50MP कॅमेऱ्यासह झाली Vivo च्या स्वस्त 5G स्मार्टफोनची एंट्री; 12GB रॅमसह मीडियाटेक प्रोसेसरची ताकद

Vivo नं होम मार्केट चीनमध्ये आपल्या स्मार्टफोन पोर्टफोलियोचा विस्तार सुरूच ठेवला आहे. कंपनीनं मिडरेंज सेगमेंटमध्ये Vivo Y77 5G लाँच केला आहे. चीनमध्ये आलेला Vivo Y77 5G स्मार्टफोन मलेशियन मॉडेलपेक्षा वेगळ्या प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. Vivo चा हा लेटेस्ट मिड रेंज स्मार्टफोन चीनमध्ये MediaTek Dimensity 930 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. तसेच फोनमध्ये 4500mAh बॅटरी, 50MP चा कॅमेरा, 120Hz रिफ्रेश रेट आणि 80W फास्ट चार्जिंग असे फीचर्सही मिळतात. इथे आम्ही तुम्हाला Vivo Y77 5G स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती देत आहोत.

Vivo Y77 5G ची किंमत

Vivo Y77 5G स्मार्टफोनचे चार व्हेरिएंट चीनमध्ये सादर करण्यात आले आहेत. या हँडसेटचा 6GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेल चीनमध्ये 1,499 युआन (सुमारे 17,800 रुपये) मध्ये सादर करण्यात आला आहे. तर 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेल 1,599 युआन (सुमारे 19,000 रुपये), 8GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेल 1,799 युआन (सुमारे 21,300 रुपये) आणि 12GB रॅम व 256GB स्टोरेज व्हेरिएंट 1,999 युआन (सुमारे 23,700 रुपये) मध्ये विकत घेता येईल. विवोचा हा स्मार्टफोन सध्या फक्त चीनमध्ये लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटच्या जागतिक लाँचची माहिती मात्र समोर आली नाही. हे देखील वाचा: Nothing Phone (1) चा रिटेल बॉक्स आला समोर; जाणून घ्या कंपनी बॉक्समध्ये काय देत आहे

Vivo Y77 5G चे स्पेसिफिकेशन्स

Vivo Y77 5G स्मार्टफोनमध्ये 6.64-इंचाचा Full HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले 2388 × 1080 पिक्सल रिजोल्यूशन, 1500:1 कॉन्ट्रास्ट रेश्यो आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. Vivo चा हा स्मार्टफोन 4500mAh ची बॅटरीसह बाजारात आला आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीनं यात साईड माउंटेड फिंगरप्रिंटची सुरक्षा दिली आहे.

Vivo Y-सीरीजच्या या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर मिळतो. तसेच फ्रंटला 8MP चा सेल्फी शुटर देण्यात आला आहे. फोनमध्ये Type-C पोर्ट आणि 3.5mm ऑडियो जॅक देण्यात आला आहे. तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम, 5G, WiFi, Bluetooth 5.3, GPS, Glonass, Galileo, आणि Beidou सपोर्ट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 200MP चा कॅमेरा! शाओमी-सॅमसंग नव्हे तर ‘ही’ कंपनी करणार कमाल; लाँचपूर्वीच स्पेसिफिकेशन लीक

Vivo च्या या स्मार्टफोनमध्ये MediaTek चा ऑक्टा कोर Dimensity 930 प्रोसेसर देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी IMG BXM GPU मिळतो. हा फोन 12GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 256GB पर्यंत UFS2.2 स्टोरेजसह सादर करण्यात आला आहे. तसेच हँडसेट अँड्रॉइड 12 आधारित OriginOS वर चालतो. Vivo Y77 5G स्मार्टफोन ब्लॅक, ब्लू आणि पिंक कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here