Vivo U1 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 21 Aug 2019 11:29:28 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Vivo भारतात 6 नवीन स्मार्टफोन करेल लॉन्च, U series ची पण होईल सुरवात https://www.91mobiles.com/marathi/vivo-to-launch-6-new-smartphone-india-including-u-series/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-to-launch-6-new-smartphone-india-including-u-series/#respond Wed, 21 Aug 2019 11:29:06 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5081 कपंनी 8,000 रुपये व त्यापेक्षा जास्त लो बजेट सेग्मेंट मध्ये U series सादर करेल.

The post Vivo भारतात 6 नवीन स्मार्टफोन करेल लॉन्च, U series ची पण होईल सुरवात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Vivo ने सांगितले आहे कि कंपनी भारतात आपल्या Z series चा विस्तार करत अजून एक नवीन डिवाईस आणणार आहे. हा फोन Vivo Z1 Pro चा अपग्रेडेड वर्जन असेल जो पुढल्या महिन्यात बाजारात येईल. तर आता Vivo संबंधित अजून एक बातमी समोर येत आहे कि कंपनी देशात अजून एक नवीन स्मार्टफोन सीरीज आणण्याची तयारी करत आहे जी ‘U series’ च्या नावाने लॉन्च केली जाईल. Vivo India चे डायरेक्टर Nipun Marya यांनी इंडियन पब्लिकेशनला दिलेल्या एका इंटरव्यू मध्ये Vivo U series संबंधित महत्वाची माहिती दिली आहे.

Vivo U series बद्दल निपुण मार्या यांनी इकॉनॉमिक्स टाईम्सला सांगितले आहे कि कंपनी लवकरच भारतीय बाजारात हि नवीन स्मार्टफोन सीरीज घेऊन येणार आहे. Vivo U series कंपनी Z series प्रमाणे फक्त ऑनलाईन सेग्मेंट मध्ये आणेल जी ई-कॉमर्स वेबसाइट वर सेल साठी उपलब्ध होईल. Vivo India हेड नुसार Vivo U series 8,000 रुपयांपासून 20,000 रुपयांच्या बजेट मध्ये येईल. या सीरीजचा पहिला स्मार्टफोन Vivo U1 असू शकतो.

6 नवीन फोन होतील लॉन्च

कंपनीच्या नवीन स्मार्टफोन सीरीज व्यतिरिक्त या मुलाखतीत सांगण्यात आले आहे कि Vivo कंपनी येत्या फेस्टिव सीजन मध्ये 6 नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करेल. हे स्मार्टफोन्स ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवर विकले जातील. हे 6 नवीन फोन Vivo U series, Vivo Z series, Vivo S series आणि Vivo V series मधील असतील. विशेष म्हणजे 91मोबाईल्सने आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये Vivo V17 pro आणि V17 स्मार्टफोनची माहिती आधीच दिली आहे.

Vivo ची स्ट्रॅटेजी पाहता कपंनी 8,000 रुपये व त्यापेक्षा जास्त लो बजेट सेग्मेंट मध्ये U series सादर करेल. तर 15,000 रुपयांपासून 20,000 रुपयांच्या मध्ये कंपनीची Vivo S series येईल. त्याचप्रमाणे 20,000 रुपयांपासून 30,000 रुपयांपर्यंत फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये कंपनी Vivo V series सह इंडियन स्मार्टफोन मार्केट वर राज्य करण्याचा प्रयत्न करेल.

Vivo V17 series

या सीरीज मध्ये लॉन्च होणाऱ्या Vivo V17 pro स्मार्टफोन मध्ये तुम्हाला पॉप-अप कॅमेरा सह क्वॉड कॅमेरा मिळेल. हा वी15 चा अपग्रेड वर्जन असल्यामुळे अश्या अनेक गोष्टींचे तुम्हाला अपग्रेड मिळू शकतात. वी15 प्रो मध्ये तुम्हाला 6.39-इंचाची एमोलेड स्क्रीन मिळत होती तर हा फोन मोठ्या स्क्रीन सह येऊ शकतो आणि हा पण कंपनी एमोलेड स्क्रीन सह सादर करू शकते.

तसेच क्वालकॉम 600 सीरीजच्या प्रोसेसरच्या जागी यावेळी कंपनी स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजच्या प्रोसेसर सह फोन सादर करू शकते. आशा आहे कि कंपनी स्नॅपड्रॅगॉन 730 किंवा 730जी चिपसेट वर सादर करेल. त्याचबरोबर फोन मध्ये 6जीबी आणि 8जीबी की रॅम मेमरी मिळू शकते. किंमतीबद्दल बोलले जात आहे कि Vivo V17 सीरीजची किंमत 30,000 रुपयांपर्यंत असेल.

The post Vivo भारतात 6 नवीन स्मार्टफोन करेल लॉन्च, U series ची पण होईल सुरवात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-to-launch-6-new-smartphone-india-including-u-series/feed/ 0
एक्सक्लूसिव : Vivo U सीरीज येत आहे भारतात, किंमत होईल 6,490 रुपयांपासून सुरु https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-u-series-to-launch-in-india-soon/ https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-u-series-to-launch-in-india-soon/#respond Wed, 24 Apr 2019 11:04:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4139 या नवीन सीरीज अंतर्गत एंडरॉयड गो आधारित स्मार्टफोन पण लॉन्च केले जाऊ शकतात.

The post एक्सक्लूसिव : Vivo U सीरीज येत आहे भारतात, किंमत होईल 6,490 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
टेक कंपनी वीवो ने अलीकडेच भारतीय बाजारात आपल्या ‘वी सीरीज’ चा विस्तार करत दोन नवीन फोन वीवो वी15 आणि वी15 प्रो लॉन्च केले होते. ये दोन्ही स्मार्टफोन फुलव्यू बेजल लेस डिस्प्ले सह सादर केले गेले होते जे पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. वीवो फॅन्सना भेट देत कंपनीने आजच वी15 च्या 6जीबी रॅम वेरिएंटची किंमत कमी केली आहे, ज्यामुळे हा 21,990 रुपयांमध्ये मिळेल. तर दुसरीकडे अशी बातमी पण येत आहे कि वीवो भारतात लो बजेट सेग्मेंट मध्ये नवीन सुरुवात करण्याची तयारी करत आहे, आणि इंडियन मार्केट मध्ये वीवोची ‘यू सीरीज’ लॉन्च होणार आहे.

91मोबाईल्सला सूत्रांकडून एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे कि वीवो भारतात आपली नवीन स्मार्टफोन सीरीज Vivo U च्या रूपात आणण्याची तयारी करत आहे. वीवोची यू सीरीज खासकरून लो बजेट सेग्मेंट साठीच लॉन्च केली जाईल आणि या सीरीज मध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी असेल. प्राप्त माहितीनुसार वीवो पुढल्या महिन्यात Vivo U सीरीज भारतीय बाजारात आणू शकते.

Vivo U सीरीजच्या इंडिया लॉन्च बद्दल अशी बातमी पण मिळाली आहे कि Vivo U मध्ये येणारा पहिला स्मार्टफोन कंपनी दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च करेल. Vivo U सीरीजच्या या स्मार्टफोनची सुरवाती किंमत 6,490 रुपये असेल तर दुसरा वेरिएंट 8,490 रुपयांमध्ये लॉन्च केला जाईल. तर दुसरीकडे अशी माहिती पण समोर येत आहे कि वीवोच्या या नवीन सीरीज अंतर्गत एंडरॉयड गो आधारित स्मार्टफोन पण लॉन्च केले जाऊ शकतात.

Vivo U1
विशेष म्हणजे वीवोने चीन मध्ये आपली हि स्मार्टफोन सीरीज सुरु केली आहे तसेच तिथे कंपनीने Vivo U1 स्मार्टफोन लॉन्च केला होता. Vivo U1 कंपनी ने ग्लास फिनिश पॉलिकार्बोनेट बॉडी सह सादर केला आहे जो वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा फोन 19:9 आसपेक्ट रेशियो 6.2-इंचाच्या एचडी+ डिस्प्ले सह लॉन्च केला गेला आहे जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे.

हे देखील वाचा: एक्सक्लूसिव : 8जीबी रॅम सह पण लॉन्च होईल Realme 3 Pro, किंमत असेल 18,000 रुपयांच्या आसपास

Vivo U1 एंडरॉयड 8.1 ओरियो आधारित फनटच ओएस 4.5 वर सादर केला गेला आहे जो 1.95गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड वाले ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट वर चालतो. चीन मध्ये Vivo U1 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी वर लॉन्च केला गेला आहे. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज 256जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Vivo U1 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 13-मेगापिक्सलचा प्राइमरी तसेच 2-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. इसी तरह सेल्फी साठी यह फोन 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोन के बॅक पॅनल वर जहां फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच सोबत या फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो.

हे देखील वाचा: फक्त 6,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला ट्रिपल रियर कॅमेरा असलेला Infinix Smart 3 Plus

Vivo U1 मध्ये डुअल सिम सपोर्ट सोबत 4जी वोएलटीई सपोर्ट पण देण्यात आला आहे. तसेच चार्जिंग व डेटा ट्रांसफर साठी माइक्रो यूएसबी पोर्ट सह 4,030 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. चीन मध्ये हा फोन 1199 युआन मध्ये लॉन्च केला गेला आहे जे भारतीय कंरसी अनुसार 11,000 रुपये होतात.

The post एक्सक्लूसिव : Vivo U सीरीज येत आहे भारतात, किंमत होईल 6,490 रुपयांपासून सुरु first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/exclusive-vivo-u-series-to-launch-in-india-soon/feed/ 0
डुअल कॅमेरा आणि वाटर ड्रॉप नॉच सह लॉन्च झाला वीवोचा स्वस्तातला फोन यू1 https://www.91mobiles.com/marathi/vivo-u1-launched-price-specification-and-features-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/vivo-u1-launched-price-specification-and-features-in-marathi/#respond Wed, 20 Feb 2019 11:50:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3671 चीन मध्ये हा 1199 यूआन मध्ये लॉन्च केला गेला आहे जे भारतीय करन्सीनुसार 11,000 रुपये होतात

The post डुअल कॅमेरा आणि वाटर ड्रॉप नॉच सह लॉन्च झाला वीवोचा स्वस्तातला फोन यू1 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि वीवो लवकरच आपला नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. पण यावेळी ​सीरीज अगदी नवीन असेल. कंपनी यू1 नावाने नवीन मॉडेल सादर करू शकते. आज कंपनी ने हा फोन समोर आणला आहे. मिड रेंजचा हा फोन दिसायला खूप स्टाइलिश आहे आणि फीचर्स पण दमदार आहेत. पण वीवो यू1 सध्या चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे पण कंपनी हा लवकरच भारतात पण सादर करू शकते. हा फोन ऑरा, ऑरा रेड आणि स्टारी नाइट ब्लॅक सहित तीन रंगात उपलब्ध आहे.

वीवो यू1 चे स्पेसिफिकेशन
वीवो यू1 कंपनी ने ग्लास फिनिश पॉलिकार्बोनेट बॉडी सह सादर केला आहे. तसेच फोन मध्ये वॉटर ड्रॉप नॉच असलेली स्क्रीन आहे जी 19:9 आसपेक्ट रेशियो सह उपलब्ध आहे. फोनची स्क्रीन साइज 6.2—इंच आहे आणि एचडी+ रेजल्यूशन सह येतो. कंपनी ने 2.5डी कर्व्ड ग्लासचा वापर केला आहे. स्क्रीन प्रोटेक्शन बद्दल बोलायचे झाले तर कंपनी ने याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

वीवो यू1 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 439 चिपसेट सह सादर केला गेला आहे. यात तुम्हाला 1.95गीगाहट्र्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा 3जीबी रॅम सह 32जीबी मेमरी आणि 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी सह येतो. तसेच फोन मध्ये 256जीबी पर्यंतचा मेमरी कार्ड सपोर्ट आहे. फोनचा प्रोसेसर थोडा जुना आहे असे म्हणता येईल.

वीवोचा हा फोन फनटच ओएस 4.5 वर चालतो जो एंडरॉयड ऑपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो वर आधारित आहे. पण हि ऑपरेटिंग सिस्टम आता जुनी झाली आहे. हा एंडरॉयड 9 पाई वर सादर झाला असता तर चांगले झाले असते.

वीवो यू1 चा कॅमेरा

वीवो यू1 च्या बॅक पॅनल मध्ये कंपनी ने डुअल कॅमेरा दिला आहे. यात मेन सेंसर 13-मेगापिक्सलचा आहे तर दुसरा सेंसर 2-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे. तसेच फ्रंट कॅमेरा 8-मेगापिक्सलचा आहे. यात फिंगरप्रिंट स्कॅनर सह फेस अनलॉक पण देण्यात आला आहे.

वीवो यू1 कनेक्टिविटी

या फोन मध्ये डुअल सिम सपोर्ट सह 4जी वोएलटीई आहे. तसेच चार्जिंग व डेटा ट्रांसफर साठी माइक्रो यूएसबी देण्यात आला आहे. चांगली बाब अशी कि पावर बॅकअप साठी 4030 एमएएच ची मोठी बॅटरी यात आहे.

राहिला प्रश्न किंमतीचा तर चीन मध्ये हा 1199 यूआन मध्ये लॉन्च केला गेला आहे जे भारतीय करन्सीनुसार 11,000 रुपये होतात.

The post डुअल कॅमेरा आणि वाटर ड्रॉप नॉच सह लॉन्च झाला वीवोचा स्वस्तातला फोन यू1 first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/vivo-u1-launched-price-specification-and-features-in-marathi/feed/ 0