टेलीकॉम सेक्टरमध्ये आपले अनेक ग्राहक गमावल्यानंतर देखील Vodafone idea नवनवीन प्लॅन लाँच करत आहे. आता कंपनीनं एक नवीन प्लॅन सादर केला आहे, ज्याची किंमत 401 रुपये आहे. कंपनीनं हा प्लॅन पोस्टपेड ग्राहकांसाठी सादर केला आहे. याची खासियत म्हणजे यात Sun NXT चं प्रीमियम एचडी सब्सक्रिप्शन दिलं जात आहे. म्हणजे यात मराठी, तामिळ, मल्याळम, तेलुगु आणि कन्नड भाषांचा कंटेंट ऑनलाइन पाहता येईल. तसेच ग्राहकांना फ्री कॉलिंग, डेटा आणि एसएमएसचा लाभ दिला जात आहे. पुढे सविस्तर जाणून घेऊया वोडाफोन आयडियाच्या या नवीन पोस्टपेड प्लॅन मध्ये मिळणाऱ्या सर्व बेनिफिट्सची माहिती.
Vi Rs 401 postpaid plan चे फायदे
Rs 401 Vodafone postpaid plan बद्दल बोलायचं झालं तर हा एक मासिक प्लॅन आहे, ज्यात युजर्सना एकूण 50GB 4G डेटा मिळेल. तसेच यात महिन्याला 3,000 SMS दिले जात आहे. तसेच ग्राहक सर्व नेटवर्कवर फ्री आणि अमर्याद कॉलिंग करू शकतात. तसेच ग्राहकांना पहिल्या महिन्यात 50GB अतिरिक्त डेटा देखील मिळेल परंतु, यासाठी तुम्हाला हा प्लॅन ऑनलाइन घ्यावा लागेल. त्याचबरोबर युजर्स जो डेटा रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत वापरतील तो मेन डेटा बॅलेन्स मधून कट केला नाही नाही, म्हणजे मर्यादा 4G डेटा या कालावधीत मोफत वापरता येईल. हे देखील वाचा: कोणत्या POCO फोनला कधी मिळेल MIUI 14 अपडेट; इथे पाहा मोबाइल्सची नावे आणि रोलआउट शेड्यूल
ओटीटी बेनिफिट्
ग्राहकांना 12 महिन्यासाठी Sun NXT Premium subscription मिळेल. यात युजर्स चित्रपट, टीव्ही, शो आणि म्यूजिक व्हिडीओ वेगवेगळ्या भाषांमध्ये बघू शकतील. ही सर्व्हिस एकावेळी दोन स्क्रीनवर अॅक्सेस करता येईल. याचा अर्थ ग्राहक एकावेळी मोबाइल फोन आणि एका स्मार्ट टीव्हीमध्ये मराठी, तामिळ, मल्याळम, तेलुगु आणि कन्नडमधील कंटेंट बघू शकतील. हे देखील वाचा: अत्यतं कमी किंमतीत 32MP सेल्फी कॅमेरा; Tecno Spark 10 Pro जबरदस्त फीचर्ससह लाँच
इतकेच नव्हे तर या रिचार्जमध्ये विआय मूव्ही आणि टीव्ही अॅपसाठी VIP अॅक्सेस मिळेल. विशेष म्हणजे Vi अॅप मध्ये Hungama music स्ट्रीमिंग, Sony LIV, Zee5 Premium मूव्ही आणि TV shows आणि काही गेम देखील खेळता येतील. तसेच जर या प्लॅन मधील तुमचा मोबाइल डेटा उरला तर पुढील महिन्यात 200GB पर्यंत डेटा रोलओव्हर करता येईल.