4 जानेवारीला भारतात लॉन्च होईल Vivo S1 Pro, हा असेल भारतातील पहिला डायमंड शेप रियर कॅमेरा फोन

91मोबाईल्सने कालच एक्सक्लूसिव बातमी देत सांगितले होते कि टेक कंपनी वीवो भारतात लवकरच आपल्या ‘एस सीरीज’ चा नवीन डिवाईस Vivo S1 Pro लॉन्च करणार आहे. आमच्या रिपोर्ट मध्ये आम्ही सांगितले होते कि हा स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज सह लॉन्च होईल. आज 91मोबाईल्सच्या बातमीवर शिकामोर्तब करत Vivo ने या स्मार्टफोनची लॉन्च डेट सांगितली आहे. वीवोने सांगितले आहे कि येत्या 4 जानेवारीला Vivo S1 Pro स्मार्टफोन इंडियन मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल. फोनच्या लॉन्च डेट सोबतच Vivo ने एस1 प्रो स्मार्टफोनचे फोटो पण ऑफिशियल केले आहेत.

Vivo India ने आपल्या अधिकृत ट्वीटर हँडल द्वारे Vivo S1 Pro स्मार्टफोनच्या लॉन्चची माहिती दिली आहे. Vivo ने ट्वीटर हेडर अपडेट करत खुलासा केला आहे कि Vivo S1 Pro जानेवारीच्या 4 तारखेला भारतीय बाजारात लॉन्च केला जाईल. या फोटो मध्ये Vivo S1 Pro स्मार्टफोन बॉलीवुड अभिनेत्री सारा अली खानच्या हातात दाखवण्यात आला आहे. फोटो मध्ये फोनचा बॅक पॅनल दिसत आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि Vivo S1 Pro भारतात पण डायमंड शेप क्वॉड रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च होईल.

Vivo S1 Pro

सर्वात आधी सांगायचे तर ऑनलाईन शॉपिंग साइट अमॅझॉन इंडिया वर पण Vivo S1 Pro चे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे ज्यावरून स्प्ष्ट झाले आहे कि हा डिवाईस अमॅझॉन वर सेल साठी उपलब्ध होईल. अमॅझॉन लिस्टिंग मध्ये खुलासा केला गेला आहे कि Vivo S1 Pro स्मार्टफोनच्या फ्रंट पॅनल वर 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. तसेच फोनच्या बॅक पॅनल वर क्वॉड रियर कॅमेरा असेल, ज्यात प्राइमरी सेंसर 48 मेगापिक्सलचा दिला जाईल.

फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता Vivo S1 Pro मध्ये तुम्हाला 6.38-इंचाचा फुल एचडी+ सुपर एमोलेड डिस्प्ले मिळेल. हि स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह येईल. Vivo S1 Pro एंडरॉयड 9 पाई वर चालतो तसेच आशा आहे कि भारतात हा फनटच 10 वर लॉन्च होईल. फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 665 चिपसेट दिला जाईल.

Vivo S1 Pro भारतात 8 जीबी की रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च होईल. कंपनी हा डिवाईस एकापेक्षा जास्त वेरिएंट मध्ये बाजारात आणू शकते. फोटोग्राफी साठी फोनच्या बॅक पॅनल वरील क्वॉड रियर कॅमेरा सेटअप मध्ये एफ/1.78 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर असेल ज्यासोबत 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि तसेच इतर दोन सेंसर 2 मेगापिक्सलचे असतील.

Vivo S1 Pro डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई फीचर सह लॉन्च होईल. पावर बॅकअप साठी या डिवाईस मध्ये 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4500एमएएच ची बॅटरी मिळेल. किंमत पाहता आम्हाला मिळलेल्या माहिती नुसार Vivo S1 Pro 19,990 रुपयांमध्ये भारतात लॉन्च केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here