डुअल कॅमेरा आणि बेजल लेस डिसप्ले सह लॉन्च झाला शाओमी मी 6एक्स, जाणून घ्या फोन बद्दल सर्वकाही

डुअल कॅमेरा आणि बेजल लेस डिसप्ले सह लॉन्च झाला शाओमी मी 6एक्स, जाणून घ्या फोन बद्दल सर्वकाही

आम्ही आधीच माहिती दिली होती कि 25 ला मी 6एक्स लॉन्च केला जाईल आणि आज कंपनी ने हा फोन जगासमोर आणला आहे. शाओमी ने चीन मध्ये मी 6एक्स लॉन्च केला आहे आणि लवकरच हा फोन भारतात पण उपलब्ध होणार आहे. पण भारतात हा यह फोन मी ए2 नावाने उपलब्ध होईल. मागच्या वर्षी पण शाओमी ने चीन मध्ये मी 5एक्स लॉन्च केला होता आणि हा फोन भारता सह जगभरातील इतर देशांमध्ये मी ए1 नावाने लॉन्च झाला होता. मी ए1 गूगल एंडरॉयड वन इंटिग्रेशन सह येतो. त्यामुळे आशा आहे की मी ए2 मध्ये पण तुम्हाला एंडरॉयड वन इंटिग्रेशन मिळेल. कशी करावी आपल्या फोन साठी योग्य चार्जर ची निवड

शाओमी मी 6एक्स च्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर हा फोन मेटल यूनिबॉडी डिजाइन मध्ये सादर करण्यात आला आहे आणि हा दिसायला खुप स्लिम आहे. लॉन्च दरम्यान कंपनी ने याची तुलना ओपो वीवो च्या फोनशी पण केली होती. हा फोन रेड, ​पिंक, गोल्डेन, ब्लॅक आणि ब्लू सहित पाच आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध होईल.
डुअल कॅमेरा आणि बेजल लेस डिसप्ले सह लॉन्च झाला शाओमी मी 6एक्स, जाणून घ्या फोन बद्दल सर्वकाही
शाओमी मी 6एक्स मध्ये तुम्हाला 5.99 इंचाचा 18:9 आसपेक्ट रेशियो वाला फुल एचडी+ स्क्रीन मिळेल. फोन चे स्क्रीन रेजल्यूशन 2160×1080 पिक्सल आहे. पण सध्यातरी प्रोटेक्शन बद्दल माहिती मिळाली नाही. हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट वर चालतो आणि यात 2.2गीगाहट्र्ज चा आॅक्टाकोर प्रोसेसर मिळेल. चांगल्या ग्राफिक्स साठी यात एड्रीनो 512 जीपीयू देण्यात आला आहे. 12,000 रुपयांमध्ये 10 सर्वात बेस्ट फोन

शाओमी मी 6एक्स मध्ये तुम्हाला 4जीबी रम मेमरी मिळेल. त्याचबरोबर 64जीबी ची इंटरनल मेमरी उपलब्ध आहे. फोन मध्ये मेमरी कार्ड सपोर्ट आहे आणि तुम्ही 256जीबी पर्यंतच्या कार्ड चा वापर करू शकता. हा फोन मीयूआई 9.5 वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 आधारित आहे.

फोटोग्राफी साठी कंपनी ने यात ताकदवान कॅमेरा दिला आहे. कंपनी ने याला 12-मेगापिक्सल + 20-मेगापिक्सल च्या डुअल रियर कॅमेरा सह सादर केले आहे. यात ब्लर बॅकग्राउंड आणि बोके इफेक्ट सारखे फीचर्स मिळतील. तसेच या फोन मध्ये तुम्हाला 20-मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा मिळेल. फ्रंट कॅमेरा सोबत फ्लॅश देण्यात आला आहे.

शाओमी मी 6एक्स मध्ये डबल सिम सपोर्ट आहे. त्याचबरोबर 4जी वोएलटीई पण वापरता येईल. तसेच वाईफाई आणि ब्लूटूथ पण मिळेल. चार्जिंग साठी यात माइक्रो यूएसबी देण्यात आली आहे. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,910 एमएएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
किंमत पाहता हा फोन चीन मध्ये 1,499 यूआन मध्ये लॉन्च केला गेला आहे जी भारतीय किंमती नुसार जवळपास 16,000 रुपये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here