16GB रॅम आणि 120W फास्ट चार्जिंगसह iQOO Neo 7 SE लाँच

iQOO नं आपल्या होम मार्केट चीनमध्ये आपल्या फ्लॅगशिप iQOO 11 सीरीजमध्ये iQOO 11 5G आणि 11 Pro 5G असे दोन स्मार्टफोन सादर केले आहेत. त्याचबरोबर आपल्या मिड रेंज ग्राहकांसाठी iQOO Neo 7 SE देखील सादर केला आहे. हा फोन MediaTek Dimensity 8200 SoC सह येणार जगातील पहिला डिवाइस आहे. iQOO Neo 7 SE स्मार्टफोनमध्ये 16GB RAM, 120Hz रिफ्रेश रेट, 64MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. आता चीनमध्ये Neo 7 SE नावाने लाँच झालेला हा फोन भारतात Neo 7 5G नावाने लवकरच एंट्री घेऊ शकतो. पुढे तुम्हाला iQOO Neo 7 SE स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि अन्य माहिती मिळेल.

iQOO Neo 7 SE ची किंमत

iQOO Neo 7 SE स्मार्टफोन चीनमध्ये 5 व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोनचा बेस व्हेरिएंट 8GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो, ज्याची किंमत CNY 2099 (सुमारे 24,800 रुपये) आहे. या फोनचे तीन अन्य व्हेरिएंट 256GB स्टोरेजसह 8GB, 12GB आणि 16GB रॅम ऑप्शनसह येतात, ज्यांची किंमत अनुक्रमे CNY 2299 (सुमारे 27,100 रुपये), CNY 2499 (सुमारे 29,500 रुपये) आणि CNY 2799 (सुमारे 33,000 रुपये) आहे. या फोनचा पाचवा व्हेरिएंट 12GB + 512GB स्टोरेजसह CNY 2899 (सुमारे 34,200 रुपये) मध्ये विकत घेता येईल. iQOO Neo 7 SE स्मार्टफोनचे इलेक्ट्रॉनिक ब्लू, स्टार ब्लॅक आणि गॅलेक्सी असे तीन कलर ऑप्शन चीनमध्ये आले आहेत. हे देखील वाचा: जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह iQOO 11 आणि iQOO 11 Pro लाँच; वनप्लसला मिळणार खरी टक्कर

iQOO Neo 7 SE चे स्पेसिफिकेशन्स

iQOO Neo 7 SE स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2400×1080-पिक्सल, अ‍ॅस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये फ्लॅट डिस्प्ले आणि पंच होल कटआउट थिन बेजल्ससह देण्यात आला आहे. आयकूचा हा फोन MediaTek Dimensity 8200 SoC सह येतो, ज्याच्या जोडीला 16GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेज मिळते.

फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, जो चौकोनी आकाराच्या कॅमेरा मोड्युलमध्ये आहे. या फोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 2MP चा मॅक्रो सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. आयकूच्या Neo 7 SE 5G स्मार्टफोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि AI फेस अनलॉक मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Bluetooth 5.3, ड्युअल-बँड Wi-Fi, NFC आणि GPS चा पर्याय मिळतो. तसेच हा फोन Android 13 आधारित Origin OS 3 वर चालतो. हे देखील वाचा: मोफत करा Mobile Repairing Course, महिन्याला होऊ शकते 25 ते 30 हजारांची कमाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here