नवीन वर्ष काही तासांवर आहे आणि यावर्षी आम्हाला अनेक अपेक्षा आहेत. त्यायतच जर विषय मोबाईल आणि टेक्नोलॉजी विश्वाचा असेल तर अपेक्षा अजूनच उंचावतात. कारण इथे वर्षाच्या सुरवातीलाच नवीन मोबाईल आणि टेक्नोलॉजीचा पाऊस पडतो. वर्ष 2019 मध्ये पण अशीच तयारी आहे. सॅमसंग, शाओमी, ऍप्पल आणि वनप्लस सहित इतर कंपन्यांनी कंबर बांधली आहे. तुम्हाला एक पेक्षा एक चांगले मोबाईल दिसणार आहेत. खाली आम्ही अशाच फोनची लिस्ट तयार केली आहे जे 2019 मध्ये आपल्या स्टाइल, फीचर आणि परफॉर्मेंसने तुम्हाला आकर्षित करतील.
सॅमसंग गॅलेक्सी जे आणि गॅलेक्सी ए सीरीज हटवून आपल्या नवीन एम सीरीजची सुरवात करणार आहे. या फोन संबंधित आता पर्यंत भरपूर माहिती आली आहे. आता पर्यंत मिळालेल्या बातम्यांनुसार जानेवारीच्या सुरवातीला हा फोन लॉन्च केला जाऊ शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एम20 कंपनीचा पहिला फोन असेल ज्यात वाटर ड्रॉप नॉच मिळेल. सोबतच फोन मध्ये डुअल कॅमेरा आणि 5,000 एमएएच ची बॅटरी पण असेल. फोन एक्सनोस 7885 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो आणि यात 3जीबी रॅम आणि 32जीबी मेमरी असण्याची शक्यता आहे.
सॅमसंग गॅलेक्सी एम20 सोबत कंपनी गॅलेक्सी एम10 पण आणू शकते. हा थोडा स्वस्त वेरियंट असेल. याला कंपनी एक्सनोस 7870 चिपसेट वर सादर करू शकते आणि फोन मध्ये 3जीबी रॅम मिळू शकतो. पण आता पर्यंत सॅमसंग गॅलेक्सी ए10 च्या डिजाइन बद्दल खुलासा झाला नाही.
तुम्हाला तर माहितीच आहे दरवर्षी सॅमसंग मार्च मध्ये आपली फ्लॅगशिप एस सीरीज मध्ये फोन लॉन्च करते. 2018 मध्ये गॅलेक्सी एस9 आणि गॅलेक्सी एस9 प्लस लॉन्च झाले होते. तसेच नवीन वर्षात गॅलेक्सी एस10 ची तयारी जोरात आहे. आता पर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार हा फोन वेगळ्याप्रकरच्या नॉच सह सादर केला जाईल. यात 6.1-इंच ते 6.5-इंचापर्यंतची स्क्रीन असू शकते. तसेच कंपनी यावेळी हा चार वेरियंट मध्ये लॉन्च करू शकते ज्यात एक मॉडेल 5जी चा असू शकतो. गॅलेक्सी एस10 सीरीज क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 प्रोसेसर सह सादर केला जाऊ शकतो आणि फोन मध्ये तुम्हाला 8जीबी रॅम मिळू शकतो.
नवीन वर्षात सॅमसंग गॅलेक्सी नोट 10 सादर केला जाईल आणि हा फोन आधीपेक्षा खूप अडवांस असेल. नोट 10 पासून कंपनी इन डिस्प्ले फिंगरप्रिंटची सुरवात करू शकते. तसेच फोन पूर्णपणे बेजल लेस डिजाइन सह सादर केला जाऊ शकतो. स्पेसिफिकेशन पाहता आता पर्यंत जास्त लीक तर नाहीत पण हा सॅमसंगच्या एक्सनोसच्या नवीन 9820 किंवा क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट सह येऊ शकतो.
यावर्षी वनप्लस ने 6 आणि 6टी मॉडेल सादर केले होते. तसेच नवीन वर्षात कंपनी वनप्लस 7 ची तयारी करत आहे. या फोन बद्दल आताच काही लीक्स आले आहेत. बातमीनुसार हा फोन कंपनी स्लाइड आउट डिजाइन सह सादर करू शकते. तसेच बॅक पॅनल मध्ये कॅमेऱ्यांची संख्या पण जास्त असू शकते. वनप्लस 7 क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो आणि फोन मध्ये 10जीबी रॅम सह 5जी सपोर्ट असण्याची शक्यता आहे.
सॅमसंग ने आपल्या फोल्डेबल फोनचे प्रदर्शन केले आहे. हा फोन डायरी प्रमाणे वाकतो. आता पर्यंत कंपनी ने नाव सांगितले नाही पण सांगितले आहे कि 2019 मध्ये हा लॉन्च होईल. मोबाईल यूजर्स या फोनची वाट बघत आहेत. फोनची खासियत हि आहे कि यात 7.4-इंचाची स्क्रीन आहे पण ती घडी करून एका 4-इंचाच्या फोन प्रमाणे वापर केला जाऊ शकतो. कंपनी ने या डिस्प्लेला इनफिनिटी फ्लेक्स नाव दिले आहे. आशा आहे कि या फोन मध्ये 5जी पण असेल.
ऑनर व्यू20 तुम्हाला जानेवारी मधेच येऊ शकतो. हा फोन वी20 नावाने काही दिवसांपूर्वी चीन मध्ये लॉन्च केला गेला आहे. आता हाच फोन लवकरच जगभरात लॉन्च होणार आहे. ऑनर व्यू20 मध्ये 6.4-इंचाचा सुपर फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन हुआवई च्या किरीन 980 चिपसेट वर चालतो आणि फोन मध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. सोबत 6जीबी रॅम व 8जीबी रॅमआणि 128जीबी इंटरनल स्टोरेज आहे. फोटोग्राफी साठी फोन मध्ये 25-मेगापिक्सलचा सेल्फी आणि 48-मेगापिक्सल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. मागील पॅनल वर टीओएस 3डी सेंसर पण आहे. पावर बॅकअप साठी ऑनर ने या फोन मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी दिली आहे जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
या फोनची चर्चा मागील अनेक महिन्यांपासून होत आहे. जेव्हा जेव्हा माहिती येते तेव्हा काही तरी नवीन समोर येते. नुकतीच बातमी आली आहे कि नोकिया 9 च्या रियर पॅनल वर 5 कॅमेरा सेटअप असेल आणि सोबत फोनचे फोटोग्राफ पण लीक झाले होते. तसेच आशा आहे कि नोकिया 9 कंपनी 5जी सपोर्ट सह सादर करेल. आता पर्यंत जी माहिती समोर आली आहे त्या नुसार हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो आणि यात कर्व्ड डिस्प्ले मिळेल. 2019 मध्ये या फोन वर पण सर्वांच्या नजारा आहेत.
एलजी फोल्डिंग फोन
मार्केट शेयर च्या बाबतीत एलजी जरी मागे असली तरी इनोवेशनच्या बाबतीत कंपनी कधीच मागे नसते. गेल्या वर्षात कंपनी ने जी7 थिंक सारखा दमदार फोन सादर केला होता. तसेच नवीन वर्षात एलजी च्या फोल्डिंग फोन बद्दल चर्चा होत आहे. आशा आहे कि वर्षाच्या सुरवातीला सीईएस इवेंट मध्ये एलजी हा फोन जगासमोर आणू शकते. एलजीच्या फोल्डिंग फोनची स्क्रीन कागदाप्रमाणे फोल्ड होईल. या टेक्नोलॉजी साठी नुकतेच कंपनी ने पेटेंट घेतले आहे आणि काही दिवसांपूर्वी टीवी सेटचे प्रदर्शन पण केले आहे.
काही दिवसांपूर्वीच हुआवई ने मेट 20 प्रो मॉडेल लॉन्च केला आहे. या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. आता कंपनी चार कॅमेरे असलेला फोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. बातमी आहे कि हुआवई पी30 कंपनी चार कॅमेऱ्यासह सादर करू शकते. पी सीरीज हुआवईची फ्लॅगशिप सीरीज आहे आणि हा वर्षाच्या मधे लॉन्च केला जाऊ शकतो. चांगल्या फोटोग्राफी साठी कंपनी यात सोनी सेंसर वापरू शकते.
ऍप्पल आईफोन XI
या वर्षी ऍप्पल ने आईफोन 10एस सीरीजचे फोन सादर केले होते. कंपनी ने एक साथ तीन मॉडेल आणले होते ज्यात दोन नॉच स्क्रीन असलेले आणि एक कंपनीचा पेटेंट सिंगल टच बटण असलेला होता. आशा आहे कि नवीन वर्षात ऍप्पल आईफोन 11 लॉन्च केला जाऊ शकतो आणि यावेळी कंपनी पूर्णपणे बेजल लेस फोन आणेल. या फोन बद्दल अजूनतरी जास्त माहिती नाही पण कदाचित नवीन मॉडेल मध्ये कंपनी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर देऊ शकते.
वीवो ने काही दिवसांपूर्वी चीन मध्ये नेक्स डुअल डिस्प्ले एडिशन मॉडेल सादर केला आहे. या फोन मध्ये दोन स्क्रीन आहेत. आशा आहे कि हा फोन लवकरच भारतात पण उपलब्ध होईल. फोनच्या मागील पॅनल मध्ये तीन कॅमेरा आहेत आणि यात सेल्फी कॅमेरा नाही. सेल्फी साठी फोनच्या बॅक स्क्रीनचा वापर करता येतो. वीवो नेक्स डुअल डिस्प्लेच्या फ्रंट पॅनल मध्ये 6.39-इंचाची सुपर एमोलेड स्क्रीन आहे जी 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह येते. तसेच मागील पॅनल वर पण कंपनी ने सुपर एमोलेड असलेला डिस्प्ले दिला आहे. मागील डिस्प्ले 5.49-इंचाचा फुल एचडी स्क्रीन आहे. फोन मध्ये 10जीबी रॅम मेमरी आहे. जुन्या नेक्स प्रमाणे हा पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर चालतो. यात 2.8गीगाहट्र्ज क्रोयो आर्किटेक्चर असलेला ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. फोन मध्ये 3,500 एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.
ओपो एफ11
ओपो दरवर्षी आपल्या फ्लॅगशिप एफ सीरीज मध्ये नवीन फोन लॉन्च करते. गेल्यावर्षी कंपनी ने एफ9 आणि एफ9 प्रो सादर केले होते. यावर्षी एफ11 ची चर्चा आहे. आता पर्यंत जी माहिती समोर आली आहे त्यानुसार हा फोन चार रियर कॅमेऱ्यासह सादर केला जाऊ शकतो. इतकेच नव्हे तर वाटर ड्रॉप डिस्प्ले नंतर या फोन मध्ये आता पंच होल नॉच दिली जाऊ शकते. आता पर्यंत जी माहिती मिळाली आहे त्यानुसार ओपो एफ11 मध्ये 6.5-इंचाचा फुल बेजल लेस डिस्प्ले असेल. तसेच हा फोन क्वालकॉमच्या ताकदवान चिपसेट सह येईल.



























