TRAI च्या या निर्णयामुळे Jio ला झटका, एयरटेल आणि वोडाफोनला दिलासा

टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया (ट्राई) ने रिलायंस जियोला झटका देत इंटर-नेटवर्क कॉलिंग वरील इंटरनेट कनेक्ट चार्जेस (आईयूसी) जानेवारी, 2020 पासून बंद करण्याचा निर्णयाला स्थगिती दिली आहे. ट्राईने आईयूसीची मर्यादा एक वर्ष अजून वाढवली आहे. आता नवीन रिपोर्ट मध्ये 2021 मध्ये हे चार्जेस बंद होण्याची बातमी समोर आली आहे.

आधी आईयूसी चार्जेस जानेवारी, 2020 पासून बंद होणार होते आणि यासाठी टेलिकॉम ऑपरेटर्स मध्ये खूप मतभेद होते. जियोच्या ग्राहकांना आताही एखाद्या दुसऱ्या कंपनीच्या नेटवर्क वर कॉल करण्यासाठी प्रति मिनिट 6 पैसे दयावे लागतील.

भारती एयरटेल आणि वोडाफोनने आईयूसी चालू ठेवण्याची अपील केली होती, तर जियोची इच्छा होती कि हे बंद व्हावेत. एयरटेल आणि वोडाफोन आइडिया आपल्या ग्राहकांकडून IUC चार्ज घेत आहेत. पण जियोने IUC चे टॉप-अप रिचार्ज सादर केले आहेत.

ट्राईने मंगळवारी म्हटले होते कि वायरलेस वरून वायरलेस डोमेस्टिक कॉस्ट साठी टर्मिनेशन चार्ज 31 डिसेंबर, 2020 पर्यंत आधीप्रमाणे 6 पैसे प्रति मिनिट असतील. 1 जानेवारी, 2021 से वायरलेस टू वायरलेस डोमेस्टिक कॉल्स साठी शून्य होतील.

विशेष म्हणजे वोडाफोन आणि भारती एयरटेल साठी IUC चार्ज चालू राहणे चांगली बाब आहे कारण दोन्ही कंपन्यांना हे चालू रहावेत असेच वाटत होते. रिलायंस जियोला हे चार्जेस नको आहेत म्हणून हि बातमी जियो साठी एक मोठा झटका ठरू शकते.

इंटरकनेक्ट यूसेज चार्ज म्हणजे काय

इंटरकनेक्ट यूसेज चार्ज (IUC) एका मोबाईल टेलिकॉम ऑपरेटर द्वारे दुसऱ्याला द्यावी लागणारी किंमत आहे. जेव्हा एका टेलीकॉम ऑपरेटरचा ग्राहक दुसऱ्या ऑपरेटरच्या ग्राहकांना आउटगोइंग मोबाईल कॉल करतो तेव्हा IUC कॉल करणाऱ्या ऑपरेटरला द्यावी लागते. दोन वेगवेगळ्या नेटवर्क मध्ये होणार कॉल मोबाईल ऑफ-नेट कॉल असतो. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) IUC शुल्क निर्धारित करते आणि सध्यातरी हे 6 पैसे प्रति मिनिट आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here