Vivo ने काही दिवसांपूर्वी फिलिपिंस मार्केट मध्ये आपला Vivo S1 Pro स्मार्टफोन लॉन्च केला होता, जो आज भारतीय बाजारात सादर केला गेला आहे. अधिकृतपणे सादर केल्या गेलेल्या वीवो एस1 प्रो मध्ये चार रियर कॅमेरा देण्यात आले आहेत जे डायमंड सेटअप मध्ये आहेत. डिवाइस मिस्टिक ब्लॅक, जॅजी ब्लू आणि ड्रीमी व्हाइट मध्ये सादर केला गेला आहे.
किंमत आणि सेल ऑफर्स
Vivo S1 Pro कंपनीने एकाच वेरिएंट 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेज ऑप्शन मध्ये सादर केला आहे, ज्याची किंमत 19,990 रुपये आहे. हँडसेट 5 जानेवारी म्हणजे शनिवार पासून ऑफलाइन आणि ऑनलाइन सेल साठी सादर केला जाईल. ऑफर्स पाहता ऑफलाइन ICICI बॅंकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 10% कॅशबॅक मिळेल. तसेच फोन सोबत वन टाइन स्क्रीन रिप्लेसमेंट मिळेल. ऑफलाइन व्यतिरिक्त ऑनलाइन हा फोन विकत घेतल्यास 31 जानेवारी पर्यंत वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट मिळेल. ICICI बॅंकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 10% कॅशबॅक, नो-कोस्ट ईएमआई व 31 जानेवारी पर्यंत जियो कडून Rs 12000 चे फायदे मिळतील.

डिजाइन
Vivo S1 Pro ची डिजाइन पाहता फोन बेजल लेस वॉटरड्रॉप डिस्प्ले वर लॉन्च झाला आहे. तसेच फोन मध्ये राउंड ऐजेज कॉनर देण्यात आले आहेत. खालच्या बाजूला थोडा रुंद बॉडी पार्ट देण्यात आला आहे. Vivo S1 Pro डायमंड शेप क्वॉड रियर कॅमेरा सेटअप वर लॉन्च झाला आहे जो बॅक पॅनल वर मधोमध देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे तसेच रियर पॅनल वर खालच्या बाजूला Vivo चा लोगो पण आहे.
शानदार कॅमेरा
कॅमेरा सेटअप पाहता Vivo S1 Pro मध्ये डायमंड आकाराचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे, एफ/ 1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर आहे. सोबत 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड एंगल सेंसर देण्यात आला आहे आणि 2 मेगापिक्सलचे दोन सेंसर आहेत, एक डेप्थ सेंसिंग आणि एक मॅक्रो फोटोग्राफी साठी . तसेच फ्रंट कॅमेरा एफ/ 2.0 अपर्चर असलेल्या 32 मेगापिक्सल सह येतो.
स्पेसिफिकेशन्स
या फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता स्मार्टफोन मध्ये 6.38 इंचाचा फुल-एचडी+ (2340×1080 पिक्सल) सुपर एमोलेड फुलव्यू डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा आस्पेक्ट रेशियो 19.5.9 आहे. तसेच स्मार्टफोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 665 प्रोसेसर सह 8 जीबी रॅम आहे आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.
डिवाइसची स्टोरेज ग्राहक माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवू शकतात. तसेच फोन मध्ये कनेक्टिविटी ऑप्शन साठी 4जी एलटीई, डुअल-बॅंड वाई-फाई, ब्लूटूथ वर्जन 5.0, जीपीएस/ए-जीपीएस, एफएम रेडियो आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट आहे. सिक्योरिटी साठी फोन मध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर आहे.
वीवो एस1 प्रो Android 9 Pie वर आधारित फनटच ओएस 9.2 वर चालतो. तसेच फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. या डिवाइसच्या दुसऱ्या रॅम वेरिएंट बद्दल अजूनतरी माहिती मिळाली नाही. पण असे बोलले जात आहे कि कंपनी या डिवाइसचे कमी रॅम वेरिएंट सादर करू शकते.
वीवो एस1 प्रो वीडियो















