Vivo भारतात 6 नवीन स्मार्टफोन करेल लॉन्च, U series ची पण होईल सुरवात

Vivo ने सांगितले आहे कि कंपनी भारतात आपल्या Z series चा विस्तार करत अजून एक नवीन डिवाईस आणणार आहे. हा फोन Vivo Z1 Pro चा अपग्रेडेड वर्जन असेल जो पुढल्या महिन्यात बाजारात येईल. तर आता Vivo संबंधित अजून एक बातमी समोर येत आहे कि कंपनी देशात अजून एक नवीन स्मार्टफोन सीरीज आणण्याची तयारी करत आहे जी ‘U series’ च्या नावाने लॉन्च केली जाईल. Vivo India चे डायरेक्टर Nipun Marya यांनी इंडियन पब्लिकेशनला दिलेल्या एका इंटरव्यू मध्ये Vivo U series संबंधित महत्वाची माहिती दिली आहे.

Vivo U series बद्दल निपुण मार्या यांनी इकॉनॉमिक्स टाईम्सला सांगितले आहे कि कंपनी लवकरच भारतीय बाजारात हि नवीन स्मार्टफोन सीरीज घेऊन येणार आहे. Vivo U series कंपनी Z series प्रमाणे फक्त ऑनलाईन सेग्मेंट मध्ये आणेल जी ई-कॉमर्स वेबसाइट वर सेल साठी उपलब्ध होईल. Vivo India हेड नुसार Vivo U series 8,000 रुपयांपासून 20,000 रुपयांच्या बजेट मध्ये येईल. या सीरीजचा पहिला स्मार्टफोन Vivo U1 असू शकतो.

6 नवीन फोन होतील लॉन्च

कंपनीच्या नवीन स्मार्टफोन सीरीज व्यतिरिक्त या मुलाखतीत सांगण्यात आले आहे कि Vivo कंपनी येत्या फेस्टिव सीजन मध्ये 6 नवीन स्मार्टफोन भारतात लॉन्च करेल. हे स्मार्टफोन्स ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही प्लॅटफॉर्मवर विकले जातील. हे 6 नवीन फोन Vivo U series, Vivo Z series, Vivo S series आणि Vivo V series मधील असतील. विशेष म्हणजे 91मोबाईल्सने आपल्या एक्सक्लूसिव रिपोर्ट मध्ये Vivo V17 pro आणि V17 स्मार्टफोनची माहिती आधीच दिली आहे.

Vivo ची स्ट्रॅटेजी पाहता कपंनी 8,000 रुपये व त्यापेक्षा जास्त लो बजेट सेग्मेंट मध्ये U series सादर करेल. तर 15,000 रुपयांपासून 20,000 रुपयांच्या मध्ये कंपनीची Vivo S series येईल. त्याचप्रमाणे 20,000 रुपयांपासून 30,000 रुपयांपर्यंत फ्लॅगशिप सेग्मेंट मध्ये कंपनी Vivo V series सह इंडियन स्मार्टफोन मार्केट वर राज्य करण्याचा प्रयत्न करेल.

Vivo V17 series

या सीरीज मध्ये लॉन्च होणाऱ्या Vivo V17 pro स्मार्टफोन मध्ये तुम्हाला पॉप-अप कॅमेरा सह क्वॉड कॅमेरा मिळेल. हा वी15 चा अपग्रेड वर्जन असल्यामुळे अश्या अनेक गोष्टींचे तुम्हाला अपग्रेड मिळू शकतात. वी15 प्रो मध्ये तुम्हाला 6.39-इंचाची एमोलेड स्क्रीन मिळत होती तर हा फोन मोठ्या स्क्रीन सह येऊ शकतो आणि हा पण कंपनी एमोलेड स्क्रीन सह सादर करू शकते.

तसेच क्वालकॉम 600 सीरीजच्या प्रोसेसरच्या जागी यावेळी कंपनी स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजच्या प्रोसेसर सह फोन सादर करू शकते. आशा आहे कि कंपनी स्नॅपड्रॅगॉन 730 किंवा 730जी चिपसेट वर सादर करेल. त्याचबरोबर फोन मध्ये 6जीबी आणि 8जीबी की रॅम मेमरी मिळू शकते. किंमतीबद्दल बोलले जात आहे कि Vivo V17 सीरीजची किंमत 30,000 रुपयांपर्यंत असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here