1,50,000 रुपयांच्या आत येणारे टॉप 5 Intel EVO लॅपटॉप्स

विंडोज लॅपटॉप घेणं आधीपेक्षा जास्त गोंधळात टाकणारं झालं आहे कारण सध्या बाजारात अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु Intel® Evo™ प्लॅटफॉर्ममुळे हा गुंता देखील सहज सोडवता येतो. तुम्हाला माहित असेलच की ह्या प्लॅटफॉर्मची निर्मिती युजर्सना परफॉर्मन्स, रिस्पॉन्सिव्हनेस आणि एफिशियंसी देण्यासाठी करण्यात आली होती. तुम्ही प्रोफेशनल असा किंवा विद्यार्थी किंवा हाडाचा मल्टीटास्कर, हे लॅपटॉप्स फक्त तुमच्या गरजा भागवणार नाहीत तर कम्प्युटिंगचा दर्जेदार अनुभव देखील देतील. आज आपण Intel® Evo™ प्लॅटफॉर्मवर आधारित काही दर्जेदार लॅपटॉप्स पाहणार आहोत जे तुम्ही 1.5 लाखांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता.

लक्षात असू दे ह्या यादीतील सर्व लॅपटॉप्समध्ये Intel® Evo™ प्लॅटफॉर्मचं लेटेस्ट एडिशन आहे. त्यामुळे ह्यात फक्त 13व्या पिढीचे Intel® Core™ मोबाइल प्रोसेसर्स मिळत नाहीत तर तुम्हाला Intel® Evo™ चे सर्व फीचर्स देखील मिळतात. डिवाइसमध्ये 13व्या पिढीची Intel® Core™ series मिळते, ज्यात हायब्रीड आर्किटेक्चरची सुविधा आहे, जी 14 पर्यंत परफॉर्मन्स कोर (P-Cores) आणि इफिशियंट कोर (E-Cores) ला एकत्र जोडते. त्यामुळे लॅपटॉप बॅटरी लाइफशी तडजोड न करता दमदार परफॉर्मन्स देतो. पी-कोर गेमिंग, फोटो, व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅप्स सारख्या टास्कसाठी डिजाइन करण्यात आले आहेत, तर ई-कोर मल्टी-थ्रेडेड वर्कलोड आणि बॅकग्राउंड टास्कची जबाबदारी घेतात. Intel® थ्रेड डायरेक्टर इंटेलिजेंटली काम योग्य त्या कोर सेटकडे डिस्ट्रिब्यूट करून वर्कलोड चांगल्या पद्धतीनं ऑप्टिमाइज्ड करतो.

Intel® Unison™ नावाच्या सुविधेमुळे थेट तुमच्या लॅपटॉपवर मेसेज, नोटफिकेशन आणि फोन कॉल देखील घेता येतात. इतकेच नव्हे तर तुम्ही दोन्ही डिव्हाइसेसमध्ये फाइल्स आणि फोटोज एका क्लिकवर शेयर करू शकता. Intel® Unison™ अँड्रॉइड आणि iOS स्मार्टफोन्ससह कम्पॅटिबल आहे. हे फिचर जवळपास सर्वच स्मार्टफोन्सवर वापरता येईल.

ह्या लॅपटॉप्समध्ये Intel® Evo™ कडून अपेक्षित असलेले सर्व फीचर्स मिळतात. ह्यात एआय समर्थित बॅकग्राऊंड ब्लर आणि फेस फ्रेमिंग फिचरचा सामावेश आहे. तसेच स्लिप मोडमधील लॅपटॉप एका सेकंदाच्या आत ऑन करणाऱ्या इन्स्टंट वेकचा समावेश आहे. त्याचबरोबर Intel® Evo™ लॅपटॉप्समध्ये सिंगल चार्जमध्ये कमीत कमी 9.5+ तासांची बॅटरी लाइफ देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हे लॅपटॉप्स फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात त्यामुळे फक्त 30 मिनिटांच्या चार्जमध्ये 4 तासांची बॅटरी लाइफ मिळते. ह्यातील कनेक्टिव्हिटी ऑप्शन तर अव्वल दर्जाचे आहेत. हे लॅपटॉप्स फक्त Wi-Fi 6E (Gig+) कनेक्टिव्हिटीला सपोर्ट करत नाहीत तर ह्यात कमीत कमी एक थंडरबोल्ट 4 पोर्ट असतोच, ज्यामुळे लॅपटॉप अष्टपैलू बनतो.

इंटेलच्या इटेलिजेंट कोलॅरेशन फीचरमुळे व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंग पूर्वीपेक्षा चांगली आणि जास्त स्मार्ट होईल. ह्या फीचरच्या मदतीनं युजर चांगल्या व्हिडीओ कॉल क्वॉलिटीचा अनुभव घेता येईल. त्याचबरोबर तुमची प्रोडक्टिविटी देखील वाढेल. उदाहरणार्थ हे फीचर बॅकग्राउंड नॉयज आपोआप कमी करतो. तसेच, व्हिडीओ कॉल दरम्यान हे बॅकग्राउंड कलर अत्यंत स्मार्ट पद्धतीनं ब्लर करतो. त्यामुळे कॉल दरम्यान तुमच्यावर फोकस वाढेल. ह्यात तुम्हाला व्हिडीओ क्वॉलिटी ऑप्टिमाइज करण्याची सुविधा देखील मिळते.

आता, चला पाहूया Intel® Evo™ असलेले पाच लॅपटॉप्स जे 1.5 लाख रुपयांच्या आत तुम्ही खरेदी करू शकता.

Dell XPS 13 9315

प्रीमियम डिवाइस शोधत असलेल्या प्रोफेशनल युजर्ससाठी Dell XPS 13 9315 एक योग्य निवड ठरू शकते. विशेष म्हणजे ह्या लॅपटॉपमध्ये 12व्या पिढीचा Intel Core i7-1250U प्रोसेसर मिळतो. ज्यात 10 कोर आणि 12 थ्रेड आहेत ज्यात फोन परफॉर्मन्स कोर, आठ इफिशियंसी कोर आणि 4.7गिगाहर्ट्झचा क्लॉक स्पीड मिळतो. ग्राफिक्सची जबाबदारी Intel® Iris® Xe इंटिग्रेटेड जीपीयू सहज पार पाडतो. कनेक्टिव्हिटीसाठी तुम्हाला Intel® Killer AX Wi-Fi 6E, दोन थंडरबोल्ट 4 पोर्ट, यूएसबी टाइप-ए जेन 3.2 पोर्ट आणि एक एचडीएमआय 2.1 पोर्ट मिळतो.

लॅपटॉपमध्ये 13.4-इंचाचा एफएचडी+ डिस्प्ले आहे. त्यामुळे हा दुमडून कुठेही सहज नेता येतो इतका हा पोर्टेबल आहे. लॅपटॉपमध्ये 16जीबी एलपीडीडीआर5 रॅम सह 512जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. त्यामुळे स्मूद ऑपरेशन आणि वेगवान लोड टाइम मिळतो.

खरेदी करा

ASUS Vivobook S14 OLED

ज्यांना पातळ आणि हलका लॅपटॉपसह शानदार डिस्प्ले आणि दमदार परफॉर्मन्स हवी त्यांच्यासाठी ASUS Vivobook S14 OLED एक चांगला पर्याय आहे. ह्यात लॅपटॉपमध्ये 12व्या पिढीचा Intel® Core™ i5-12500H प्रोसेसर 12 कोर आणि 16 थ्रेड आहेत. ज्यात चार परफॉर्मन्स कोर आणि आठ एफिशियंस कोरसह 4.5गिगाहर्ट्झ क्लॉक स्पीड देण्यात आला आहे. Intel® Iris® Xe iGPU वर ग्राफिक्सचा भार पडेल. तुम्हाला 16जीबी एलपीडीडीआर4 रॅम सह 512जीबी एनव्हीएमई पीसीआयई एसएसडी देण्यात आली आहे.

ह्या लॅपटॉपची खासियत म्हणजे डिस्प्ले. ह्यात 14-इंचाचा 3के ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला. हा डिस्प्ले 100 टक्के डीसीआय-पी3 कलर गामुटला सपोर्ट करतो आणि पॅन्टोन व्हॅलिडेटड आहे तसेच व्हीईएसए डिस्प्लेएचडीआर ट्रू ब्लॅक 600 सर्टिफाइड आहे. त्यामुळे तुम्हाला पॅनलवर अचूक रंग दिसतील. ह्या सर्वांमुळे हा लॅपटॉप सतत फोटोग्राफर आणि डिजिटल आर्टिस्टसाठी परफेक्ट आहे.

खरेदी करा

Samsung Galaxy Book3 Pro

जर तुम्ही मल्टीटास्किंगसाठी विविध क्षमता असलेला Intel® Evo™ प्लॅटफॉर्मवरील लॅपटॉप शोधत असाल तर Samsung Galaxy Book3 Pro वर नक्की नजर टाका. ह्या लॅपटॉपमध्ये 13व्या पिढीचा Intel® Core™ i5-1340P प्रोसेसर आहे. ज्यात 12 कोर आणि 16 थ्रेडची परफॉर्मन्स मिळते. प्रोसेसरमध्ये चार परफॉर्मन्स कोर आणि आठ इफिशियंसी कोर आणि 4.6गिगाहर्ट्झ चा क्लॉक स्पीड मिळतो. जोडीला 16जीबी एलपीडीडीआर5 रॅम आणि 512जीबी एनव्हीएमई पीसीआयई एसएसडी देण्यात आली आहे.

लॅपटॉपमध्ये 14-इंचाचा डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2X 3K WQXGA+ डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो त्यामुळे कॅज्युअल गेमिंग मजेदार होते. अ‍ॅल्युमिनियम बॉडीमुळे शानदार लूक देखील मिळतो.

खरेदी करा

HP Envy x360 OLED

HP Envy x360 OLED एक चांगला प्रीमियम दिसणारा लॅपटॉप आहे.परंतु Intel® Evo™ फक्त लूकसाठी प्रसिद्ध नाही. ह्या व्हेरिएंटमध्ये 12व्या पिढीचा Intel® Core™ i7-1250U प्रोसेसर 10 कोर आणि 12 थ्रेड मिळतात. ज्यात दोन परफॉर्मन्स कोर आणि आठ एफिशियंसी कोर आणि 4.7 गिगाहर्ट्झ चा कमाल क्लॉक स्पीड मिळतो. त्याचबरोबर 16जीबी एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 512जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

लॅपटॉपमध्ये 13.3-इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 2880×1800 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. हा 100 टक्के डीसीपीआय-पी3 कव्हर करतो. तर 360 डिग्री हिंजमुळे लॅपटॉप पूर्णपणे फ्लिप करून टॅबलेट म्हणून वापरता येतो. त्यामुळे तुम्ही स्टायलस वापरू शकता आणि थेट डिस्प्लेवर चित्र काढू शकता.

खरेदी करा

Acer Swift Go

जर तुम्ही व्हॅल्यू शोधत असाल तर Acer Swift Go तुमच्यासाठी परफेक्ट ठरू शकतो. परंतु किंमतचा परिणाम ह्याच्या परफॉर्मन्सवर पडत नाही कारण हा Intel® Evo™ लॅपटॉप आहे. लॅपटॉपमध्ये 13व्या पिढीचा Intel® Core™ i5-13500H प्रोसेसर मिळतो, जोडीला 12 कोर आणि 16 थ्रेड मिळतात. डिवाइसमध्ये चार परफॉर्मन्स कोर आणि आठ एफिशियंसी कोर 4.7गिगाहर्ट्झ च्या कमाल क्लॉकस्पीडसह मिळतात. त्याचबरोबर 16जीबी रॅम आणि 512जीबी स्टोरेज देण्यात आली आहे, जी बहुतांश युजर्सना पुरेशी असते.

नावाप्रमाणे Acer Swift Go अत्यंत पोर्टेबल आहे. ह्या लॅपटॉपचं व्हर्जन 1.25 किलो आहे आणि ह्यात 14-इंचाचा डब्लूक्यूएक्सजीए रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले आहे. विशेष म्हणजे हा एक ओएलईडी पॅनल आहे त्यामुळे तुम्हाला गडद काळा रंग आणि व्हायब्रन्ट कलर्स दिसतात.

खरेदी करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here