Xiaomi Mi 10i - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 22 Dec 2020 14:21:47 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Xiaomi घेऊन येत आहे 108MP कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन Mi 10i, 5 जानेवारीला होईल भारतात लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-to-launch-in-india-on-5-january-with-108-megapixel-camera-redmi-note-9-pro-5g/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-to-launch-in-india-on-5-january-with-108-megapixel-camera-redmi-note-9-pro-5g/#respond Tue, 22 Dec 2020 14:21:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9414 शाओमी इंडियाने आज मीडिया इन्व्हाईट पाठवत घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 5 जानेवारीला भारतात आपला नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे. शाओमीचा हा नवीन डिवायस भारतात Xiaomi Mi 10i नावाने लॉन्च होईल.

The post Xiaomi घेऊन येत आहे 108MP कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन Mi 10i, 5 जानेवारीला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने गेल्याच महिन्यात टेक मंचावर आपल्या ‘नोट सीरीज’ चा विस्तार करत Redmi Note 9 5G आणि Redmi Note 9 Pro 5G स्मार्टफोन सादर केले होते. हे दोन्ही मोबाईल फोन शाओमीने आपल्या होम मार्केट म्हणजे चीन मध्ये लॉन्च केले होते, जे आता भारतात येण्यास तयार आहेत. शाओमी इंडियाने आज मीडिया इन्व्हाईट पाठवत घोषणा केली आहे कि कंपनी येत्या 5 जानेवारीला भारतात आपला नवीन स्मार्टफोन घेऊन येणार आहे. शाओमीचा हा नवीन डिवायस भारतात Xiaomi Mi 10i नावाने लॉन्च होईल.

शाओमीने घोषणा केली आहे कि कंपनी 5 जानेवारीला भारतात आपला नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. कंपनीने फोनचे नाव तर सांगितले नाही पण शेयर केलेल्या फोटो वरून समजले आहे कि हा आगामी स्मार्टफोन गेल्या महिन्यात चीन मध्ये लॉन्च झालेला रेडमी नोट 9 5जी प्रो असेल. तसेच मिळालेल्या माहितीनुसार भारतात हा फोन Redmi Note 9 Pro 5G नाही तर Xiaomi Mi 10i नावाने लॉन्च केला जाईल. आता फोनचे स्पेसिफिकेशन्स पण पूर्णपणे रेडमी नोट 9 प्रो 5जी सारखे असतील कि नाही, यासाठी 5 जानेवारीची वाट बघावी लागेल.

Redmi Note 9 Pro 5G

Redmi Note 9 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स पाहता या हँडसेट मध्ये 6.67-इंचाचा FHD+ IPS डिस्प्ले देण्यात आला आहे जो 120Hz रिफ्रेश रेट आणि पंच-होल सेल्फी कॅमेऱ्यासह येतो. तसेच फोन मध्ये स्नॅपड्रॅगॉन 750G SoC सह Adreno 619 GPU आहे. इतकेच नव्हे तर फोन मध्ये 6GB LPDDR4 रॅम आणि 128GB UFS 2.1 पर्यंतचा स्टोरेज ऑप्शन आहे.

हे देखील वाचा : 50MP कॅमेऱ्यासह येईल शक्तीशाली स्मार्टफोन OnePlus 9, लॉन्चच्या आधी जाणून घ्या वैशिष्टये

सॉफ्टवेयर पाहता Redmi Note 9 Pro 5G स्मार्टपोन MIUI 12 सह अँड्रॉइड 10 वर चालतो. तसेच Redmi Note 9 Pro 5G मध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 108MP प्राइमरी सेंसर, 13MP अल्ट्रा-वाइड लेंस, 2MP मॅक्रो यूनिट आणि 2MP डेप्थ सेंसर आहे. फोन मध्ये फ्रंटला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

फोन मध्ये पावर बॅकअपसाठी 4,820mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W फास्ट चार्जिंग सह येते. तसेच इतर फीचर्स पाहता फोन मध्ये सुरक्षेसाठी एक साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर आणि 5 जी, 4 जी एलटीई, एनएफसी, डुअल-बॅंड वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि चार्जिंग आणि डेटा सिंकसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे ऑप्शन आहेत.

The post Xiaomi घेऊन येत आहे 108MP कॅमेरा असलेला नवीन स्मार्टफोन Mi 10i, 5 जानेवारीला होईल भारतात लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-to-launch-in-india-on-5-january-with-108-megapixel-camera-redmi-note-9-pro-5g/feed/ 0
8 जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट सह Xiaomi Mi 10i वेबसाइट वर लिस्ट, लवकरच होईल भारतात लाॅन्च https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-on-geekbench-m2007j17i-8-gb-ram-snapdragon-750g-soc/ https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-on-geekbench-m2007j17i-8-gb-ram-snapdragon-750g-soc/#respond Thu, 10 Dec 2020 14:36:34 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9262 Xiaomi Mi 10i ची हि लिस्टिंग काल म्हणजे 9 डिसेंबरची आहे जिथे फोन M2007J17I मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे.

The post 8 जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट सह Xiaomi Mi 10i वेबसाइट वर लिस्ट, लवकरच होईल भारतात लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi बद्दल गेल्या अनेक दिवसांपासून बातमी येत होती कि कंपनी भारतात आपल्या ‘मी 10 सीरीज’ चा विस्तार करण्याची योजना बनवत आहे आणि याअंतर्गत Mi 10i स्मार्टफोन लाॅन्च केला जाईल. कंपनीने आतापर्यंत स्पष्ट केले नाही कि हा मोबाईल फोन कधी भारतीय बाजारात एंट्री गेहींल पण शाओमी मी 10आय च्या घोषणेच्या आधी हा स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट वर लिस्ट झाला आहे जिथे लाॅन्च डेट समोर येण्याआधी या च्या फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. या लिस्टिंग नंतर आशा आहे कि Xiaomi Mi 10i लवकरच भारतात येणार आहे.

Xiaomi Mi 10i ची हि लिस्टिंग काल म्हणजे 9 डिसेंबरची आहे जिथे फोन M2007J17I मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. गीकबेंच वर मी 10आय एंडराॅयड 10 ओएस सह दाखवण्यात आला आहे त्यासोबत 8 जीबी रॅम देण्यात आला आहे. लिस्टिंग नुसार हा फोन 1.80गीगाहर्ट्ज बेस फ्रिक्वेंसी असलेल्या आक्टाकोर प्रोसेसरला सपोर्ट करेल त्यासोबतच क्वाॅलकाॅमच्या स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट वर चालेल. या फोनला सिंगल-कोर मध्ये 652 आणि मल्टी-कोर मध्ये 2004 बेंचमार्क स्कोर मिळाला आहे.

Xiaomi Mi 10i

बोलले जात आहे कि भारतात येणारा मी 10आय स्मार्टफोन ग्लोबल मार्केट मध्ये लाॅन्च झालेल्या Mi Note 10 Lite चा रि-ब्रँडिड वर्जन असेल. मी नोट 10 लाइट 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.47 इंचाच्या फुलएचडी+ 3डी कर्व्ड एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. शाओमीने आपल्या फोनला फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स वर 3डी कर्व्ड ग्लासची सुरक्षा दिली आहे. Xiaomi ने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो मीयूआई 11 वर चालतो.

Xiaomi ने हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सोबतच 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीने फोनचा 8जीबी रॅम वेरिएंट पण सादर केला आहे पण तो बाजारात येण्यास वेळ लागेल. तसेच प्रोसेसिंगसाठी Mi Note 10 Lite आक्टा-कोर प्रोसेसर सह 8एनएम टेक्नॉलॉजी असलेला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेटला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Mi Note 10 Lite क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX686 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. Xiaomi Mi Note 10 Lite रियल डुअल सिम फोन आहे जो 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटीसाठी हा फोन कंपनीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 30वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 5,260एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 8 जीबी रॅम आणि स्नॅपड्रॅगॉन 750जी चिपसेट सह Xiaomi Mi 10i वेबसाइट वर लिस्ट, लवकरच होईल भारतात लाॅन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/xiaomi-mi-10i-on-geekbench-m2007j17i-8-gb-ram-snapdragon-750g-soc/feed/ 0
Exclusive: Redmi 9 Power आणि Mi 10i चे रॅम, स्टोरेज आणि कलर ऑप्शन आले समोर, लवकरच भारतात होतील लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/mi-10i-redmi-9-power-ram-storage-colours-india-launch-soon-exclusive/ https://www.91mobiles.com/marathi/mi-10i-redmi-9-power-ram-storage-colours-india-launch-soon-exclusive/#respond Wed, 02 Dec 2020 13:32:24 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9144 91मोबाईल्सला टिप्सटर इशान अग्रवाल द्वारे Redmi 9 Power आणि Mi 10i च्या रॅम, स्टोरेज, वेरिएंट आणि कलर ऑप्शनची माहिती मिळाली आहे.

The post Exclusive: Redmi 9 Power आणि Mi 10i चे रॅम, स्टोरेज आणि कलर ऑप्शन आले समोर, लवकरच भारतात होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
शाओमीने गेल्या आठवड्यात Redmi Note 9 सीरीज 5G कनेक्टिविटी सह चीन मध्ये लॉन्च केली होती. कंपनीने या फोन्सच्या भारतातील लॉन्च बद्दल कोणतीही ऑफिशियल माहिती दिली नाही. अलीकडेच माहिती समोर आली होती कि कंपनी भारतात Redmi 9 Power आणि Mi 10i डिसेंबर मध्ये भारत घेऊन येऊ शकते. आता 91मोबाईल्सला टिप्सटर इशान अग्रवाल द्वारे Redmi 9 Power आणि Mi 10i च्या रॅम, स्टोरेज, वेरिएंट आणि कलर ऑप्शनची माहिती मिळाली आहे.

दोन्ही फोन भारतात लवकरच सादर केले जाऊ शकतात. सध्या या हँडसेटच्या लॉन्च डेटची माहिती आली नाही. काही दिवसांपूर्वी दोन्ही डिवाइस को गुगल प्ले कंसोल वर स्पॉट केले गेले होते. तर आता आम्हाला रेडमी 9 पावर आणि मी 10आय ची इंडिया सेंट्रिक डीटेल्सची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे.

हे देखील वाचा : Vivo V20 Pro 5G स्मार्टफोन भारतात लॉन्च, याची किंमत आहे कमी आणि फीचर्स, स्पेसिफिकेशन्स दमदार

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार Redmi 9 Power दोन रॅम व स्टोरेज मध्ये सादर केला जाईल. यात 4GB+64GB आणि 4GB+128GB चा समावेश असेल. तसेच फोन Green, Blue आणि Black कलर ऑप्शन मध्ये सादर केला जाईल. काही दिवसांपूर्वी लीक मध्ये सांगण्यात आले होते कि चीन मध्ये लॉन्च झालेला Redmi Note 9 4G कंपनी Redmi 9 Power नावाने भारत घेऊन येऊ शकते. पण याबाबत कोणतीही ठोस माहिती नाही त्यामुळे आम्ही रेडमी 9 पावरला इंडियन मार्केटसाठी नवीन डिवाइसचा समजत आहोत.

Mi 10i बद्दल बोलायचे झाले तर हा फोन पण मल्टीपल रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो. फोन 6GB+128GB आणि 8GB+128GB वेरिएंट मध्ये सादर केला जाऊ शकतो. तसेच फोन Blue, Black आणि Gradient Orange/Blue कलर मध्ये येऊ शकतो.

हे देखील वाचा : Micromax ने मान्य केले In Note 1 स्मार्टफोन नाही आहे पूर्णपणे ‘Made In India’, फोनच्या निर्मितीत चीनचा पण आहे हात

Xiaomi Mi 10i Redmi Note 9 Pro 5G चा रीब्रँड असल्याचे बोलले जात आहे जो काही दिवसांपूर्वी चीन मध्ये सादर केला गेला होता. Google Play कंसोल लिस्टिंग वरून समजले आहे कि मी 10आय स्नॅपड्रॅगॉन 750G SoC सह 6GB रॅमला सपोर्ट करेल. दुसरीकडे, Redmi 9 Power स्नॅपड्रॅगॉन 662 आणि 4GB रॅम सह शिप केला जाऊ शकतो.

जर Xiaomi Mi 10i खरंच Redmi Note 9 Pro 5G चा रीब्रँड असेल तर आपल्याला काही स्पेक्सबाबत आधीच माहिती मिळालेली आहे. जसे कि 6.67-इंचाच्या FHD + डिस्प्ले सह 120Hz रिफ्रेश रेट, 108MP क्वाड कॅमेरा, 4,8,8mAh ची बॅटरी, आणि 33W फ़ास्ट चार्जिंग. दुर्दैवाने सध्या कंपनीकडून माहिती मिळाली नाही कि कधी Mi 10i आणि Redmi 9 Power भारतात लॉन्च होतील. पण रॅम, स्टोरेज वेरिएंट, आणि कलर ऑप्शनची माहिती आल्यामुळे स्पष्ट झाले आहे कि फोन लवकरच लॉन्च होऊ शकतो.

The post Exclusive: Redmi 9 Power आणि Mi 10i चे रॅम, स्टोरेज आणि कलर ऑप्शन आले समोर, लवकरच भारतात होतील लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-10i-redmi-9-power-ram-storage-colours-india-launch-soon-exclusive/feed/ 0
Mi Note 10 Lite येत आहे भारतात, Xiaomi Mi 10i नावाने होईल लॉन्च https://www.91mobiles.com/marathi/mi-note-10-lite-could-launch-in-india-as-xiaomi-mi-10i/ https://www.91mobiles.com/marathi/mi-note-10-lite-could-launch-in-india-as-xiaomi-mi-10i/#respond Mon, 10 Aug 2020 10:24:47 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=7762 दावा केला जात आहे कि Mi Note 10 Lite च Xiaomi Mi 10i नावाने भारतात लॉन्च होईल.

The post Mi Note 10 Lite येत आहे भारतात, Xiaomi Mi 10i नावाने होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Xiaomi ने एप्रिल मध्ये आपल्या ‘नोट सीरीज’ अंतर्गत Mi Note 10 Lite स्मार्टफोन सादर केला होता. हा फोन यूरोपियन मार्केट मध्ये आला होता जो आता भारतात येण्यासाठी तयार आहे. मी नोट 10 लाइट भारतात लॉन्च होईल पण आपल्या देशात या फोनचे नाव असू शकते Xiaomi Mi 10i. शाओमीच्या या फोनशी संबंधित हि माहिती एका लीकच्या माध्यमातून समोर आली आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि कंपनी लवकरच आपला पावरफुल डिवाईस भारतीय बाजारात आणू शकते.

Mi Note 10 Lite बाबत बोलले जात आहे कि कंपनी हा फोन भारतात Xiaomi Mi 10i नावाने लॉन्च करेल. द टेक गाइ नावाच्या एका टिप्स्टरने फोन संबंधीत हि माहिती दिली आहे. लीक मध्ये शाओमी कॅमेरा ऍपचा स्क्रीनशॉट शेयर केला गेला आहे ज्यात 64मेगापिक्सल क्वॉड कॅमेरा सेटअप असलेल्या मी नोट 10 लाइटचा कोडनेम ‘toco’ दाखवण्यात आला आहे. तसेच 64एमपी क्वॉड कॅमेरा असलेला अजून एक फोन ‘tocoin’ कोडनेम सह इथे दिसत आहे आणि याचे प्रोडक्ट नेम Mi 10i आहे. या ऍपच्या जीवावर दावा केला जात आहे कि Mi Note 10 Lite च Xiaomi Mi 10i नावाने भारतात लॉन्च होईल.

Mi Note 10 Lite

ग्लोबल मार्केट मध्ये शाओमी मी नोट 10 लाइट 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला गेला आहे जो 2340 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.47 इंचाच्या फुलएचडी+ 3डी कर्व्ड एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो. शाओमीने आपल्या फोनला फ्रंट आणि बॅक दोन्ही पॅनल्स वर 3डी कर्व्ड ग्लासची सुरक्षा दिली आहे. Xiaomi ने हा फोन एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो मीयूआई 11 वर चालतो.

Xiaomi ने हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला आहे. फोनचा बेस वेरिएंट 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सोबतच 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. कंपनीने फोनचा 8जीबी रॅम वेरिएंट पण सादर केला आहे पण तो बाजारात येण्यास वेळ लागेल. तसेच प्रोसेसिंगसाठी Mi Note 10 Lite आक्टा-कोर प्रोसेसर सह 8एनएम टेक्नॉलॉजी असलेला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेटला सपोर्ट करतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Mi Note 10 Lite क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.89 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX686 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन एफ/2.4 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Xiaomi Mi Note 10 Lite रियल डुअल सिम फोन आहे जो 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतो. सिक्योरिटीसाठी हा फोन कंपनीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट टेक्नॉलॉजी सह बाजारात आणला आहे तर पावर बॅकअपसाठी हा फोन 30वॉट फास्ट चार्जिंग असलेल्या 5,260एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. किंमत पाहता मी नोट 10 लाइटचा 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 349 यूरो (जवळपास 28,000 रुपये) आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 399 यूरो (जवळपास 32,500 रुपये) मध्ये लॉन्च केला गेला आहे.

The post Mi Note 10 Lite येत आहे भारतात, Xiaomi Mi 10i नावाने होईल लॉन्च first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mi-note-10-lite-could-launch-in-india-as-xiaomi-mi-10i/feed/ 0