Exclusive: भारतात येत आहे इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असलेला Vivo S1, समोर आला पहिला फोटो

काही महिन्यांपूर्वी वीवोने चीन मध्ये आपली ‘एस सीरीज’ वाढवत दोन नवीन स्मार्टफोन Vivo S1 आणि S1 Pro लॉन्च केले होते. आता इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असलेला हा स्मार्टफोन भारतात लॉन्च होण्यासाठी तयार आहे. चीन मध्ये लॉन्च झालेली S सीरीज भारतात येत आहे आणि या सीरीजच्या स्मार्टफोन्सची डिजाइन वेगळी असेल.

Vivo ची S सीरीज भारतात येण्याची बातमी आम्हाला एक्सक्लूसिवली मिळाली आहे. या डिवाइसच्या लॉन्च डेटचा खुलासा झाला नाही. पण लवकरच S सीरीज मध्ये Vivo S1 आणि S1 Pro स्मार्टफोन केले जातील.

91मोबाईल्सला मिळालेल्या माहितीनुसार कंपनी Vivo S1 आणि S1 Pro स्मार्टफोन 20,000 रुपयांच्यात लॉन्च करू शकते. तसेच डिवाइस 15 ऑगस्टच्या आस-पास भारतात सादर केला जाऊ शकतो. कंपनी कडून याची कोणतीही अधिकृत माहिती आलेली नाही.

डिजाइन

टीजर मधून अशी माहिती समोर आली आहे कि भारतात येणाऱ्या Vivo S1 मध्ये रियर मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. पण फोनचा कॅमेरा मॉड्यूल चीन मधील Vivo S सीरीजच्या फोन पेक्षा वेगळा असेल.

किंमत

याआधी आम्ही एक्सक्लूसिवली अशी माहिती दिली होती कि डिवाइस दोन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये येईल. यात कंपनी 6जीबी + 128जीबी आणि 8जीबी + 128जीबी वर्जन सादर करेल, ज्याची किंमत 20,000 रुपयांच्या आत असेल. हा फोन मार्केट मधील ऑनलाइन एक्सक्लूसिव किंग बनलेल्या रियलमी, शाओमा आणि सॅमसंगला टक्कर देईल.

लीक

विशेष म्हणजे इंडोनेशिया मध्ये पण वीवो आपल्या एस सीरीजचे फोन लॉन्च करण्यासाठी तयार आहे. या सीरीज मध्ये येणाऱ्या फोनची डिजाइन इंडोनेशिया आणि भारतात एकसारखी असेल. चीन मधील S1 भारतात Vivo V15 Pro च्या रीब्रांडेड नावाने उपलब्ध आहे. इंडोनेशिया आणि आपल्याकडे आलेला टीजर एक सारखा वाटत आहे. दोन्ही टीजर मध्ये रियर कॅमेऱ्याची डिजाइन एक सारखी आहे. वीवोने आपल्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरून जो टीजर जारी केला आहे त्या नुसार फोन मध्ये वॉटर ड्रॉप नॉच सोबत इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर असेल. इंडोनेशिया मध्ये Vivo S1 या महिन्यात 16 जुलैला लॉन्च होईल, ज्यात 32-मेगापिक्सलचा एआई फ्रंट कॅमेरा असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here