Vivo S1 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 15 Sep 2020 08:48:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 8GB रॅम व मोठी बॅटरी असलेल्या Vivo S1 Pro आणि Y50 ची किंमत झाली अजून कमी, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/vivo-y50-and-vivo-s1-pro-price-cut-rs-1000-know-new-selling-price/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-y50-and-vivo-s1-pro-price-cut-rs-1000-know-new-selling-price/#respond Tue, 15 Sep 2020 08:48:32 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=8148 91मोबाईल्सला एक्सक्लूसिवली ऑफलाइन स्टोर्स कडून Vivo Y50 आणि Vivo S1 Pro या दोन्ही फोन्सच्या नवीन किंमतींची माहिती मिळाली आहे.

The post 8GB रॅम व मोठी बॅटरी असलेल्या Vivo S1 Pro आणि Y50 ची किंमत झाली अजून कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने आपल्या दोन शानदार फोन्सच्या किंमती कमी करून ग्राहकांना भेट दिली आहे. कंपनीने Vivo S1 Pro आणि Vivo Y50 च्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता ग्राहक हे दोन्ही हँडसेट कमी किंमतीत विकत घेऊ शकतील. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी Vivo ने जीएसटी च्या दरात बदल झाल्यामुळे आपल्या अनेक फोन्सच्या किंमती बदलल्या होत्या. 91मोबाईल्सला एक्सक्लूसिवली ऑफलाइन स्टोर्स कडून या दोन्ही फोन्सच्या नवीन किंमतींची माहिती मिळाली आहे.

नवीन किंमत

Vivo Y50 बद्दल बोलायचे तर कंपनीने याच्या एकमेव 8जीबी रॅम+128जीबी वेरिएंटच्या किंमतीत कपात केली आहे. कपातीनंतर फोन 16,990 रुपयांमध्ये विकला जात आहे. याआधी फोनची किंमत 17,990 रुपये होती. Vivo S1 Pro प्राइस कटच्या आधी 19,990 रुपयांमध्ये विकला जात होता, पण आता किंमत कमी झाल्यानंतर हा फोन को 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ऑफलाइन व्यतिरीक्त कंपनीच्या साइट वर पण दोन्ही फोन्स कमी किंमत विकले जात आहेत.

Vivo S1 Pro चे स्पेसिफिकेशन्स

Vivo S1 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता स्मार्टफोन मध्ये 6.38 इंचाचा फुल-एचडी+ (2340×1080 पिक्सल) सुपर एमोलेड फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19.5.9 आहे. तसेच स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर सह 8 जीबी रॅम आहे आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कॅमेरा सेटअप पाहता Vivo S1 Pro मध्ये डायमंड आकाराचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, एफ/ 1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर आहे. सोबत 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड एंगल सेंसर देण्यात आला आहे आणि 2 मेगापिक्सलचे दोन सेंसर आहेत, एक डेप्थ सेंसिंग आणि एक मॅक्रो फोटोग्राफी साठी . तसेच फ्रंट कॅमेरा एफ/ 2.0 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सल सह येतो.

हे देखील वाचा: 5000mAh बॅटरी असलेले Vivo Y20 आणि Y20i भारतात झाले लॉन्च, किंमत : 11,490 रुपयांपासून सुरु

डिवाइसची स्टोरेज ग्राहक माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवू शकतात. तसेच फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन साठी 4जी एलटीई, डुअल-बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एफएम रेडियो आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. सिक्योरिटी साठी फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे. वीवो एस1 प्रो Android 9 Pie वर आधारित फनटच ओएस 9.2 वर चालतो. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y50 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.53-इंचाची अल्ट्रा ओ स्क्रीन आणि फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे स्क्रीन रेजोल्यूशन 1080 x 2340 पिक्सल आहे. फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर असेल. फोन मध्ये 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

हे देखील वाचा: Exclusive : Vivo V20 सीरीज दसऱ्याच्या निमित्ताने होईल भारतात लॉन्च, असे असतील स्पेसिफिकेशन्स

तसेच फटोग्राफीसाठी फोन मध्ये रियर वर 13-मेगापिक्सल प्राइमरी शूटर, 8-मेगापिक्सल वाइड-अँगल शूटर 120 डिग्री फिल्ड-ऑफ-व्यू, 2-मेगापिक्सल पोर्टेट लेंस आणि 2-मेगापिक्सल मॅक्रो सेंसर फोकल लेंथ सह येतो. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. पावर बॅकअपसाठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट सह देण्यात आली आहे.

वीवो एस1 प्रो वीडियो

The post 8GB रॅम व मोठी बॅटरी असलेल्या Vivo S1 Pro आणि Y50 ची किंमत झाली अजून कमी, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-y50-and-vivo-s1-pro-price-cut-rs-1000-know-new-selling-price/feed/ 0
48MP कॅमेरा, 4,500 एमएएच बॅटरी आणि 8GB रॅम सह आला Vivo S1 Pro, किंमत 19,900 रुपये https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-launched-in-india-with-48mp-camera-and-4500mah-battery-8gb-ram-price-19990-rs/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-launched-in-india-with-48mp-camera-and-4500mah-battery-8gb-ram-price-19990-rs/#respond Fri, 03 Jan 2020 17:26:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6189 फोन सोबत वन टाइन स्क्रीन रिप्लेसमेंट मिळेल

The post 48MP कॅमेरा, 4,500 एमएएच बॅटरी आणि 8GB रॅम सह आला Vivo S1 Pro, किंमत 19,900 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने काही दिवसांपूर्वी फिलिपिंस मार्केट मध्ये आपला Vivo S1 Pro स्मार्टफोन लॉन्च केला होता, जो आज भारतीय बाजारात सादर केला गेला आहे. अधिकृतपणे सादर केल्या गेलेल्या वीवो एस1 प्रो मध्ये चार रियर कॅमेरा देण्यात आले आहेत जे डायमंड सेटअप मध्ये आहेत. डिवाइस मिस्टिक ब्लॅक, जॅजी ब्लू आणि ड्रीमी व्हाइट मध्ये सादर केला गेला आहे.

किंमत आणि सेल ऑफर्स

Vivo S1 Pro कंपनीने एकाच वेरिएंट 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज ऑप्शन मध्ये सादर केला आहे, ज्याची किंमत 19,990 रुपये आहे. हँडसेट 5 जानेवारी म्हणजे शनिवार पासून ऑफलाइन आणि ऑनलाइन सेल साठी सादर केला जाईल. ऑफर्स पाहता ऑफलाइन ICICI बॅंकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 10% कॅशबॅक मिळेल. तसेच फोन सोबत वन टाइन स्क्रीन रिप्लेसमेंट मिळेल. ऑफलाइन व्यतिरिक्त ऑनलाइन हा फोन विकत घेतल्यास 31 जानेवारी पर्यंत वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट मिळेल. ICICI बॅंकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 10% कॅशबॅक, नो-कोस्ट ईएमआई व 31 जानेवारी पर्यंत जियो कडून Rs 12000 चे फायदे मिळतील.

डिजाइन

Vivo S1 Pro ची डिजाइन पाहता फोन बेजल लेस वॉटरड्रॉप डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. तसेच फोन मध्ये राउंड ऐजेज कॉनर देण्यात आले आहेत. खालच्या बाजूला थोडा रुंद बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Vivo S1 Pro डायमंड शेप क्वॉड रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च झाला आहे जो बॅक पॅनल वर मधोमध देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे तसेच रियर पॅनल वर खालच्या बाजूला Vivo चा लोगो पण आहे.

शानदार कॅमेरा

कॅमेरा सेटअप पाहता Vivo S1 Pro मध्ये डायमंड आकाराचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, एफ/ 1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर आहे. सोबत 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड एंगल सेंसर देण्यात आला आहे आणि 2 मेगापिक्सलचे दोन सेंसर आहेत, एक डेप्थ सेंसिंग आणि एक मॅक्रो फोटोग्राफी साठी . तसेच फ्रंट कॅमेरा एफ/ 2.0 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सल सह येतो.

स्पेसिफिकेशन्स

या फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता स्मार्टफोन मध्ये 6.38 इंचाचा फुल-एचडी+ (2340×1080 पिक्सल) सुपर एमोलेड फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19.5.9 आहे. तसेच स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर सह 8 जीबी रॅम आहे आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

डिवाइसची स्टोरेज ग्राहक माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवू शकतात. तसेच फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन साठी 4जी एलटीई, डुअल-बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एफएम रेडियो आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. सिक्योरिटी साठी फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.

वीवो एस1 प्रो Android 9 Pie वर आधारित फनटच ओएस 9.2 वर चालतो. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. या डिवाइसच्या दुसऱ्या रॅम वेरिएंट बद्दल अजूनतरी माहिती मिळाली नाही. पण असे बोलले जात आहे कि कंपनी या डिवाइसचे कमी रॅम वेरिएंट सादर करू शकते.

वीवो एस1 प्रो वीडियो

The post 48MP कॅमेरा, 4,500 एमएएच बॅटरी आणि 8GB रॅम सह आला Vivo S1 Pro, किंमत 19,900 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-launched-in-india-with-48mp-camera-and-4500mah-battery-8gb-ram-price-19990-rs/feed/ 0
4 जानेवारीला भारतात लॉन्च होईल Vivo S1 Pro, हा असेल भारतातील पहिला डायमंड शेप रियर कॅमेरा फोन https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-to-launch-in-india-4-january-2020-know-price-specifications-features-sale/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-to-launch-in-india-4-january-2020-know-price-specifications-features-sale/#respond Fri, 27 Dec 2019 13:38:45 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6141 Vivo S1 Pro जानेवारीच्या 4 तारखेला भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल

The post 4 जानेवारीला भारतात लॉन्च होईल Vivo S1 Pro, हा असेल भारतातील पहिला डायमंड शेप रियर कॅमेरा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने कालच एक्सक्लूसिव बातमी देत सांगितले होते कि टेक कंपनी वीवो भारतात लवकरच आपल्या ‘एस सीरीज’ चा नवीन डिवाईस Vivo S1 Pro लॉन्च करणार आहे. आमच्या रिपोर्ट मध्ये आम्ही सांगितले होते कि हा स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह लॉन्च होईल. आज 91मोबाईल्सच्या बातमीवर शिकामोर्तब करत Vivo ने या स्मार्टफोनची लॉन्च डेट सांगितली आहे. वीवोने सांगितले आहे कि येत्या 4 जानेवारीला Vivo S1 Pro स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. फोनच्या लॉन्च डेट सोबतच Vivo ने एस1 प्रो स्मार्टफोनचे फोटो पण ऑफिशियल केले आहेत.

Vivo India ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल द्वारे Vivo S1 Pro स्मार्टफोनच्या लॉन्चची माहिती दिली आहे. Vivo ने ट्वीटर हेडर अपडेट करत खुलासा केला आहे कि Vivo S1 Pro जानेवारीच्या 4 तारखेला भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. या फोटो मध्ये Vivo S1 Pro स्मार्टफोन बॉलीवुड अभिनेत्री सारा अली खानच्या हातात दाखवण्यात आला आहे. फोटो मध्ये फोनचा बॅक पॅनल दिसत आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि Vivo S1 Pro भारतात पण डायमंड शेप क्वॉड रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च होईल.

Vivo S1 Pro

सर्वात आधी सांगायचे तर ऑनलाईन शॉपिंग साइट अमॅझॉन इंडिया वर पण Vivo S1 Pro चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्प्ष्ट झाले आहे कि हा डिवाईस अमॅझॉन वर सेल साठी उपलब्ध होईल. अमॅझॉन लिस्टिंग मध्ये खुलासा केला गेला आहे कि Vivo S1 Pro स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनल वर 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा असेल, ज्यात प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा दिला जाईल.

फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता Vivo S1 Pro मध्ये तुम्हाला 6.38-इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. हि स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह येईल. Vivo S1 Pro एंडरॉयड 9 पाई वर चालतो तसेच आशा आहे कि भारतात हा फनटच 10 वर लॉन्च होईल. फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट दिला जाईल.

Vivo S1 Pro भारतात 8 जीबी की रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च होईल. कंपनी हा डिवाईस एकापेक्षा जास्त वेरिएंट मध्ये बाजारात आणू शकते. फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वरील क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मध्ये एफ/1.78 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असेल ज्यासोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि तसेच इतर दोन सेंसर 2 मेगापिक्सलचे असतील.

Vivo S1 Pro डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई फीचर सह लॉन्च होईल. पावर बॅकअप साठी या डिवाईस मध्ये 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4500एमएएच ची बॅटरी मिळेल. किंमत पाहता आम्हाला मिळलेल्या माहिती नुसार Vivo S1 Pro 19,990 रुपयांमध्ये भारतात लॉन्च केला जाईल.

The post 4 जानेवारीला भारतात लॉन्च होईल Vivo S1 Pro, हा असेल भारतातील पहिला डायमंड शेप रियर कॅमेरा फोन first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-to-launch-in-india-4-january-2020-know-price-specifications-features-sale/feed/ 0
Exclusive: 8GB रॅम, 48MP कॅमेरा आणि 4,500 mAh बॅटरी सह लॉन्च होईल Vivo S1 Pro, किंमत 19,990 रुपये https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-price-in-india-at-rs-19990-specifications-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-price-in-india-at-rs-19990-specifications-and-features/#respond Thu, 26 Dec 2019 14:15:25 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6130 2020 मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कंपनी याचे प्रमोशन सुरु करू शकते आणि 10 जानेवारीच्या आसपास हा लॉन्च करू शकते

The post Exclusive: 8GB रॅम, 48MP कॅमेरा आणि 4,500 mAh बॅटरी सह लॉन्च होईल Vivo S1 Pro, किंमत 19,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
गेल्या आठवड्यात आम्ही बातमी दिली होती कि Vivo लवकरच भारतात S1 Pro मॉडेल सादर करू शकते. आज या फोनच्या किंमतीसह इतर माहिती आमच्याकडे आली आहे. आम्हाला जी बातमी मिळाली आहे त्यानुसार भारतीय बाजारात या फोनची किंमत 19,990 रुपये असेल पण याची बॉक्स प्राइस अर्थात MRP 20,990 रुपये असेल. आम्हाला हि माहिती ऑफलाइन रिटेल सोर्सच्या माध्यमातून मिळाली आहे. कंपनीने आतापर्यंत अधिकृतपणे भारतात या फोन बद्दल कोणतीही माहिती दिली नाही पण 91मोबाईल्सला जी बातमी मिळाली आहे त्यानुसार सध्या यायचा 8 जीबी रॅम आणि 128 जीबी मेमरी वेरियंटच भारतात उपलब्ध होईल. नंतर 6 GB वेरियंट पण येऊ शकतो.

कंपनीने ऑक्टोबर मध्ये Vivo S1 Pro मॉडेल सादर केला होता ज्यात डायमंड शेप मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे आणि हाच मॉडेल आता भारतात येणार आहे. याबद्द्दल आम्ही आधीपण माहिती दिली आहे कि या फोनसाठी लवकरच ट्रेनिंग सुरु होणार आहे तसेच 2020 मध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कंपनी याचे प्रमोशन सुरु करू शकते आणि 10 जानेवारीच्या आसपास हा लॉन्च करू शकते.

Vivo S1 Pro चे स्पेसिफिकेशन

वर सांगितल्याप्रमाणे हा फोन आधी इंटरनेशनल मार्केट मध्ये लॉन्च झाला आहे त्यामुळे फोनचे स्पेसिफिकेशन आणि फीचर्स उपलब्ध आहेत. या फोन मध्ये तुम्हाला 6.39-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन मिळेल. कंपनीने वॉटर ड्रॉप नॉच सह सुपर एमोलेड स्क्रीन पॅनलचा वापर केला आहे.

Vivo S1 Pro क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर सादर केला जाईल आणि फोन मध्ये तुम्हाला 2.0 गीगाहट्र्ज असलेला आक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. सोबत 8 GB रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळेल. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्हाला तीन स्लॉट मिळतील ज्यात दोन सिम कार्ड आणि एक माइक्रोएसडी कार्डचा वापर करता येईल. हा फोन Android 9 Pie वर चालतो आणि यात तुम्हाला फनटच ओएस मिळेल. भारतात लॉन्च झाल्यावर यात वीवोचा फनटच 10 मिळू शकतो.

Vivo S1 Pro मध्ये डायमंड शेप क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळेल. फोनचा मुख्य कॅमेरा कॅमेरा 48 एमपी चा आहे आणि हा एफ/1.78 अपर्चर सह येतो. त्याचबरोबर 8एमपी ची अल्ट्रा वाइड लेंस देण्यात आली आहे. फोनचा तिसरा आणि चौथा सेंसर 2 एमपी चा आहे. सेल्फी पाहता वीवो एस1 प्रो मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. वीवो वी17 आणि वीवो वी17 प्रो प्रमाणे यात पण तुम्हाला कॅमेरा सह सुपर नाइट मोड मिळेल. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 4,500 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे आणि सोबत तुम्हाला 18 वॉट चा फास्ट चार्जर पण मिळेल.

The post Exclusive: 8GB रॅम, 48MP कॅमेरा आणि 4,500 mAh बॅटरी सह लॉन्च होईल Vivo S1 Pro, किंमत 19,990 रुपये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-price-in-india-at-rs-19990-specifications-and-features/feed/ 0
Vivo V17 झाला लॉन्च, यात आहे 8 जीबी रॅम, 4500एमएएच बॅटरी, 32एमपी सेल्फी आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेरा https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-officially-launched-32mp-selfie-48mp-quad-rear-camera-4500mah-battery-8gb-ram-specs-price/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-officially-launched-32mp-selfie-48mp-quad-rear-camera-4500mah-battery-8gb-ram-specs-price/#respond Mon, 25 Nov 2019 09:38:43 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5859 अशा आहे कि हा स्मार्टफोन भारतात Vivo S1 Pro नाही तर Vivo V17 म्हणून येईल.

The post Vivo V17 झाला लॉन्च, यात आहे 8 जीबी रॅम, 4500एमएएच बॅटरी, 32एमपी सेल्फी आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
VIVO ‘वी सीरीज’ च्या आगामी स्मार्टफोन V17 बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या समोर येत आहेत. सर्टिफिकेशन्स साइट वर लिस्ट केल्यानंतर या फोनचे रियल फोटोज पण समोर आले होते. काही दिवसांपूर्वी हा स्मार्टफोन एका म्यूजिक वीडियो मध्ये पण दिसला होता ज्यावरून समजले होते कि Vivo V17 तयार आहे आणि लवकरच टेक बाजारात येणार आहे. आता परदेशी मीडिया कडून बातमी समोर आली आहे कि Vivo V17 अंर्तराष्ट्रीय बाजारात सादर करण्यात आला आहे आणि या फोनने रशियन मार्केट मधून टेक मंचावर एंट्री घेतली आहे.

Vivo V17 रशियन बाजारात लॉन्च केला गेला आहे. हा स्मार्टफोन Vivo च्या अधिकृत रशियन वेबसाइट वर लिस्ट झाला आहे जिथे हा प्रीआर्डर साठी उपलब्ध आहे. Vivo V17 च्या प्रोडक्ट पेज वर फोनचे संपूर्ण माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे ज्यात फोनच्या लुक, डिजाईन, फीचर्स व स्पेसिफिकेशन्स सर्व माहिती आहे. Vivo V17 गेल्या आठवड्यात फिलिपिंस मध्ये लॉन्च केल्या गेलेल्या स्मार्टफोन Vivo S1 Pro चा रिब्रँडेड वर्जन असल्याचे बोलले जात आहे.

Vivo V17 लुक

फोनचा बॅक पॅनल पाहता पॅनलच्या मधोमध रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ‘डायमंड शेप’ मध्ये आहे. कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तीन सेंसर वर्टिकल शेप मध्ये आहेत तर चौथा सेंसर या तिन्ही सेंसरच्या उजवीकडे आहे. कॅमेरा सेंसर्सच्या डावीकडे ‘म्यूजिक वेव’ सारखे चिन्ह आहे. कॅमेरा सेटअपच्या डायमंड शेपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर खाली वर्टिकल शेप मध्ये Vivo Camera & Music लिहिण्यात आले आहे.

Vivo V17 च्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट सेंसर नाही, त्यामुळे बोलले जात आहे कि हा डिवाईस इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल. फोनचा फ्रंट पॅनल पाहता इथे बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच आहे. डिस्प्लेच्या खाली थोडा रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. फोटो मध्ये फोनच्या उजवीकडील पॅनल वर वाल्यूम बटण आणि पावर रॉकर दाखवण्यात आला आहे आणि खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट आहे.

क्वॉड कॅमेरा

फोनचा कॅमेरा सेग्मेंट पाहता Vivo V17 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चरचा 48 मेगापिक्सलचा जीएम1 सेंसर देण्यात आला आहे. सोबत बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चरची 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Vivo V17 एफ/2.0 अपर्चरच्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo V17 स्पेसिफिकेशन्स

वीवो चा हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशनच्या 6.38 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. Vivo V17 कंपनीने इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9.0 पाई आधारित फनटच 9.2 ओएस वर सादर झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

Vivo V17 रशिया मध्ये 8 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे तसेच फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Vivo V17 मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता रशिया मध्ये हा फोन 22,990 रुबल मध्ये लॉन्च केला गेला आहे जे इंडियन करंसी नुसार 25,800 रुपये होतात. अशा आहे कि हा स्मार्टफोन भारतात Vivo S1 Pro नाही तर Vivo V17 म्हणून येईल.

The post Vivo V17 झाला लॉन्च, यात आहे 8 जीबी रॅम, 4500एमएएच बॅटरी, 32एमपी सेल्फी आणि 48एमपी क्वॉड रियर कॅमेरा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-v17-officially-launched-32mp-selfie-48mp-quad-rear-camera-4500mah-battery-8gb-ram-specs-price/feed/ 0
4500एमएएच बॅटरी, 8 जीबी रॅम आणि 32एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला क्वॉड रियर कॅमेरा असलेला Vivo S1 Pro https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-launched-with-quad-rear-camera-4500mah-battery-8gb-ram-price-specifications-v17/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-launched-with-quad-rear-camera-4500mah-battery-8gb-ram-price-specifications-v17/#respond Wed, 20 Nov 2019 13:38:30 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5832 फिलिपिंस मध्ये हा फोन PHP 15,999 म्हणजे जवळपास 22,600 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच Vivo S1 Pro फॅन्सी स्काई आणि नाईट ब्लॅक कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4500एमएएच बॅटरी, 8 जीबी रॅम आणि 32एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला क्वॉड रियर कॅमेरा असलेला Vivo S1 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने अलीकडेच अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘एस सीरीज’ वाढवत नवीन डिवाईस Vivo S5 लॉन्च केला होता. हा स्मार्टफोन चीनी बाजारात आला आहे जो डायमंड शेप रियर कॅमेरा सेटअप सह येतो. असाच कॅमेरा शेप असलेला एक नवीन स्मार्टफोन काल फिलिपिंस मध्ये लॉन्च झाला आहे, ज्याचे नाव आहे Vivo S1 Pro. वीवोचा हा नवीन स्मार्टफोन मागे लीक झालेल्या Vivo V17 सारख्या डिजाईन वर बनलेला आहे. बोलले जात आहे कि फिलिपिंस मध्ये लॉन्च झालेला Vivo S1 Pro येत्या काही दिवसांत भारतात Vivo V17 नावाने लॉन्च केला जाऊ शकतो.

Vivo S1 Pro लुक

फोनचा बॅक पॅनल पाहता पॅनलच्या मधोमध रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो ‘डायमंड शेप’ मध्ये आहे. कॅमेरा सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत. तीन सेंसर वर्टिकल शेप मध्ये आहेत तर चौथा सेंसर या तिन्ही सेंसरच्या उजवीकडे आहे. कॅमेरा सेंसर्सच्या डावीकडे ‘म्यूजिक वेव’ सारखे चिन्ह आहे. कॅमेरा सेटअपच्या डायमंड शेपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर खाली वर्टिकल शेप मध्ये Vivo Camera & Music लिहिण्यात आले आहे.

Vivo S1 Pro च्या बॅक पॅनल वर कोणताही फिंगरप्रिंट सेंसर नाही, त्यामुळे बोलले जात आहे कि हा डिवाईस इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करेल. फोनचा फ्रंट पॅनल पाहता इथे बेजल लेस डिस्प्ले देण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला ‘यू’ शेप नॉच आहे. डिस्प्लेच्या खाली थोडा रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. फोटो मध्ये फोनच्या उजवीकडील पॅनल वर वाल्यूम बटण आणि पावर रॉकर दाखवण्यात आला आहे आणि खालच्या पॅनल वर यूएसबी पोर्ट आहे.

क्वॉड कॅमेरा

फोनचा कॅमेरा सेग्मेंट पाहता Vivo S1 Pro क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चरचा 48 मेगापिक्सलचा जीएम1 सेंसर देण्यात आला आहे. सोबत बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चरची 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर तसेच 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Vivo S1 Pro एफ/2.0 अपर्चरच्या 32 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Vivo S1 Pro स्पेसिफिकेशन्स

वीवो चा हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 1080 x 2340 पिक्सल रेज्ल्यूशनच्या 6.38 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. Vivo S1 Pro कंपनीने इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे. हा स्मार्टफोन एंडरॉयड 9.0 पाई आधारित फनटच 9.2 ओएस वर सादर झाला आहे जो 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे.

Vivo S1 Pro फिलिपिंस मध्ये 8 जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला गेला आहे तसेच फोन मध्ये 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. हा एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी Vivo S1 Pro मध्ये 18वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. किंमत पाहता फिलिपिंस मध्ये हा फोन PHP 15,999 म्हणजे जवळपास 22,600 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तसेच Vivo S1 Pro फॅन्सी स्काई आणि नाईट ब्लॅक कलर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

The post 4500एमएएच बॅटरी, 8 जीबी रॅम आणि 32एमपी सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च झाला क्वॉड रियर कॅमेरा असलेला Vivo S1 Pro first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-pro-launched-with-quad-rear-camera-4500mah-battery-8gb-ram-price-specifications-v17/feed/ 0
14 नोव्हेंबरला लॉन्च होईल डायमंड शेप रियर कॅमेरा असेलला Vivo S5, याचा लुक असेल खूप खास https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-to-launch-on-14-november-in-china-with-diamond-shape-quad-rear-camera/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-to-launch-on-14-november-in-china-with-diamond-shape-quad-rear-camera/#respond Fri, 01 Nov 2019 10:54:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5649 विशेष म्हणजे Vivo S5 सध्या चीनी बाजारात येईल जो येत्या काळात भारत व अन्य मार्केट्स मध्ये लॉन्च होईल.

The post 14 नोव्हेंबरला लॉन्च होईल डायमंड शेप रियर कॅमेरा असेलला Vivo S5, याचा लुक असेल खूप खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने काही दिवसांपूर्वी सांगितले होते कि कंपनी अंर्तराष्ट्रीय बाजारात आपली ‘एस सीरीज’ वाढवण्याची तयारी करत आहे आणि या सीरीज अंतर्गत लॉन्च होणारा नवीन स्मार्टफोन Vivo S5 असेल. वीवोने वीडियो टीजर जारी करत Vivo S5 च्या नावाचा खुलासा केला होता. तर आज आपल्या फॅन्सची उत्सुकता पाहून Vivo ने आपल्या आगामी स्मार्टफोन Vivo S5 ची लॉन्च डेट पण सांगितली आहे. वीवोने सांगितले आहे कि येत्या 14 नोव्हेंबरला Vivo S5 स्मार्टफोन टेक मंचावर सादर केला जाईल.

Vivo ने चीनी माइक्रोब्लागिंग साइट वेईबो वर वीडियो टीजर शेयर करत Vivo S5 च्या लॉन्च डेटची घोषणा केली आहे. कंपनीने सांगितले आहे कि Vivo येत्या 14 नोव्हेंबरला चीनच्या हॅन्गजौ शहरात एका ईवेंटचे आयोजन करणार आहे आणि या ईवेंटच्या मंचावरून ब्रँडचा आगामी स्मार्टफोन Vivo S5 टेक मार्केट मध्ये येईल. विशेष म्हणजे Vivo S5 सध्या चीनी बाजारात येईल जो येत्या काळात भारत व अन्य मार्केट्स मध्ये लॉन्च होईल.

Vivo S5

वीवो ने एस सीरीजच्या या आगामी डिवाईसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स शेयर केले नाहीत पण समोर आलेले लीक्स पाहता Vivo S5 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करेल ज्यात 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा दिला जाईल. सेल्फी साठी Vivo S5 मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. Vivo S5 8 जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला जाऊ शकतो तसेच फोन मध्ये प्रोसेसिंग साठी क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 675 चिपसेट मिळेल. या फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला जाऊ शकतो.

हे देखील वाचा: Xiaomi ने शेयर केले Mi Note 10 चे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स, 108 MP प्राइमरी कॅमेऱ्यासह असतील 5 रियर कॅमेरा सेंसर

Vivo S5 संबंधित ईमेज किंवा वीडियो समोर आले आहेत त्या वरून समजले आहे कि हा स्मार्टफोन वेगळ्याप्रकारच्या रियर कॅमेऱ्याला सेटअप सपोर्ट करेल. फोनच्या बॅक पॅनल वर डायमंड शेप लेआउट दिली जाईल ज्यात चार सेंसर असतील. या कॅमेरा सेटअपच्या खाली अजून एक सेंसर असेल, जी मॅक्रो लेंस किंवा फ्लॅश लाईट पण असू शकते. कंपनीने अजूनतरी Vivo S5 चा फोटो दाखवला नाही त्यामुळे फोनच्या डिजाईनच्या माहितीवर विश्वास ठेवता येणार नाही.

Vivo S1

भारतातील Vivo S1 बद्दल बोलायचे तर हा फोन 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.38-इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो इन डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह येईल. कंपनीने हा फोन एंडरॉयड 9 पाई आधारित फनटच ओएस वर सादर केला आहे तसेच Vivo S1 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह मीडियाटेक हेलीयो पी65 चिपसेट वर चालतो.

हे देखील वाचा: जाणून घ्या PUBG आणि Call Of Duty पैकी कोण आहे दमदार

Vivo S1 च्या बॅक पॅनल वर एफ/ 1.78 अपर्चरचा 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर + एफ/ 2.2 अपर्चर असलेली 8-मेगापिक्सलची वाइड-अँगल लेंस + एफ/ 2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा तिसरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी साठी Vivo S1 एफ/ 2.0 अपर्चर असलेल्या 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. Vivo S1 मध्ये पावर बॅकअप साठी 4,500एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. Vivo S1 चे 4GB रॅम + 128GB, 6जीबी रॅम + 64GB स्टोरेज आणि 6GB रॅम + 128GB स्टोरेज वेरीएंट क्रमश: 16,990 रुपये, 17,990 रुपये व 18,990 रुपयांमध्ये विकत घेता येतील.

The post 14 नोव्हेंबरला लॉन्च होईल डायमंड शेप रियर कॅमेरा असेलला Vivo S5, याचा लुक असेल खूप खास first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s5-to-launch-on-14-november-in-china-with-diamond-shape-quad-rear-camera/feed/ 0
ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या Vivo S सीरीजचे स्मार्टफोन 7 ऑगस्टला होतील लॉन्च, कंपनीने केले कंफर्म https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-set-to-launch-in-india-on-august-7/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-set-to-launch-in-india-on-august-7/#respond Mon, 22 Jul 2019 18:28:40 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4858 कदाचित कंपनी S1 सोबत S1 Pro पण सादर करेल.

The post ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या Vivo S सीरीजचे स्मार्टफोन 7 ऑगस्टला होतील लॉन्च, कंपनीने केले कंफर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
91मोबाईल्सने अलीकडेच एक्सक्लूसिवली भारतात Vivo S1 च्या लॉन्चिंगची माहिती दिली होती. तसेच फोनच्या लॉन्च डेट आणि किंमतीबद्दल पण आम्ही आमच्या वाचकांना एक्सक्लूसिव माहिती दिली आहे. आता कंपनीने ऑफिशियली Vivo S सीरीजची लॉन्च डेट सांगितली आहे.

कंपनीने मीडिया इनवाइट पाठवून याची घोषणा केली आहे कि कंपनी पुढल्या महिन्यात 7 ऑगस्टला आपली S सीरीज सादर करेल. या मीडिया इनवाइट मध्ये असलेल्या पोस्टर मध्ये फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि कोणत्याही प्रकारची माहिती समोर आलेली नाही.

पण, एस सीरीज लिहिलेले असल्यामुळे आशा केली जात आहे कि कंपनी S सीरीज मध्ये S1 आणि S1 Pro सादर करू शकते. विशेष म्हणजे कंपनीने इंडोनेशिया मध्ये Vivo S1 लॉन्च केला आहे जो चीन मध्ये लॉन्च झालेल्या Vivo S1 पेक्षा खूप वेगळा आहे. हा डिवाइस मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसर वर आधारित पहिला फोन आहे. तसेच डिवाइस अफोर्डेबल कॅटगरी मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि इन-डिस्प्ले सेंसर सह येतो.

या ऑफिशियल लॉन्च डेटच्या आधी कंपनीने आपल्या वीवो इंडिया ट्विटर हँडल वर एक वीडियो टीजर जारी केला होता, ज्यात एस सीरीजच्या येण्याची पक्की माहिती समोर आली होती. आम्हाला अजूनतरी S1 बद्दलच माहिती मिळाली आहे. पण कदाचित कंपनी S1 सोबत S1 Pro पण सादर करेल.

Vivo S1 ची भारतीय किंमत

आमच्या सोर्सनुसार Vivo S1 भारतात दोन रॅम व स्टोरेज ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. यात कंपनी 6जीबी + 64जीबी आणि 6जीबी+ 128जीबी स्टोरेज वेरिएंट लॉन्च करेल. याच्या बेस मॉडेलची किंमत 17,990 रुपये असेल. तर दुसऱ्या मॉडेलच्या किंमतीची माहिती सध्या मिळाली नाही. पण आशा आहे कि फोनचा दुसरा वेरिएंट 20,000 रुपयांच्या आसपास सादर केला जाईल. त्याचबरोबर आम्हाला माहिती मिळाली आहे कि फोन ऑगस्टच्या सुरवातीला प्री-ऑर्डर साठी येईल आणि 15 ऑगस्टला सेल साठी उपलब्ध होईल.

स्पेसिफिकेशन्स

वीवो एस1 च्या ग्लोबल वेरिएंट मध्ये 6.38-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम सह येतो. फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी फोनच्या मागे तीन कॅमेरा आहेत. मागे एफ/ 1.78 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. सोबतच एफ/ 2.2 अपर्चर वाला वाइड-एंगल 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि एफ/ 2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये एफ/ 2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

कनेक्टिविटी फीचर मध्ये वाई-फाई, ब्लूटूथ 5, यूएसबी ओटीजी, माइक्रो-यूएसबी आणि जीपीएस आहे. पावर बॅकअप साठी कंपनीने यात 4,500 एमएएच ची बॅटरी दिली आहे. सोबतच हा फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित फनटच ओएस 9 वर चालतो.

The post ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या Vivo S सीरीजचे स्मार्टफोन 7 ऑगस्टला होतील लॉन्च, कंपनीने केले कंफर्म first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-set-to-launch-in-india-on-august-7/feed/ 0
Exclusive: भारतात येत आहे इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असलेला Vivo S1, समोर आला पहिला फोटो https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-india-launch-soon-and-heres-the-first-teaser-image/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-india-launch-soon-and-heres-the-first-teaser-image/#respond Wed, 10 Jul 2019 12:01:11 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4773 चीन मध्ये लॉन्च झालेली S सीरीज भारतात येत आहे आणि या सीरीजच्या स्मार्टफोन्सची डिजाइन वेगळी असेल.

The post Exclusive: भारतात येत आहे इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असलेला Vivo S1, समोर आला पहिला फोटो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही महिन्यांपूर्वी वीवोने चीन मध्ये आपली ‘एस सीरीज’ वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Vivo S1 आणि S1 Pro लॉन्च केले होते. आता इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असलेला हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होण्यासाठी तयार आहे. चीन मध्ये लॉन्च झालेली S सीरीज भारतात येत आहे आणि या सीरीजच्या स्मार्टफोन्सची डिजाइन वेगळी असेल.

Vivo ची S सीरीज भारतात येण्याची बातमी आम्हाला एक्सक्लूसिवली मिळाली आहे. या डिवाइसच्या लॉन्च डेटचा खुलासा झाला नाही. पण लवकरच S सीरीज मध्ये Vivo S1 आणि S1 Pro स्मार्टफोन केले जातील.

91मोबाईल्सला मिळालेल्या माहितीनुसार कंपनी Vivo S1 आणि S1 Pro स्मार्टफोन 20,000 रुपयांच्यात लॉन्च करू शकते. तसेच डिवाइस 15 ऑगस्टच्या आस-पास भारतात सादर केला जाऊ शकतो. कंपनी कडून याची कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

डिजाइन

टीजर मधून अशी माहिती समोर आली आहे कि भारतात येणाऱ्या Vivo S1 मध्ये रियर मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. पण फोनचा कॅमेरा मॉड्यूल चीन मधील Vivo S सीरीजच्या फोन पेक्षा वेगळा असेल.

किंमत

याआधी आम्ही एक्सक्लूसिवली अशी माहिती दिली होती कि डिवाइस दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये येईल. यात कंपनी 6जीबी + 128जीबी आणि 8जीबी + 128जीबी वर्जन सादर करेल, ज्याची किंमत 20,000 रुपयांच्या आत असेल. हा फोन मार्केट मधील ऑनलाइन एक्सक्लूसिव किंग बनलेल्या रियलमी, शाओमा आणि सॅमसंगला टक्कर देईल.

लीक

विशेष म्हणजे इंडोनेशिया मध्ये पण वीवो आपल्या एस सीरीजचे फोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे. या सीरीज मध्ये येणाऱ्या फोनची डिजाइन इंडोनेशिया आणि भारतात एकसारखी असेल. चीन मधील S1 भारतात Vivo V15 Pro च्या रीब्रांडेड नावाने उपलब्ध आहे. इंडोनेशिया आणि आपल्याकडे आलेला टीजर एक सारखा वाटत आहे. दोन्ही टीजर मध्ये रियर कॅमेऱ्याची डिजाइन एक सारखी आहे. वीवोने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरून जो टीजर जारी केला आहे त्या नुसार फोन मध्ये वॉटर ड्रॉप नॉच सोबत इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. इंडोनेशिया मध्ये Vivo S1 या महिन्यात 16 जुलैला लॉन्च होईल, ज्यात 32-मेगापिक्सलचा एआई फ्रंट कॅमेरा असेल.

The post Exclusive: भारतात येत आहे इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असलेला Vivo S1, समोर आला पहिला फोटो first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-s1-india-launch-soon-and-heres-the-first-teaser-image/feed/ 0