Tecno Pova 6 Pro 5G चा सेल भारतात सुरु झाला आहे तसेच, आता ब्रँडने या सीरिजचे सामान्य व्हेरिएंट TECNO Pova 6 ला जागतिक स्तरावर लाँच केले आहे. अपेक्षा आहे की लवकरच याला भारतात पण एंट्री मिळू शकते. फोनमध्ये प्रो मॉडेल प्रमाणेच बॅक पॅनलवर LED लाईट आणि डायनामिक-टेक डिझाईन मिळत आहे. तसेच 12GB रॅम, 108MP कॅमेरा, 6000mAh बॅटरी, 70 वॉट फास्ट चार्जिंग, 6.78 इंचाचा मोठा डिस्प्ले, 256 जीबी पर्यंत स्टोरेज सारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. ज्याची माहिती तुम्ही पुढे पोस्टमध्ये वाचू शकता.
TECNO Pova 6 चे स्पेसिफिकेशन
- 6.78-इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले
- हेलियो जी 99 अल्टीमेट चिपसेट
- 12GB रॅम +256GB स्टोरेज
- 108MP रिअर कॅमेरा
- 32MP फ्रंट कॅमेरा
- 6000mAh बॅटरी
- 70W फास्ट चार्जिंग
- अँड्रॉईड 14
डिस्प्ले: TECNO Pova 6 मध्ये ब्रँडने 6.78-इंचाचा फुल HD+ अॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. यावर 2436 ×1080 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 2160Hz हाई-फ्रीक्वेंसी डिमिंग, TUV रीनलँड लो ब्लू लाईट सर्टिफिकेशन पण मिळत आहे.
प्रोसेसर: नवीन मोबाईलमध्ये ब्रँडने ऑक्टाकोर मीडियाटेक हेलियो जी 99 अल्टीमेट चिपसेट ऑफर केली आहे. हा 6 नॅनोमीटर प्रोसेसवर चालतो. यात युजर्सना 2.2GHz पर्यंतचे हाय क्लॉक स्पीड मिळते. त्याचबरोबर एआरएम माली-G57 MC2 जीपीयू देण्यात आला आहे.
स्टोरेज: डेटा सेव्ह करण्यासाठी फोन दोन स्टोरेजमध्ये सादर झाला आहे ज्यात 8GB आणि 12GB LPDDR4x रॅमसह 256GB इंटरनल स्टोरेज मिळते. हेच नाहीं तर रॅम वाढवण्यासाठी 12 जीबी व्हर्च्युअल टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे. तसेच मायक्रोएसडी कार्डने इंटरनल मेमरी पण वाढविली जाऊ शकते.
कॅमेरा: TECNO Pova 6 मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप ड्युअल LED फ्लॅशसह देण्यात आला आहे ज्यात 108MP चा प्रायमरी आणि एक AI कॅमेरा लावला आहे. तसेच, सेल्फी घेण्यासाठी ड्युअल एलईडी फ्लॅशसह 32MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
इतर: मोबाईलमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर,3.5 मिमी ऑडियो जॅक, स्टीरियो स्पिकर, डॉल्बी एटमॉस, ड्युअल 4G VoLTE, वाय-फाय 802.11 ac (2.4GHz + 5GHz), ब्लूटूथ 5.1, NFC सारखे अनेक फिचर्स आहेत.
बॅटरी: डिव्हाईसला चालवण्यासाठी TECNO Pova 6 फोनमध्ये 70W फास्ट चार्जिंग, रिवर्स चार्जिंगसह 6000mAh ची बॅटरी आहे.
ऑपरेटिंग सिस्टम: TECNO Pova 6 अँड्रॉईड 14 आधारित HiOS 14 सह चालतो.
TECNO Pova 6 ची किंमत
- TECNO Pova 6 फोनला Comet Green, Meteorite Grey आणि Interstellar Blue सारख्या तीन कलरमध्ये लाँच मिळाले आहे.
- टेक्नो पावा 6 सह ब्रँडने TECNO POVA 6 Neo पण लाँच केला आहे. दोन्ही मोबाईल स्पेसिफिकेशनसह कंपनी वेबसाईटवर लिस्टेड आहेत.
- किंमतीची माहिती अजून समोर आलेली नाही. अपेक्षा आहे लवकरच कंपनीद्वारे किंमत शेअर केली जाईल.















