टेक्नोने सांगितले आहे की ते 9 जुलैला Tecno Spark 20 Pro 5G फोन भारतात लाँच करणार आहेत. कंपनीकडून सध्या मोबाईलची किंमत व सेलबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही परंतु, 91 मोबाईलला सूत्रांच्या माहितीनुसार फोन लाँचच्या आधी ही टेक्नो स्पार्क 20 प्रो ची किंमत आणि सेलची तारीख एक्सक्लूसिव्ह माहिती प्राप्त झाली आहे. फोनची किंमत तुम्ही पुढे वाचू शकता.
Tecno Spark 20 Pro 5G ची किंमत (सोर्स)
रिटेल सोर्सवरून मिळालेल्या माहितीनुसार टेक्नो स्पार्क 20 प्रो 5 जी फोन भारतात 8GB RAM वर लाँच होईल जो 128GB आणि 256GB Storage मध्ये विकत घेता येईल. सूत्रांनुसार फोनच्या 8 जीबी+128 जीबी मॉडेलची किंमत 15,999 रुपये असेल. मिळालेल्या माहितीनुसार Tecno Spark 20 Pro 11 जुलैमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल तसेच याला Black, White आणि Green कलरमध्ये विकत घेता येईल. फोनची किंमत अधिकृत घोषणेसाठी 9 जुलैची वाट पाहावी लागणार आहे.
Tecno Spark 20 Pro 5G फोटो (सोर्स)
Tecno Spark 20 Pro 5G चे स्पेसिफिकेशन
- 6.78″ फुलएचडी+ 120 हर्ट्झ स्क्रीन
- मीडियाटेक डायमेंसिटी 6080 प्रोसेसर
- 8 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेज
- 8 जीबी मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजी
- 108 एमपी अल्ट्रा सेंसिंग कॅमेरा
- 33 वॉट 5,000 एमएएच बॅटरी
डिस्प्ले : Tecno Spark 20 Pro 5G फोन 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेवर लाँच होईल. ही पंच-होल स्टाईल असणारी स्क्रीन आहे जी आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 120 हर्ट्झ रिफ्रेश रेटवर काम करेल.
प्रोसेसर : टेक्नो स्पार्क 20 प्रो 5 जी अँड्रॉईड 14 ओएसवर लाँच होईल. प्रोसेसिंगसाठी या मोबाईलमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी 6080 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाईल. ही 6 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेली चिपसेट 2.4 गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर रन करण्याची क्षमता ठेवते.
मेमरी : भारतीय बाजारात हा टेक्नो मोबाईल 8 जीबी रॅमवर लाँच केला जाईल. यात 8 जीबी मेमरी फ्यूजन टेक्नॉलॉजी आहे, तसेच फोनच्या 8 जीबी फिजिकल रॅममध्ये 8 जीबी वचुर्अल रॅम जोडून याला 16GB RAM ची ताकद प्रदान करेल.
कॅमेरा : Tecno Spark 20 Pro 5G 108 मेगापिक्सल अल्ट्रा सेंसिंग कॅमेऱ्यासह लाँच होईल जो एफ/1.8 अपर्चरवर काम करेल. फोनच्या ड्युअल रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 2 मेगापिक्सल सेकंडरी सेन्सर असेल. तसेच सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हा मोबाईल 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.
बॅटरी : पावर बॅकअपसाठी टेक्नो स्पार्क 20 प्रो 5 जी फोन 5,000 एमएएच बॅटरीला सपोर्ट करेल. तसेच ही मोठी बॅटरी फास्ट चार्ज करण्यासाठी मोबाईलमध्ये 33 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी मिळेल.















