Xiaomi 13 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 04:48:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi 13 सीरिजची नवी लाँच डेट आली; माजी पंतप्रधानांच्या निधनामुळे इव्हेंट ढकलला पुढे https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-series-launch-rescheduled-for-december-11/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-series-launch-rescheduled-for-december-11/#respond Fri, 09 Dec 2022 05:29:29 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15831 Xiaomi 13 series 1 डिसेंबरला लाँच होणार होती परंतु माजी पंतप्रधान Jiang Zemin यांच्या निधनामुळे कंपनीनं हा इव्हेंट पुढे ढकलला होता. आता कंपनीनं आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजच्या लाँचची नवी तारीख सांगितली आहे. Xiaomi 13 series आता 11 डिसेंबरला लाँच होणार आहे. या पावरफुल सीरीजमध्ये Xiaomi 13 5G आणि Xiaomi 13 Pro 5G हे दोन […]

The post Xiaomi 13 सीरिजची नवी लाँच डेट आली; माजी पंतप्रधानांच्या निधनामुळे इव्हेंट ढकलला पुढे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi 13 series 1 डिसेंबरला लाँच होणार होती परंतु माजी पंतप्रधान Jiang Zemin यांच्या निधनामुळे कंपनीनं हा इव्हेंट पुढे ढकलला होता. आता कंपनीनं आपल्या आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिजच्या लाँचची नवी तारीख सांगितली आहे. Xiaomi 13 series आता 11 डिसेंबरला लाँच होणार आहे. या पावरफुल सीरीजमध्ये Xiaomi 13 5G आणि Xiaomi 13 Pro 5G हे दोन स्मार्टफोन 11 डिसेंबरला लाँच होऊ शकतात. तसेच शाओमी 13 सीरीजसह MIUI 14, Xiaomi Watch S2 आणि Xiaomi Buds 4 TWS earbuds देखील सादर केले जाऊ शकतात.

Xiaomi 13 series Launch

शाओमी कंपनीनं अधिकृत घोषणा केली आहे की कंपनी येत्या 11 डिसेंबरला आपली नवी शाओमी 13 सीरीज सादर करणार आहे. या दिवशी ही स्मार्टफोन सीरीज चीनमध्ये लाँच होईल जी नंतर अन्य बाजारांमध्ये एंट्री करू शकते. कंपनीनं या सीरीजमधील स्मार्टफोन्सच्या नावांची माहिती दिली नाही परंतु आशा आहे की 11 डिसेंबरला Xiaomi 13 5G आणि Xiaomi 13 Pro स्मार्टफोन लाँच होतील. Xiaomi 13 series Launch Event 11 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता सुरु होईल जो भारतीय वेळेनुसार 4 वाजून 30 मिनिटांनी असेल. हे देखील वाचा: वनप्लसच्या तोडीच्या स्मार्टफोनवर 25 हजारांची जबरदस्त सूट; फोनमध्ये 12GB RAM आणि वेगवान प्रोसेसर

Xiaomi 13 series launch rescheduled for December 11

Xiaomi 13 5G आणि Xiaomi 13 Pro चे लीक स्पेसिफिकेशन्स

शाओमी 13 5जी फोन आणि शाओमी 13 प्रो स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटसह लाँच केले जाऊ शकतात. हा प्रोसेसर 4नॅनोमीटर फॅब्रिकेशन बनलेला असेल जो हेव्ही प्रोसेसिंग देखील सहज हॅन्डल करू शकतो. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये लेटेस्ट अँड्रॉइड 13 ओएस तसेच कंपनीचा नवीन मीयुआय 14 देखील दिला जाऊ शकतो.

Xiaomi 13 series launch rescheduled for December 11

समोर आलेल्या लीक्स नुसार Xiaomi 13 5G मध्ये 6.2-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो, तर Xiaomi 13 Pro स्मार्टफोन 6.7-इंचाच्या एलटीपीओ ई6 अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात येऊ शकतो. हे दोन्ही मोबाइल फोन पंच-होल डिस्प्ले, 2के रिजोल्यूशन आणि 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकतात. हे देखील वाचा: 16GB रॅमसह आला दणकट स्मार्टफोन; 120W फास्ट चार्जिंगसाठी वनप्लसपेक्षा स्वस्त iQOO Neo 7 SE लाँच

Xiaomi 13 series launch rescheduled for December 11

फोटोग्राफीसाठी Xiaomi 13 Pro मध्ये 50MP Sony IMX989 प्रायमरी सेन्सर मिळू शकतो जो सर्वात मोठा कॅमेरा सेन्सर आहे, त्याचबरोबर 50MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक टेलीफोट लेन्स दिली जाऊ शकते. तसेच Xiaomi 13 5G फोन 50MP Sony IMX800 रियर कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी शाओमी 13 5जी फोन आणि शाओमी 13 प्रो 5जी फोन दोन्हीमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.

Xiaomi 13 series launch rescheduled for December 11

Xiaomi 13 5G आणि Xiaomi 13 Pro फोन पावर बॅकअपच्या बाबतीत देखील दमदार असू शकतात. समोर आलेल्या माहितीनुसार या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते. शाओमी 13 5जी मध्ये 4,700एमएएचची बॅटरी असल्याचं सांगण्यात आलं तर शाओमी 13 प्रो 4,800एमएएच बॅटरीसह लाँच केला जाऊ शकतो. हे दोन्ही स्मार्टफोन आयपी68 रेटेड असू शकतात.

The post Xiaomi 13 सीरिजची नवी लाँच डेट आली; माजी पंतप्रधानांच्या निधनामुळे इव्हेंट ढकलला पुढे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-series-launch-rescheduled-for-december-11/feed/ 0
वनप्लस-सॅमसंग नव्हे तर आयफोनला टक्कर देण्यासाठी येतेय Xiaomi 13 series; लाँचचा मुहूर्त ठरला https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-series-launch-date-1-december-with-miui-14-watch-s2-and-buds-4-tws-earbuds/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-series-launch-date-1-december-with-miui-14-watch-s2-and-buds-4-tws-earbuds/#respond Mon, 28 Nov 2022 06:31:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15426 Xiaomi 13 series ही कंपनीची सर्वात आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज असेल जी 1 डिसेंबरला लाँच होईल. कंपनीनं अधिकृत घोषणा केली आहे की शेवटच्या महिन्यात पहिल्या तारखेला कंपनी आपली नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज टेक मंचावर सादर करणार आहे. Xiaomi 13 5G आणि Xiaomi 13 5G Pro 1 डिसेंबरला लाँच होतील. शाओमीनं सांगितलं आहे की शाओमी […]

The post वनप्लस-सॅमसंग नव्हे तर आयफोनला टक्कर देण्यासाठी येतेय Xiaomi 13 series; लाँचचा मुहूर्त ठरला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi 13 series ही कंपनीची सर्वात आतापर्यंतची सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन सीरिज असेल जी 1 डिसेंबरला लाँच होईल. कंपनीनं अधिकृत घोषणा केली आहे की शेवटच्या महिन्यात पहिल्या तारखेला कंपनी आपली नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज टेक मंचावर सादर करणार आहे. Xiaomi 13 5G आणि Xiaomi 13 5G Pro 1 डिसेंबरला लाँच होतील. शाओमीनं सांगितलं आहे की शाओमी 13 सीरीज सोबतच 1 डिसेंबरला MIUI 14 आणि Xiaomi Watch S2 आणि Xiaomi Buds 4 TWS earbuds देखील चीनमध्ये लाँच होऊ शकतात.

Xiaomi 13 series Launch Date

शाओमी कंपनीनं अधिकृतपणे घोषणा केली आहे की कंपनी येत्या 1 डिसेंबरला टेक मंचावर आपली आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीज Xiaomi 13 series लाँच करणार आहे. कंपनीनं सीरीजमधील मोबाइल फोन्सच्या नावांची माहिती मात्र दिली नाही परंतु आशा आहे की सीरीज अंतगर्त शाओमी 13 5जी आणि शाओमी 13 प्रो 5जी फोन लाँच होतील. तसेच 1 डिसेंबरला शाओमी 13 सीरीजसह मीयुआय 14, मी वॉच एस2 आणि शाओमी बड्स 4 इयरबड देखील चीनी मार्केटमध्ये उतरवले जातील. हे देखील वाचा: विश्वास ठेवता येणार नाही इतक्या स्वस्तात महागड्या फोनमधला डिस्प्ले; Realme 10 Pro सीरिजची किंमत समजली

Xiaomi 13 series

वर सांगितल्याप्रमाणे कंपनीनं आतापर्यंत आपल्या शाओमी 13 सीरीजमधील स्मार्टफोन्सची माहिती दिली नाहीत. परंतु विविध लिक्सनुसार कंपनी आपल्या या सीरीजमध्ये Xiaomi 13, Xiaomi 13 Pro, Xiaomi 13X आणि Xiaomi 13S Ultra स्मार्टफोन सादर करू शकते. शाओमी 13 प्रो या सीरीजचा सर्वात मोठा मॉडेल असेल. या शाओमी मोबाइलच्या संभाव्य स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे शेयर करण्यात आली आहे.

Xiaomi 12s Ultra

Xiaomi 13 Pro Specification

शाओमी 13 प्रो बद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन 2के रिजोल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या मोठ्या एलटीपीओ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. ही स्क्रीन ई6 अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. ही स्क्रीन वॉटरड्रॉप नॉच डिजाइनवर बनली असेल की पंच-होल स्टाईलसह येईल हे मात्र अजून स्पष्ट झालं नाही.

Xiaomi 13 Pro 5G Phone कंपनी Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेटसह लाँच करू शकते. हा आतापर्यंतचा सर्वात पावरफुल प्रोसेसर असल्याचं सांगण्यात आलं आहे जो OnePlus 11 series, Samsung Galaxy S23 series आणि iQOO 11 series मध्ये मिळू शकतो. तसेच शाओमी 13 प्रो स्मार्टफोनमध्ये 12 जीबी पर्यंतचा रॅम आणि 512 जीबी पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळू शकते. हे देखील वाचा: लय भारी! 13 हजारांपेक्षा कमी किंमतीत 5G फोन; 5000mAh बॅटरीसह Poco M4 Pro 5G घ्या स्वस्तात

शाओमी 13 प्रो मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो ज्यात सर्व कॅमेरा सेन्सर 50 मेगापिक्सल असल्याचं समोर आलं आहे. लीकनुसार Xiaomi 13 Pro 50MP Sony IMX989 1-inch sensor + 50MP ultrawide camera + 50MP telephoto camera ला सपोर्ट करेल. तर फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर असल्याचं लीकमध्ये समोर आलं आहे. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 120वॉट फास्ट चार्जिंग असलेली 4,800एमएएचची बॅटरी मिळू शकते.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post वनप्लस-सॅमसंग नव्हे तर आयफोनला टक्कर देण्यासाठी येतेय Xiaomi 13 series; लाँचचा मुहूर्त ठरला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-13-series-launch-date-1-december-with-miui-14-watch-s2-and-buds-4-tws-earbuds/feed/ 0