. सध्या काही बँका आणि यूपीआय अ‍ॅप्सच या सिस्टमशी जोडले गेले आहेत. पुढे आम्ही तुम्हाला स्टेप बाय स्टेप डेबिट कार्डविना आधार कार्डनं UPI पिन कसा सेट करता येईल याची माहिती दिली आहे.

आधार द्वारे UPI PIN सेट करण्याची सर्व्हिस

UPI पेमेंट आधीपेक्षा जास्त सोयीस्कर बनवण्यासाठी आधारद्वारे पिन सेट करण्याचं फिचर आणण्यात आलं आहे. आता असे युजर्स देखील UPI अकाऊंट तयार करू शकतील ज्यांच्याकडे बँक अकाऊंट तर आहे परंतु डेबिट कार्ड नाही. म्हणजे यूपीआय-आधारित पेमेंट सिस्टमशी जोडले जाण्यासाठी युजर्सना डेबिट किंवा एटीएम कार्डची गरज पडणार नाही.

परंतु यासाठी युजर्सचं आधार कार्ड आणि मोबाइल नंबर बँक खात्याशी लिंक असणं आवश्यक आहे. NCPI च्या या नव्या फिचरमुळे आता आणखी जास्त लोक यूपीआय पेमेंटशी जोडले जातील आणि छोट्या मोठ्या गरजांसाठी कॅशचा वापर कमी होईल. हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत येतायत दोन Samsung 5G phone; Galaxy A14 5G व A23 5G भारतीय लाँचचा खुलासा

आधार कार्डनं PayTM, Google Pay सारख्या अ‍ॅप्सवर UPI पिन कसा सेट करायचा

यूपीआय संचालित करणाऱ्या सरकारी अथॉरिटी – नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनसीपीआय) नं यूपीआय आयडी बनवण्यासाठी आणि पेमेंट पिन जनरेट करण्यासाठी आधार कार्ड व्हेरिफिकेशन सर्व्हिस सुरु केली आहे, जी खूप सोपी प्रक्रिया आहे.

स्टेप 1 – सर्वप्रथम तुमच्या फोनमध्ये BHIM UPI किंवा अन्य UPI-पेमेंट अ‍ॅप जसे की– PayTM, Google Pay, PhonePe डाउनलोड करा. हे अ‍ॅप तुम्हाला तुमच्या फोनच्या ऑफिशियल अ‍ॅप स्टोर – Google Play Store किंवा Apple App Store वरून डाउनलोड करावे लागतील.

स्टेप 2 – अ‍ॅप ओपन करा आणि UPI ID सिलेक्ट करा. यासाठी तुम्हाला मोबाइल नंबर टाकावा लागेल जो बँक अकाऊंटशी लिंक आहे. तसेच ते सिम तुमच्या फोनमध्ये असावं. त्यानंतर बँक सिलेक्ट करा.

स्टेप 3 – आता तुमचा UPI ID बनवण्यासाठी ‘Aadhaar based verification’ वर क्लिक करा आहे आणि सर्व टर्म अँड कंडीशन अ‍ॅक्सेप्ट करा.

स्टेप 4 – आता तुम्हाला आधार कार्ड नंबरनं तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण कर ‘confirm’ वर टॅप करा. पुढील पेजवर तुम्हाला UPI पिन सेट करण्यास सांगितलं जाईल.

स्टेप 5 –आता तुमच्या आधार कार्डवरील रजिस्टर मोबाइल नंबरवर एक OTP येईल जो एंटर केल्यानंतर तुमचा आधार बेस्ड UPI आयडी तयार होईल. त्यानंतर पुन्हा पिन टाकावा लागेल.

पिन कंफर्मेशन नंतर तुमचा UPI PIN पेमेंटसाठी तयार होईल. तुम्ही कोणत्याही UPI इनेबल मोबाइल नंबरवर किंवा QR कोड स्कॅनकरून पेमेंट करू शकाल.

नोट : आधार कार्ड आधारित यूपीआय पिन सेवा सध्या निवडक यूपीआय-आधारित अ‍ॅपसाठी उपलब्ध आहे. तसेच नेमक्याच बँका देखील आधार बेस्ड UPI रजिस्ट्रेशन करू देतात. सध्या देशातील फक्त 11 बँका आधार कार्ड बेस्ड यूपीआय पिन जनरेट करण्याची सुविधा देत आहेत. हे देखील वाचा: Shahid Kapoor करणार वेब सीरीजच्या विश्वात पदार्पण; ‘Farzi’ च्या रिलीज डेटची घोषणा

आधार बेस्ड UPI पिन सर्व्हिसला सपोर्ट करणाऱ्या बँका

सेंट्रल बँक ऑफ इंडिया
कॉसमॉस कॉपरिटिव्ह बँक
इंडसइंड बँक
केरळ ग्रामीण बँक
कर्नाटका ग्रामीण बँक
कॅनरा बँक
करूर वैश्या बँक
राजस्थान कॉपरेटीव्ह बँक
यूको बँक
पंजाब सिंध बँक
सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here