Tata बनवणार आगामी iPhone 15 आणि iPhone 15 Plus, रिपोर्टमधून झाला खुलासा

Highlights

  • भारतात Tata द्वारे असेंबल होतील iPhone 15 आणि iPhone 15 Plus
  • TrendForce च्या रिपोर्टमधून झाला खुलासा
  • टाटा आता चौथा असा ग्रुप असेल जो आयफोन निर्माण करेल

Apple ची iPhone 15 सीरीज येत्या सप्टेंबर महिन्यात लाँच होऊ शकते. त्याला अनेक दिवस बाकी आहेत परंतु ह्या सीरीजबद्दल सतत लीक्स आणि अफवा समोर येत असतात. ज्यात iPhone 15 सीरीज फोन्सच्या स्पेसिफिकेशन, फीचर्स आणि डिजाइन लीक होते. आता एक नवीन रिपोर्ट समोर आला आहे, ज्यानुसार iPhone 15 सीरीजचे iPhone 15 आणि iPhone 15 Plus भारतात Tata द्वारे असेंबल केले जातील. पुढे या रिपोर्टबाबत सविस्तर जाणून घेऊया.

भारतात बनणार का आयफोन 15 सीरीज

TrendForce च्या रिपोर्टनुसार Tata Group भारतात iPhone 15 सीरीजच्या स्मार्टफोनचा काही भाग असेंबल करू शकतो. कंपनीनं काही दिवसांपूर्वी Wistron चं अधिग्रहण केलं आहे, जी भारतात आयफोन बनवत होती. म्हणजे टाटा आता Foxconn, Pegatron आणि Luxshare नंतर चौथा असा ग्रुप बनेल जो अ‍ॅप्पलसाठी आयफोनची निर्मिती करेल.

आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस ची भारतात निर्मिती

रिपोर्टमध्ये समोर आलं आहे की टाटा ग्रुप Apple iPhone 15 सीरीजच्या फोनचा 5 टक्के भाग बनवू शकतो. तर मोठा वाटा अजूनही फॉक्सकॉन, लक्सशेयर आणि पेगाट्रॉनकडे असेल. विशेष म्हणजे फॉक्सकॉनकडे आता पण आयफोन 15, आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्सच्या असेंबली ऑर्डरचं 70 टक्के काम असेल तर आयफोन 15 प्लसच्या ऑर्डरचा 60 टक्के भाग असेल. ह्याचा अर्थ असा की टाटांना असेंबली ऑर्डर मिळू शकते. हे देखील वाचा: 32MP Selfie कॅमेरा असलेला OPPO F23 5G भारतात लाँच, ह्यात मिळते 16GB RAM ची ताकद

तर लक्सशेयरकडे Apple iPhone 15 सीरीजच्या iPhone 15 आणि iPhone 15 Pro Max ऑर्डरचं 25 टक्के काम असेल. Pegatron कडे iPhone 15 Plus च्या ऑर्डरचा 35 टक्के आणि iPhone 15 Pro च्या ऑर्डरचं 30 टक्के काम असेल. तसेच टाटा ग्रुपला आयफोन 15 प्रो मॉडेल म्हणजे आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्ससाठी कोणतीही आर्डर मिळणार नाही. Apple भविष्यात Tata Group ची असेंबली मधील टक्केवारी वाढवू देखील शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here