Vivo T1x - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 20 Jul 2022 09:13:25 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 बजेट फ्रेंडीली गेमिंग फोन! 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह Vivo T1x स्मार्टफोन लाँच https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-and-50mp-camera-featured-vivo-t1x-smartphone-launched/ https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-and-50mp-camera-featured-vivo-t1x-smartphone-launched/#respond Wed, 20 Jul 2022 09:13:25 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11567 Vivo T1x स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या Snapdragon 680 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे.

The post बजेट फ्रेंडीली गेमिंग फोन! 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह Vivo T1x स्मार्टफोन लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo काही महिन्यांपूर्वी भारतात आपली नवीन टी सीरिज सादर केली होती. या सीरिज अंतर्गत कंपनीनं तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. आता त्यात बजेट फ्रेंडली Vivo T1x स्मार्टफोनची भर टाकण्यात आली आहे. या फोनमध्ये 6.58-इंचाचा FHD+ डिस्प्ले, Snapdragon 680 प्रोसेसर, 4G नेटवर्क कनेक्टिव्हिटी, Android 12 OS, 5000mAh बॅटरीसह 18W फास्ट चार्जिंग आणि 50MP प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. किंमत कमी असून देखील या हँडसेटमध्ये गेमिंग फ्रेंडली फीचर्स देखील देण्यात आले आहेत. ज्यात 4-लेयर ग्रॅफाइट कूलिंग प्लेट, हाय हीट कंडक्टिविटी कॉपर फॉईल, थर्मली कंडक्टिव जेल आणि कूलिंग टर्बो कूलिंग सिस्टम देण्यात आली आहे जी गेमिंग करताना फोनला वेगानं थंड करते.

Vivo T1x ची किंमत

Vivo T1x स्मार्टफोनचा दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. याच्या बेस व्हेरिएंट 4GB रॅम व 64GB स्टोरेज मिळते जो 11,999 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलसाठी 12,999 रुपये द्यावे लागतील. Vivo T1x स्मार्टफोन भारतात 27 जुलैपासून विक्रीसाठी येईल. हा हँडसेट फ्लिपकार्टसह विवोच्या ई-स्टोरवरून विकत घेता येईल. लाँच ऑफर अंतर्गत HDFC बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. हे देखील वाचा: 50MP कॅमेऱ्यासह झाली Vivo च्या स्वस्त 5G स्मार्टफोनची एंट्री; 12GB रॅमसह मीडियाटेक प्रोसेसरची ताकद

Vivo T1x चे स्पेसिफिकेशन्स

  • 6.58-inch Full HD+ डिस्प्ले (90Hz रिफ्रेश रेट)
  • Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर
  • 6GB पर्यंत रॅम आणि 128GB स्टोरेज
  • Android 12 OS
  • 50MP + 2MP ड्युअल रियर कॅमेरा
  • 8MP सेल्फी शूटर
  • 5000mAh बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग

Vivo T1x स्मार्टफोनमध्ये 6.58-इंचाचा Full HD+ 2.5D LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2408×1080 पिक्सल देण्यात आला आहे. या फोनमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप नॉच मिळते. हा डिस्प्ले 90.6 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. Vivo T1x स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: 32MP च्या सेल्फी कॅमेऱ्यासह शानदार Vivo V25 Pro येणार भारतात; लाँचपूर्वीच जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 680 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी Adreno 610 GPU देण्यात आला आहे. सोबतीला 6GB पर्यंत RAM आणि 128GB पर्यांतची इंटरनल स्टोरेज आहे. तसेच व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं 2GB अतिरिक्त रॅम देखील मिळतो. विवोचा हा फोन Android 12 आधारित Funtouch OS कस्टम स्किन वर चालतो. स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा मिळते. यात 5000mAh ची बॅटरी देण्यात आली जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. तसेच कंपनी या फोनमध्ये VEG (Vivo Energy Guardian) टेक्नॉलॉजी दिली आहे जी बॅटरी एफिशियंसी वाढवते.

The post बजेट फ्रेंडीली गेमिंग फोन! 5000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्यासह Vivo T1x स्मार्टफोन लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/5000mah-battery-and-50mp-camera-featured-vivo-t1x-smartphone-launched/feed/ 0
Vivo चा स्वस्त स्मार्टफोन लवकरच येतोय भारतात; कमी किंमतीत 50MP कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर https://www.91mobiles.com/marathi/vivo-t1x-india-launch-confirmed-check-details/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-t1x-india-launch-confirmed-check-details/#respond Wed, 13 Jul 2022 10:12:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11358 Vivo T1x स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमच्या Snapdragon 680 प्रोसेसर आणि 50MP कॅमेरा दिला जाईल.

The post Vivo चा स्वस्त स्मार्टफोन लवकरच येतोय भारतात; कमी किंमतीत 50MP कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo नं काही दिवसांपूर्वी आपली नवीन टी सीरिज भारतात लाँच केली होती. कंपनीनं या सीरिजमध्ये Vivo T1 5G, Vivo T1 Pro 5G, आणि Vivo T1 हे स्मार्टफोन सादर केले आहेत. आता आलेल्या माहितीनुसार या सीरिजमध्ये आणखी एका डिवाइसची भर पडणार आहे. आता कंपनी या सीरीजचा चौथा स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीनं ट्विटरवरून कंपनी लवकरच T सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच करेल, असं सांगितलं आहे. विवोचा हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वरून विकला जाईल.

विवोनं ट्वीटमधून आपल्या आगामी स्मार्टफोनच्या फक्त लाँचची माहिती दिली आहे. या हँडसेटचं काय असेल किंवा कोणत्या स्पेसिफिकेशन्ससह याची एंट्री होईल अशी कोणतीही माहिती कंपनीनं या पोस्टमधून दिली नाही. परंतु ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या लिस्टिंगमधून कन्फर्म झालं आहे की विवोचा आगामी स्मार्टफोन Vivo T1x आहे, जो लवकरच भारतात सादर केला जाऊ शकतो. पुढे आम्ही तुम्हाला Vivo T1x स्मार्टफोनची संपूर्ण माहिती देणार आहोत.

Vivo T1x भारतात लवकरच होईल लाँच

Vivo T1x स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच होणार आहे. कंपनीनं जरी या हँडसेटची माहिती दिली नसली तरी हा फोन जागतिक बाजारात याआधी लाँच झाला आहे. त्यामुळे विवोच्या आगामी अपकमिंग स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि अन्य माहिती आधीपासूनच उपलब्ध आहे. Vivo T1x स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात येईल. या फोनमध्ये 4GB RAM आणि 128 GB स्टोरेज मिळेल. फोनमध्ये 4GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम मिळेल म्हणजे एकूण 8GB रॅमची ताकद मिळवता येतील. हा फोन Android 12 वर आधारित Funtouch OS 12 वर चालेल. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत Nokia C21 Plus स्मार्टफोन लाँच; 8 इंचाचा Nokia T10 टॅबलेटही ग्राहकांच्या भेटीला

Vivo T1x फोनमध्ये 6.58-इंचाचा Full HD+ LCD डिस्प्ले देण्यात येईल, ज्याचे रिजोल्यूशन 2408×1080 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 90Hz असेल. विवोचा हा फोन 4G कनेक्टिव्हिटी ड्युअल सिमला सपोर्ट करेल. फोनमध्ये ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.0, आणि Type-C पोर्टची कनेक्टिव्हिटी मिळेल. हा फोन Multi-Turbo 5.0 आणि साइड माउंड फिंगरप्रिंट सेन्सरसह सादर केला जाईल.

विवोच्या अपकमिंग फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा असेल. प्रायमरी कॅमेऱ्यासह फोनमध्ये 2MP चा डेप्थ आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर मिळेल. Vivo T1x स्मार्टफोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा असेल. स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्ज मिळेल. फोन ब्लॅक आणि ब्लू दोन ऑप्शनमध्ये येऊ शकतो. हे देखील वाचा:

किंमत

Vivo T1 5G स्मार्टफोन मलेशियात लाँच करण्यात आला आहे. तिथे या हँडसेटच्या 8GB RAM व 128GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत RM 1,299 ठेवण्यात आली आहे. ही किंमत 23,300 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. भारतीय व्हेरिएंटची किंमत याच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

The post Vivo चा स्वस्त स्मार्टफोन लवकरच येतोय भारतात; कमी किंमतीत 50MP कॅमेरा आणि दमदार प्रोसेसर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-t1x-india-launch-confirmed-check-details/feed/ 0