Vivo नं काही दिवसांपूर्वी आपली नवीन टी सीरिज भारतात लाँच केली होती. कंपनीनं या सीरिजमध्ये Vivo T1 5G, Vivo T1 Pro 5G, आणि Vivo T1 हे स्मार्टफोन सादर केले आहेत. आता आलेल्या माहितीनुसार या सीरिजमध्ये आणखी एका डिवाइसची भर पडणार आहे. आता कंपनी या सीरीजचा चौथा स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीनं ट्विटरवरून कंपनी लवकरच T सीरीजचा नवीन स्मार्टफोन लाँच करेल, असं सांगितलं आहे. विवोचा हा स्मार्टफोन ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Flipkart वरून विकला जाईल.
विवोनं ट्वीटमधून आपल्या आगामी स्मार्टफोनच्या फक्त लाँचची माहिती दिली आहे. या हँडसेटचं काय असेल किंवा कोणत्या स्पेसिफिकेशन्ससह याची एंट्री होईल अशी कोणतीही माहिती कंपनीनं या पोस्टमधून दिली नाही. परंतु ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टच्या लिस्टिंगमधून कन्फर्म झालं आहे की विवोचा आगामी स्मार्टफोन Vivo T1x आहे, जो लवकरच भारतात सादर केला जाऊ शकतो. पुढे आम्ही तुम्हाला Vivo T1x स्मार्टफोनची संपूर्ण माहिती देणार आहोत.
For a generation that always wants to do more every day, your chance to enter the Turbo world is #ComingSoon.
Know More: https://t.co/mqgB5T5RBj#vivoSeriesT #TurboLife #GetSetTurbo #NewLaunch #NewLaunchAlert pic.twitter.com/N1KUdg2M7I— Vivo India (@Vivo_India) July 12, 2022
Vivo T1x भारतात लवकरच होईल लाँच
Vivo T1x स्मार्टफोन भारतात लवकरच लाँच होणार आहे. कंपनीनं जरी या हँडसेटची माहिती दिली नसली तरी हा फोन जागतिक बाजारात याआधी लाँच झाला आहे. त्यामुळे विवोच्या आगामी अपकमिंग स्मार्टफोनचे स्पेसिफिकेशन्स आणि अन्य माहिती आधीपासूनच उपलब्ध आहे. Vivo T1x स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात येईल. या फोनमध्ये 4GB RAM आणि 128 GB स्टोरेज मिळेल. फोनमध्ये 4GB पर्यंत व्हर्च्युअल रॅम मिळेल म्हणजे एकूण 8GB रॅमची ताकद मिळवता येतील. हा फोन Android 12 वर आधारित Funtouch OS 12 वर चालेल. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत Nokia C21 Plus स्मार्टफोन लाँच; 8 इंचाचा Nokia T10 टॅबलेटही ग्राहकांच्या भेटीला
Vivo T1x फोनमध्ये 6.58-इंचाचा Full HD+ LCD डिस्प्ले देण्यात येईल, ज्याचे रिजोल्यूशन 2408×1080 पिक्सल आणि रिफ्रेश रेट 90Hz असेल. विवोचा हा फोन 4G कनेक्टिव्हिटी ड्युअल सिमला सपोर्ट करेल. फोनमध्ये ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth 5.0, आणि Type-C पोर्टची कनेक्टिव्हिटी मिळेल. हा फोन Multi-Turbo 5.0 आणि साइड माउंड फिंगरप्रिंट सेन्सरसह सादर केला जाईल.
विवोच्या अपकमिंग फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. ज्यात 50MP चा प्रायमरी कॅमेरा असेल. प्रायमरी कॅमेऱ्यासह फोनमध्ये 2MP चा डेप्थ आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर मिळेल. Vivo T1x स्मार्टफोनमध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा असेल. स्मार्टफोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी आणि 18W फास्ट चार्ज मिळेल. फोन ब्लॅक आणि ब्लू दोन ऑप्शनमध्ये येऊ शकतो. हे देखील वाचा:
किंमत
Vivo T1 5G स्मार्टफोन मलेशियात लाँच करण्यात आला आहे. तिथे या हँडसेटच्या 8GB RAM व 128GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत RM 1,299 ठेवण्यात आली आहे. ही किंमत 23,300 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. भारतीय व्हेरिएंटची किंमत याच्या आसपास असण्याची शक्यता आहे.














