लॉन्चच्या आधीच समोर आली Nokia 3.4 ची किंमत आणि स्पेसिफिकेशन, लो बजेट मध्ये करेल धमाकेदार एंट्री

Nokia येत्या काही दिवसांत अनेक स्मार्टफोन्स टेक मार्केट मध्ये आणू शकते. यात Nokia 2.4, Nokia 3.4 सारख्या स्वस्तातल्या स्मार्टफोन्स सोबतच Nokia 6.3 आणि Nokia 7.3 सारख्या मिड बजेट स्मार्टफोन्सचा पण समावेश असेल. वेळोवेळी या मोबाइल्स संबंधित लीक्स समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी यातील एक नोकिया 3.4 ची रेंडर ईमेज इंटरनेट वर लीक झाली होती, ज्यावरून फोनच्या डिजाईनची माहिती मिळाली होती. आता Nokia 3.4 चे स्पेसिफिकेशन्स पण समजले आहेत.

Nokia 3.4 चे हे स्पेसिफिकेशन्स नोकिया पावर यूजर द्वारे शेयर करण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर सादर केला जाईल जो 720 x 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. समोर आलेल्या फोटो मध्ये दाखवण्यात आले होते कि नोकिया 3.4 ची दोन्ही बाजूंनी बेजल लेस असेल तर खालच्या बाजूला बारीक चिन पार्ट असेल. डिस्प्लेच्या वरच्या बाजूला डावीकडे पंच-होल दिला जाईल.

हे देखील वाचा: स्वस्त JioPhone ला टक्कर देण्यासाठी येत आहे Nokia 4G फीचर फोन, असतील हे फीचर्स

नोकिया 3.4 एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च केला जाईल ज्यात प्रोसेसिंगसाठी 2.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमचा 460 चिपसेट मिळू शकतो. लीकनुसार हा फोन 3 जीबी रॅम मेमरी वर लॉन्च केला जाईल जो मार्केट मध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज आणि 64 जीबी इंटरनल स्टोेरेजच्या दोन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. या दोन्ही वेरिएंट्स मध्ये स्टोरेज माइक्रोएसडी कार्डने 512 जीबी पर्यंत वाढवता येईल.

Nokia 3.4 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असल्याचे समोर आले आहे जो वर्तुळाकार असेल. या सेटअप मध्ये 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसर सह 5 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे इतर सेंसर मिळतील. लीकनुसार नोकियाचा हा स्मार्टफोन सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

हे देखील वाचा: Nokia 9.3 PureView च्या डिजाईनचा खुलासा, या फोन मध्ये मिळेल 108 MP + 64 MP चा क्वॉड कॅमेरा

Nokia 3.4 डुअल सिम फोन असेल जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करेल. फोटो मध्ये फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर दाखवण्यात आला आहे, आशा आहे कि हा डिवाईस फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करेल. तसेच पावर बॅकअपसाठी नोकिया 3.4 मध्ये 4,000एमएएच ची बॅटरी असल्याचे लीक मध्ये सांगण्यात आले आहे. लीकनुसार हा नोकिया फोन Purple, Grey आणि Blue कलर मध्ये लॉन्च होईल. Nokia 3.4 बद्दल बोलले जात आहे कि फोनच्या बेस वेरिएंटची किंमत £129.60 म्हणजे जवळपास 12,700 रुपये असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here