इन्स्टाग्रामवरील कोणताही व्हिडीओ डाउनलोड करण्याची सर्वात सोपी ट्रिक

How To Download Instagram Story And Video

एकेकाळी फोटो शेअरिंग अ‍ॅप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इन्स्टाग्रामनं सध्या आपलं लक्ष व्हिडीओवर केंद्रित केलं आहे. रिल्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु विनोदी किंवा माहितीपर रिल्स थेट व्हिडीओ स्वरूपात डाउनलोड करण्याचा Instagram अ‍ॅपमध्ये पर्याय नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे इंस्टाग्राम नाही अशा लोकांना व्हिडीओ ऑफलाईन दाखवता येत नाही. परंतु आमच्याकडे अशा काही ट्रिक्स आहेत ज्यांच्या मदतीनं तुम्ही सहज इन्स्टाग्राम व्हिडीओ ऑफलाइन बघण्यासाठी डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅप किंवा ब्राउजरचा वापर करावा लागेल. व्हिडीओ सोबतच आम्ही तुम्हाला इन्स्टाग्राम स्टोरी डाउनलोड करण्याची सोपी पद्धत सांगितली आहे.

अँड्रॉइड आणि आयफोनवर अशाप्रकारे करा इन्स्टाग्राम व्हिडीओ डाउनलोड

Android आणि iPhone वर इन्स्टाग्राम व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी अनेक टूल आहेत. हे टूल सर्व ब्राउजरमधून वापरता येतात. इथे आम्ही तुम्हाला ingramer.com च्या मदतीनं इन्स्टाग्राम व्हिडीओ डाउनलोड करण्याची पद्धत सांगणार आहोत. तसेच तुम्ही w3toys.com चा देखील वापर करू शकता. दोन्ही प्लॅटफॉर्मवरून व्हिडीओ डाउनलोड करण्याची प्रक्रिया जवळपास एक सारखी आहे. हे देखील वाचा: PUBG Mobile 2.2 update: Erangel चा मॅप बदलणार! छोटया नवीन मॅपसह येतंय नवीन पबजी; जाणून घ्या सविस्तर माहिती

How To Download Instagram Story And Video

  • सर्वप्रथम ingramer.com ओपन करा.
  • त्यानंतर हॅमबर्ग आयकॉनवर ‘Tools’ –> ‘Downloader’ –> नंतर कॅटेगरी सिलेक्ट करा. यात तुम्हाला फोटो,व्हिडीओ, प्रोफाईल स्टोरी आणि IGTV ऑप्शन दिसेल.
  • आता जो व्हिडीओ हवा आहे त्याची इंस्टाग्रामवरील व्हिडीओ लिंक इंस्टाग्रामवरून कॉपी करून घ्या.
  • कॉपी केलेली लिंक ingramer मध्ये दिसत असलेल्या URL box मध्ये पेस्ट करा आणि सर्च बटनवर क्लिक करा.
  • त्यानंतर सर्च रिजल्ट बघण्यासाठी स्क्रोल डाउन करा.
  • पुन्हा डाउनलोड बटनवर सिलेक्ट करून व्हिडीओ अँड्रॉइड किंवा आयफोनमध्ये डाउनलोड करा.

Windows/ macOS लॅपटॉप आणि PCs वर अशाप्रकारे करा इन्स्टाग्राम व्हिडीओ डाउनलोड

वरील इन्स्टाग्राम व्हिडीओ डाउनलोड टूल विंडोज 7/विंडोज 10 पीसी आणि लॅपटॉपसह मॅक ओएस डिवाइसवर वापरता येईल. परंतु अजून एक पद्धत आहे जिचा वापर करून डेस्कटॉप वर Instagram व्हिडीओ डाउनलोड करता येईल. तुम्ही तुमच्या डिवाइसवर व्हिडीओ/फोटो सेव्ह करण्यासाठी Google क्रोम एक्सटेंशन ‘Downloader for Instagram’ चा वापर करू शकता.

How To Download Instagram Story And Video

  • इन्स्टाग्राम व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम Google Chrome Web Store वर ‘Downloader for Instagram’ असं सर्च करावं लागेल. तसेच तुम्ही या लिंकव्हर क्लिक करून थेट extensions पेजवर जाल.
  • त्यानंतर ‘Add to Chrome’ ची निवड करा. त्यामुळे तुमच्या क्रोम वेब ब्राउजरमध्ये हे एक्सटेंशन इंस्टॉल होईल.
  • त्यानंतर इन्स्टाग्राम व्हिडीओ लिंक कॉपी करा.
  • कॉपी लिंक क्रोम एक्सटेंशनवर पेस्ट करून डाउनलोड करा.

डेस्कटॉपच्या माध्यमातून इन्स्टाग्राम स्टोरीज, फोटो, प्रोफाइल आणि रील व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. काही एक्सटेंशन प्रत्येक Instagram फोटो किंवा मीडिया फाइलवर डाउनलोड बटन देतात.

Instagram Reels डाउनलोड

जर तुम्ही इन्स्टाग्राम रील्स व्हिडीओ डाउनलोड करायचा असेल तर वर सांगितलेल्या एक्सटेंशनच्या मदतीनं तुम्ही रील्स व्हिडीओ देखील सहज डाउनलोड करू शकता. अशाप्रकारे तुम्ही काही सेकंदात रील्स व्हिडीओ डाउनलोड करू शकता.

How To Download Instagram Story And Video

Instagram प्रायव्हेट अकाऊंटचे व्हिडीओ कसे डाउनलोड करावे

इन्स्टाग्राम प्रायव्हेट अकाऊंटवरील व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला त्या अकाऊंटला फॉलो करावं लागेल. जर तुम्ही ते अकाऊंट फॉलो करत नसाल तर प्रायव्हेट अकाऊंटवरील व्हिडीओ वरील पद्धतीनं डाउनलोड करता येत नाहीत. हे देखील वाचा: What is GB WhatsApp: जीबी व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे काय? वापरल्यामुळे डेटा जातो का चोरीला? कसं डाउनलोड करायचं? जाणून घ्या

How To Download Instagram Story And Video

Instagram स्टोरी डाउनलोड

  • तुम्हाला ज्या युजरची इन्स्टाग्राम स्टोरी डाउनलोड करायची आहे सर्वप्रथम त्याची लिंक कॉपी करा.
  • त्यानंतर तुम्हाला StorySaver.net वर जा.
  • लिंक ‘Enter Instagram account username’ बॉक्समध्ये पेस्ट करा.
  • त्यानंतर डाउनलोड ऑप्शन सिलेक्ट करा.
  • स्क्रॉल डाउन करून ‘Save as Option’ वर चेक करा आणि थोड्या वेळात इन्स्टाग्राम स्टोरी डाउनलोड होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here