Categories: बातम्या

फक्त 11,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला 5,000एमएएच बॅटरी, 4जीबी रॅम आणि डुअल रियर कॅमेरा असलेला हा शानदार स्मार्टफोन

Amazon ने इंडियन स्मार्टफोन मार्केट मध्ये एंट्री करत नवीन ब्रँड Tenor बनवला होता जो 10.or असा लिहतात. या ब्रँड अंतर्गत कंपनीने गेल्याच महिन्यात एक नवीन स्मार्टफोन 10.or G2 सादर केला होता. कंपनीने हा स्मार्टफोन अधिकृतपणे सादर केला होता पण Tenor ने फोनची किंमत सांगितली नव्हती. आज अधिकृत घोषणा करत कंपनीने 10.or G2 च्या किंमतीचा खुलासा पण केला आहे.

किंमत व उपलब्धता

10.or G2 कंपनी द्वारा दोन रॅम वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे. फोनचा 4जीबी रॅम व 64जीबी स्टोरेज वेरिएंट कंपनीने 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे तर 10.or G2 चा 6जीबी रॅम व 64जीबी मेमरी वेरिएंट 14,599 रुपयांमध्ये बाजार मध्ये आला आहे. हा स्मार्टफोन कंपनीने खासकरून Amazon Prime Day 2019 च्या निमित्ताने लॉन्च केला आहे जो 15 जुलै पासूनच देशात सेल साठी उपलब्ध होईल. 10.or G2 ट्वाईलाईट ब्लू आणि चारकोल ब्लॅक कलर मध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा: Oppo K3 भारतात 19 जुलैला होईल लॉन्च, येईल या कॅमेरा टेक्नोलॉजीसह

10.or G2

कंपनीने हा स्मार्टफोन आईफोन 10 सारख्या नॉच डिस्प्लेसह सादर केला आहे. हा स्मार्टफोन 19:9 आस्पेक्ट रेशियोसह सादर केला आहे जो 2246 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.18-इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या प्रोटेक्शन साठी कंपनीने हा 2.5डी कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला आहे. हा फोन एंडरॉयड 9.0 पाई ओएस वर सादर केला आहे जो आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 636 चिपसेट वर चालतो.

10.or G2 भारतात दोन रॅम वेरिएंट्स मध्ये सादर केला गेला आहे. फोनचा एक वेरिएंट 4जीबी रॅम मेमरीला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 6जीबी रॅम देण्यात आला आहे. हे दोन्ही वेरिएंट 64जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात जे माइक्रोएसडी कार्डने 256जीबी पर्यंत वाढवता येतात. तसेच ग्राफिक्स साठी कंपनीने आपल्या या फोन मध्ये एड्रेनो 509 जीपीयू दिला आहे.

हे देखील वाचा: डुअल रियर कॅमेरा आणि 4जीबी रॅम असलेल्या Realme 3i ची किंमत असेल 8,000 रुपयांपेक्षा कमी!

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता 10.or G2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 16-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 5-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 12-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फ्लॅश लाईट सह येतो. 10.or G2 डुअल सिम फोन आहे जो 4जी एलटीईला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी 10.or G2 15वॉट फास्ट चार्जिंग फीचर वाल्या 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

Published by
Siddhesh Jadhav