चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी शाओमीनं आज आपल्या होम मार्केटमध्ये बहुप्रतीक्षित Redmi K60 series लाँच केली आहे. या नव्या लाइनअपमध्ये कंपनीनं Redmi K60, Redmi K60E आणि Redmi K60 Pro असे तीन स्मार्टफोन सादर केले आहेत. हे फोन्स कमी किंमतीत फ्लॅगशिप ग्रेड स्पेसिफिकेशन्ससह बाजारात सादर करण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया या सीरिजमधील Redmi K60 Pro ची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती.
Redmi K60 Pro Price
Redmi K60 Pro स्मार्टफोनचे पाच व्हेरिएंट चीनमध्ये सादर करण्यात आले आहेत. या फोनच्या बेस मॉडेलमध्ये 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत 3299 युआन (सुमारे 39,300 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 8जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज 3599 युआन (सुमारे 43,000 रुपये), 12जीबी रॅम व 256जीबी स्टोरेज 3899 युआन (सुमारे 46,400 रुपये), 12 जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेज 4299 युआन (सुमारे 51,200 रुपये) आणि 16जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेज मॉडेल 4599 युआन (सुमारे 54,700 रुपये) आहे. हे देखील वाचा: 150KM रेंजसह आली क्यूट लुक Electric Car; 5 लाखांपेक्षा कमी आहे हिची किंमत
Redmi K60 Pro Specifications
- 6.67 इंचाचा 2K डिस्प्ले
- Snapdragon 8 Gen 2 चिपसेट
- 16GB RAM + 512GB Storage
- 120W Wired Fast Charging
- 30W Wireless Fast Charging
- 5000mAh Battery
Redmi K60 Pro Specifications
Redmi K60 Pro स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा क्यूएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 3200 X 1440 पिक्सल रिजोल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट, 480Hz टच सॅम्पलिंग रेट आणि 1400nits पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो तसेच ही पंच होल डिजाईन असलेली स्क्रीन 12 बिट पी3-कलर गामुट, डॉल्बी व्हिजन, 1920Hz पीडब्लूएएम डीमींग, HDR10+ आणि JNCD प्रोटेक्शन लेयरसह येते.
Redmi K60 Pro स्मार्टफोनमध्ये प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा लेटेस्ट आणि सर्वात शक्तिशाली Snapdragon 8 Gen2 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला फोनमध्ये 16GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 512GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेज मिळते. हा नवा रेडमी स्मार्टफोन Android 13 आधारित MIUI 14 या कंपनीच्या कस्टम स्किनवर चालतो. हे देखील वाचा: मोठी बातमी! 31 डिसेंबर 2022 नंतर ‘या’ स्मार्टफोन्सवर चालणार WhatsApp; तुमचा फोन तर नाही ना यादीत?
फ्लॅगशिप ग्रेड Redmi K60 Pro स्मार्टफोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 120W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते आणि प्रथमच रेडमी के सीरिजमध्ये 30W वायरलेस चार्जिंग देखील देण्यात आली आहे. सिक्योरिटीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह या फोनमध्ये ड्युअल स्पिकर्स, एनएफसी आणि इन्फ्रारेड सेन्सर मिळतो. तर कनेक्टव्हिटीसाठी 5G, 4G, ड्युअल बँड Wi-Fi, Bluetooth, GPS, आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी Redmi K60 Pro स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50MP चा Sony IMX800 सेन्सर प्रायमरी कॅमेरा म्हणून देण्यात आला आहे, ही एक एफ/1.88 अपर्चर आणि OIS सपोर्ट असलेली 6P लेन्स आहे. जोडीला 118 डिग्री FoV असलेली 8MP ची अल्ट्रा वाइड लेन्सर आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.
















