हे Bollywood चे चित्रपट लवकरच येणार OTT वर; घर बसल्या मिळणार एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट…

साल 2023 च्या पहिल्या महिन्यात नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओ, झी5 आणि इतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर अनेक बहुप्रतीक्षित बॉलीवुड चित्रपट रिलीज होण्यासाठी तयार आहेत. Upcoming Hindi Movies on OTT च्या यादीत दृश्यम 2, विक्रम वेधा, आणि अ अ‍ॅक्शन हीरो सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच ओटीटी ओरिजनल चित्रपट जसे की मिशन मजनू आणि रकुल प्रीत सिंहचा कॉमेडी चित्रपट छत्रीवाली देखील जानेवारी 2023 मध्ये थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर येईल. चला जाणून घेऊया Upcoming Bollywood movies जे थेट OTT वर येतील.

Upcoming Bollywood movies on OTT (Jan 2023) List

  • Vikram Vedha
  • Drishyam 2
  • Mission Majnu
  • Chhatriwali
  • Bhediya
  • Salaam Venky

Vikram Vedha

Vikram Vedha OTT Release डेट ऑफिशियल माहिती समोर आली नाही. परंतु जानेवारी 2023 मध्ये हा चित्रपट ओटीटीवर रिलीज केला जाईल, अशी चर्चा आहे. तसेच, काही रिपोर्ट्सनुसार ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) चा हा चित्रपट ‘विक्रम वेधा’ Voot सह Jio Cinema वर स्ट्रीम करता येईल. जर तुम्हाला सप्टेंबरमध्ये चित्रपटगृहांमध्ये आलेला हा चित्रपट पाहता आला नसेल तर निराश होऊ नका, कारण हा चित्रपट ओटीटी रिलीजसाठी तयार आहे.

Drishyam 2

‘दृश्यम 2’ मोठ्या पडद्यावर धुमाकूळ घातल्यानंतर अखेरीस ओटीटी प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे. परंतु सध्या हा बघण्यासाठी प्राइम सब्सक्रिप्शन पुरेसं नाही कारण चित्रपट रेंटवर घेऊनच प्राइमवर बघता येईल. परंतु आशा आहे की या महिन्याच्या अखेर पर्यंत चित्रपट प्राइम मेंबरर्ससाठी उपलब्ध होईल. साल 2015 मध्ये आलेल्या अजय देवगनच्या ‘दृश्यम’ चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे.

Mission Majnu

मिशन मजनू एक ओरिजनल ओटीटी चित्रपट आहे जो Netflix वर 20 जानेवारीला रिलीज केली जाईल. या चित्रपटात Sidharth Malhotra मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या टीजर वरून स्पष्ट झालं आहे की अभिनेता एक अंडरकव्हर भारतीय हेर आहे जो पाकिस्तानात आहे. Sidharth व्यतिरिक्त चित्रपटात दक्षिणेतील प्रसिद्ध स्टार Rashmika Mandanna आणि Kumud Mishra दिसतील.

Chhatriwali

20 जानेवारीला ZEE5 वर समाजिक मुद्द्यांवरील कॉमेडी चित्रपट Chhatriwali येत आहे. या चित्रपटात Rakul Preet Singh नं प्रमुख भूमिका साकारली आहे. तसेच ती एका condom factory मध्ये क्विलिटी कंट्रोल हेडची भूमिका पार पाडत आहे. या सोशल कॉमेडी चित्रपटात Sumeet Vyas, Satish Kaushik आणि Rajesh Tailang देखील आहेत.

Bhediya

अरुणाचल प्रदेश मधील झिरो परिसरात या चित्रपटाची शूटिंग करण्यात आली आहे. हा सस्पेंस चित्रपट जियो सिनेमावर रिलीज केला जाईल, अशी चर्चा आहे. परंतु अजूनतरी अधिकृत घोषणेची वाट पाहिली जात आहे. चित्रपटात Varun Dhawan, Abhishek Banerjee, Kriti Sanon, Abhinay Raj Singh, Deepak Dobriyal आणि Bhavesh Lohar सारखे कलाकार आहेत.

Salaam Venky

झी5 वर बॉलीवुड मधील दिग्गज अभिनेत्री काजोलचा चित्रपट देखील येत आहे. थिएटर रिलीजनंतर काजोलचा ‘सलाम वेंकी’ जानेवारीच्या अखेरपर्यंत ओटीटी (OTT) च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here