टेक्नोने काही दिवसांपूर्वी कॅमॉन 16 सीरिज मध्ये लेटेस्ट स्मार्टफोन टेक्नो कॅमॉन 16 प्रीमियर सादर केला होता. आता समोर आलेल्या माहितीनुसार असे वाटत आहे कि Tecno लवकरच कॅमॉन 6 लाइनअप मध्ये Tecno Camon 16s नावाचा फोन सादर करण्याची तयारी करत आहे. गूगल प्ले कंसोल लिस्टिंग वर हा हँडसेट दिसला आहे, जिथे फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा पण खुलासा झाला आहे. लिस्टिंग मध्ये फोनचे फुल स्पेसिफिकेशन्स समोर आले नाहीत. पण आशा आहे कि डिवाइस बाबत लवकरच जास्त माहिती समोर येईल.
Google Play Console लिस्टिंगनुसार Tecno Camon 16s मध्ये MediaTek Helio P22 SoC सह 3GB RAM आणि HD+ पंच-होल डिस्प्ले (720 x 1600 पिक्सल) रेजोल्यूशन असेल. लिस्टिंग मध्ये समोर आले आहे कि फोन अँड्रॉइड 10 ऑपरेटिंग सिस्टम वर चालेल जो टेक्नो कस्टम यूआई सह येईल.
Techno Camon 16 Premier चे स्पेसिफिकेशन्स
Techno Camon 16 Premier मध्ये 6.9-इंचाचा FHD dual डॉट-इन डिस्प्ले आहे जो 90Hz रिफ्रेश रेट, 20:5:9 आस्पेक्ट रेश्यो आणि HDR10+ ला सपोर्ट करते. तसेच फोन मध्ये मीडियाटेक MediaTek G90T चिपसेट सह Cortex-A76 CPU आणि माली G76 जीपीयू आहे. स्मार्टफोन मध्ये 8GB RAM आणि 128GB ची स्टोरेज देण्यात आली आहे.
हार्डवेयर सह हीट कमी करण्यासाठी फोन मध्ये नवीन टेक्नॉलॉजी पण देण्यात आली आहे. जी 2 डिग्री पर्यंत फोन थंड करू शकते. हँडसेट मध्ये पवार बॅकअपसाठी 4,500mAh ची नॉन-रिमूवेबल बॅटरी 33W फ्लॅश चार्जिंग सपोर्ट सह आहे. कंपनीचा दावा आहे कि फ्लॅश चार्जर 30 मिनिटांत 70 टक्के चार्ज करू शकतो.
कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर Tecno Camon 16 प्रीमियर मध्ये GSM, WCDMA, LTE (FDD, TDD), GPRS, HSPA +, FULL EDGE, GPS, WIFI, FM, BT, आणि OTG चा समावेश आहे. स्मार्टफोन एंड्रॉइड 10 वर HiOSसह चालतो. हा स्मार्टफोन ग्लेशियर सिल्वर, गोमेद ब्लॅक, आइस क्रिस्टल ब्लू, मिस्टी ग्रे, क्लाउड व्हाइट आणि प्यूरिस्ट ब्लू रंगात येतो.














