Tecno मोबाईलने यावर्षीच्या सुरवातीला Tecno Spark Go Plus स्मार्टफोन लॉन्च केला होता ज्याची किंमत 6,299 रुपये होती. कमी किंमतीत लॉन्च झालेला स्पार्क गो प्लस यूजर्सना आवडल्यानंतर आता टेक्नोने हि सीरीज वाढवत अजून एका नवीन फोनची घोषणा केली आहे. कंपनीने हा फोन Tecno SPARK Go 2020 नावाने भारतीय बाजारात आणला आहे जो फक्त 6,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल.
Tecno SPARK Go 2020
टेक्नो स्पार्क गो 2020 वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले वर बनलेल्या आहे जी ‘वी’ शेप आहे. या डिस्प्लेच्या तीन कडा नॅरो बेजल्स सह येतात तर खालच्या बाजूला रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. कंपनीने हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च केला आहे जो 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.52 इंचाच्या एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हि स्क्रीन 480निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करते.
Tecno SPARK Go 2020 कंपनीने एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो हाईओएस 6.2 वर चालतो. फोनची खासियत आहे कि हा एंडरॉयड ‘गो’ एडिशन वर बनला आहे ज्यामुळे एंडरॉयडचा नवीन अपडेट सर्वात आधी फोन मध्ये येईल. या प्रोसेसिंगसाठी स्पार्क गो 2020 मध्ये 1.8गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या क्वॉडकोर प्रोसेसर सह मीडियाटेकचा हीलियो ए20 चिपसेट आहे.
फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Tecno SPARK Go 2020 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आणि एक एआई लेंस आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे ज्या सोबत फ्लॅश लाईट पण आहे.
Tecno SPARK Go 2020 एक रियल डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी टेक्नो स्पार्क गो 2020 मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
वेरिएंट व किंमत
Tecno SPARK Go 2020 भारतीय बाजारात 2 जीबी रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 32 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने 256 जीबी पर्यंत वाढवता येईल. हा फोन 6,499 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो येत्या 7 सप्टेंबर पासून शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. टेक्नो स्पार्क गो 2020 Aqua Blue आणि Ice jadeite कलर मध्ये विकत घेता येईल.