टेक ब्रँड TECNO ने आज भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन फोन सादर केला आहे. हा फोन ‘स्पार्क सीरीज’ मध्ये लॉन्च केला गेला आहे जो Tecno Spark 5 Pro नावाने बाजारात आला आहे. आपल्या इतर स्मार्टफोन्स प्रमाणे टेक्नोने स्पार्क 5 प्रो पण लो बजेट मध्ये आणला आहे जो 10,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन आज पासून शॉपिंग साइट अमेझॉन भारतात सेलसाठी उपलब्ध झाला आहे.
Tecno Spark 5 Pro
टेक्नो स्पार्क 5 प्रो कंपनीने 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला आहे जो 1600 X 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या एचडी+ डॉट-इन डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.2 टक्के आहे तसेच हा डिस्प्ले 480 निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करती आहे. फोन स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट देण्यात आला आहे. डिस्प्ले वर डावीकडे पंच-होल आहे आणि या मध्ये फोनचा सेल्फी कॅमेरा आहे.
Presenting the all new Tecno #Spark5Pro that comes with Funtastic features like 6.6 inches Dot-in Display, 16MP AI Quad Rear camera and much more. Now get ready to enjoy the funtastic smartphone experience. Available on Amazon at INR 10,499. Sale starts from 13th July. pic.twitter.com/PTOdISlWcM
— TecnoMobileInd (@TecnoMobileInd) July 11, 2020
Tecno Spark 5 Pro कंपनीने एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो हाईओएस 6.1 सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटी6762डी चिपसेट देण्यात आला आहे. टेक्नो ने आपला नवीन फोन 4 जीबी रॅम वर लॉन्च केला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल.
फोटोग्राफी सेग्मेंट बद्दल बोलायचे तर टेक्नो स्पार्क 5 प्रो क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो बॅक पॅनल वर डावीकडे असलेल्या चौकोनी आकारात आहे. या सेटअप मध्ये चार कॅमेरा सेंसर वर्टिकल शेप मध्ये देण्यात आले आहेत तसेच उजवीकडे क्वॉड फ्लॅश आणि लेंसची माहिती आहे. या रियर सेटअप मध्ये एफ/1.8 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 2 मेगापिक्सलची बोका लेंस, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक एआई लेंस देण्यात आली आहे. तसेच सेल्फीसाठी Tecno Spark 5 Pro एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या एआई फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
Tecno Spark 5 Pro रियल डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा डिवाईस फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी टेक्नो स्पार्क 5 प्रो मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. इंडियन मार्केट मध्ये हा फोन Ice Jadeite आणि Spark Orange कलर मध्ये विकत घेता येईल.
टेक्नो स्पार्क 5 वीडियो















