थॉमसन आपल्या स्मार्ट टीव्ही आणि वॉशिंग मशीनसाठी भारतीय बाजारपेठेत खूप लोकप्रिय आहे. त्याचबरोबर कंपनीने आता भारतीय ऑडिओ मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशासह कंपनीने साऊंडबारची नवीन रेंज सादर केली आहे. या रेंजमध्ये दोन स्वस्त पोर्टेबल स्पीकर्स – AlphaBeat25 आणि AlphaBeat60 लाँच करण्यात आले आहेत. तर, AlphaBeat25 मध्ये 25 वॉट आणि AlphaBeat60 मॉडेलमध्ये 60 वॉटचे आऊटपुट मिळत आहे. चला पुढे तुम्हाला त्यांच्या स्पेसिफिकेशन आणि किंमतीबद्दल माहिती देत आहोत.
थॉमसन साऊंडबारची किंमत
जसे आम्ही तुम्हाला सांगितले की कंपनीने दोन साऊंडबारसह भारतीय ऑडिओ बाजारात प्रवेश केला आहे. त्याचवेळी, जर आपण किंमतीबद्दल बोललो तर नवीन AlphaBeat25 साऊंडबारची किंमत 1699 रुपये आणि AlphaBeat60 साऊंडबारची किंमत 3899 रुपये आहे. सोबतच त्याच्या उपलब्धतेबद्दलची माहिती दिली तर ग्राहक ते 21 सप्टेंबरपासून फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतील.
कंपनीचे म्हणणे आहे की उत्तर प्रदेशातील नोएडा येथे स्थापन करण्यात आलेल्या नवीन मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनमध्ये एका वर्षात पाच लाख युनिट्सचे उत्पादन होईल. तर, थॉमसनचे म्हणणे आहे की ते पुढील सहा महिन्यांत 20 हून अधिक मॉडेल्स लाँच करण्याची तयारी करत आहेत. कंपनीने ऑनलाईन सेगमेंटमध्ये 10% मार्केट शेअर मिळवण्याचे उद्दिष्ट आणि 50 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत स्पीकर्ससाठी अत्याधुनिक मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनमध्ये गुंतवणूक केली आहे.
AlphaBeat25 साऊंडबारचे स्पेसिफिकेशन
- AlphaBeat25 साऊंडबारमध्ये दोन इंचाचे दोन स्पीकर लावण्यात आले आहेत आणि यामध्ये एकूण 25 वॉटचा साऊंड आऊटपुट मिळत आहे.
- याशिवाय ते वायर्ड आणि वायरलेस दोन्ही प्रकारे वापरले जाऊ शकतात. तर, यामध्ये लाल आणि निळे एलईडी दिवे देखील आहेत.
- पॉवर बॅकअपसाठी यात 2000 एमएएच ची बॅटरी लावण्यात आली आहे.
- कंपनीच्या म्हणण्यानुसार तिला चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात आणि पूर्ण चार्ज झाल्यावर यामध्ये 16 तासांचा प्लेबॅक टाईम मिळतो.
- कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ व्हर्जन 5.3 चा सपोर्ट मिळत आहे. सोबतच यात AUX IN, 3.5 एमएम ऑडिओ जॅक आणि युएसबी चा पर्याय देखील आहे.
AlphaBeat60 स्पेसिफिकेशन
- AlphaBeat60 साऊंडबार 2.1 ऑडिओ चॅनेलसह येतो. यात 2.25 इंचाचे दोन स्पीकर लावण्यात आले आहेत आणि 4 इंचाचा एक सबवूफर लावण्यात आला आहे. स्पीकरमध्ये आरजीबी लाईट्स देखील लावली आहे.
- या साऊंडबारमध्ये एकूण 60 वॉटचा साऊंड आऊटपुट मिळत आहे. हा वायर्ड साऊंडबार आहे आणि त्यात इन-बिल्ट बॅटरी मिळत नाही.
- कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये देखील ब्लूटूथ व्हर्जन 5.3 चा सपोर्ट मिळत आहे. यात AUX IN, 3.5 एमएम ऑडिओ जॅक, एचडीएमआय आणि युएसबी पोर्ट देखील मिळत आहे. यामध्ये रिमोट कंट्रोलचा सपोर्टही आहे.














