इंटरनेटविना करा UPI Payment; बटनवाल्या फोनवरून देखील होतील पैसे ट्रान्सफर, जाणून घ्या पद्धत

तुमच्यासोबत देखील कधी तरी असं झालं असेल की यूपीआयनं पैसे पाठवायचे आहेत परंतु तुमच्या फोनमध्ये इंटरनेटच चालत नाही? अशावेळी खूप अडचण होते. Paytm, PhonePe किंवा Google Pay असो किंवा इतर डिजिटल वॉलेट, गरज असताना जेव्हा हे बंद पडतात तेव्हा राग येतोच. परंतु आज आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत जिच्या माध्यमातून तुम्ही इंटरनेटविना UPI Payment करू शकता.

बिना इंटरनेट यूपीआय पेमेंट कसं करायचं

साधारणतः UPI Payment साठी आपण एखाद्या डिजिटल वॉलेट किंवा अ‍ॅपची मदत घेतो. परंतु भारत सरकार आणि NPCI (National Payments Corporation of India) नं यूएसएसडी (अनस्ट्रक्चर्ड सप्लीमेंट्री सर्व्हिस डेटा) आधारित मोबाइल बँकिंग सर्व्हिस देखील जारी केली आहे जिच्या माध्यमातून इंटरनेटविना यूपीआय पेमेंट करता येतं. हा USSD कोड *99# आहे.

Offline UPI Payments कसं करायचं

1) Offline UPI Payments साठी सर्वप्रथम तुमच्या फोनवरून *99# डायल करा.

2) USSD कोडवरील कॉल लागल्यानंतर तुमच्या मोबाइल नंबरशी लिंक बँक अकाऊंटची माहिती समोर येईल.

3) बँक अकाऊंटच्या नावासमोर पुढील सात ऑप्शन्स दिसतील:

  • Send Money (पैसे पाठवणे)
  • Request Money (पैशांची विनंती पाठवणे)
  • Check Balance (बॅलेन्स चेक करणे)
  • My Profile (प्रोफाईल)
  • Pending Request ( पेंडिंग रिक्वेस्ट)
  • Transactions (ट्रँजॅक्शन्स)
  • UPI PIN (यूपीआय पिन)
  • 4) पैसे पाठवण्यासाठी पहिला पर्याय ‘सेंड मनी’ निवडा आणि 1 लिहून रिप्लाय करा.

    5) समोर चार ऑप्शन येतील, यातील एका पर्यायाची निवड करा. ऑप्शन्स असे असतील:

  • Mobile No. (मोबाइल नंबर)
  • UPI ID (यूपीआय आयडी)
  • Saved Beneficiary (सेव्ड बेनिफिशियरी)
  • IFSC, A/C No. (आयएफएससी, अकाऊंट नंबर)
  • 6) जर तुम्हाला मोबाइल नंबरवर पैसे पाठवायचे असतील तर 1 लिहून रिप्लाय करा.

    7) आता तो फोन नंबर टाका ज्यावर पैसे पाठवायचे आहेत.

    8) फोन नंबर लिहून सेंड बटन प्रेस करताच त्या नंबरच्या मालकाचे नाव समोर येईल.

    9) पुढे तुम्हाला रक्कम टाकावी लागेल, जे पैसे तुम्हाला त्या नंबरवर पाठवायचे आहेत.

    10) रक्कम टाकल्यानंतर ‘रिमार्क’ लिहण्याचा पर्याय देखील येईल, यात तुम्ही पैसे पाठवण्याचे कारण टाकू शकता.

    11) जर रिमार्क नको असेल तर 1 लिहून रिप्लाय करा.

    12) तुमच्या मोबाइल स्क्रीनवर सुरु असलेल्या ट्रँजॅक्शनची माहिती येईल ज्यात पाठवत असलेले पैसे आणि नंबर दोन्ही दिसतील.

    13) डिटेल्स योग्य असतील तर तुमचा यूपीआय पिन टाकून रिप्लाय करा.

    14) UPI PIN टाकताच तुमच्या अकाऊंटवरून पैसे दुसऱ्या व्यक्तीच्या अकाऊंटमध्ये जातील आणि त्याचा रेफरेंस आयडी सोबतच कंफर्मेशन तुमच्या मोबाइल स्क्रीनवर येईल.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here