Vi ने लाँच केला 599 रुपयांचा प्लॅन! 110GB डेटासह अनलिमिटेड कॉल्स आणि ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस

Highlights

  • Vodafone idea ने 599 रुपयांचा पोस्टपेड फॅमली प्लॅन सादर केला आहे.
  • प्लॅनमध्ये ओटीटी अ‍ॅप्स, डेटा आणि फ्री कॉलिंगचा फायदा मिळेल.
  • ग्राहकांना प्लॅनमध्ये 200जीबी डेटा रोल ओव्हर देखील वापरता येईल.

टेलीकॉम कंपनी वोडाफोन आयडियानं आपल्या प्रीपेड व पोस्टपेड ग्राहकांसाठी नवीन प्लॅन सादर केला आहे. अलीकडेच विआयचा 181 रुपयांच्या डेटा रिचार्ज प्लॅन सादर करण्यात आला होता. तर आता पोस्टपेड ग्राहकांना खुश करत कंपनीन 599 रुपयांचा प्लॅन मार्केटमध्ये गुपचुप सादर केला आहे. यात अनलिमिटेड कॉलिंग, भरपूर डेटा आणि अनेक ओटीटी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस दिला जातो. पुढे आम्ही या नवीन पोस्टपेड प्लॅनची सविस्तर माहिती दिली आहे.

पोस्टपेड प्लॅनमध्ये मिळतील हे फायदे

कंपनीनं सादर केलेला हा पोस्टपेड प्लॅन दोन कनेक्शनसाठी वापरता येऊ शकतो. यात एकूण 110GB डेटा सह 200GB डेटा रोलओव्हर, अनलिमिटेड कॉल्स आणि फ्री एसएमएसचा फायदा मिळेल. पुढे आम्ही प्रायमरी आणि सेकंडरी मेंबर्सना मिळणाऱ्या बेनीफिट्सची माहिती दिली आहे.

प्रायमरी मेंबर्सना मिळतील हे फायदे

  • अनलिमिटेड कॉल्स
  • 40+30जीबी डेटा
  • 200जीबी डेटा रोल ओव्हर

सेकंडरी मेंबर्सना मिळणार फायदे

  • अनलिमिटेड कॉल्स
  • 40जीबी डेटा
  • 200जीबी डेटा रोल ओव्हर
  • 3000 SMS/मंथली

अतिरिक्त बेनिफिट्स

फक्त प्रायमरी ग्राहक प्लॅनमध्ये 6 महिन्यांचे अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरशिप सब्सक्रिप्शन मोफत मिळेल. तसेक 499 रुपयांचे एक वर्षाचे Disney+ Hotstar मोबाइल सब्सक्रिप्शन देखील या प्लॅनसह मिळत आहे, जे फक्त प्रायमरी मेंबरसाठी असेल. प्लॅनमध्ये दोन्ही मेंबर्ससाठी Vi Movies & TV VIP अ‍ॅक्सेस, प्रीमियम मूव्ही फुल अ‍ॅक्सेस, ओरिजनल, लाइव्ह टीव्ही आणि अनेक अ‍ॅपचा मोफत अ‍ॅक्सेस मिळेल. सर्व मेंबर्स Vi Movies & TV App च्या माध्यमातून ZEE5 प्रीमियम मूव्ही आणि शो कंटेंट बघू शकतील. विआय अ‍ॅप मध्ये सर्व मेंबर्ससाठी 6 महीने अ‍ॅड-फ्री हंगामा म्यूजिकचा अ‍ॅक्सेस दिला जात आहे. दोन्ही मेंबर्स वी अ‍ॅप वर 1000 पेक्षा जास्त गेम्स खेळू शकतील आणि दर महिन्याला 5 गोल्ड गेम्स मोफत पण मिळतील.

599 रुपयांमध्ये एयरटेलचा पोस्टपेड प्लॅन

एयरटेलचा 599 रुपयांचा प्लॅन देखील अलीकडेच आला होता. या प्लॅनमध्ये 100 फ्री SMS आणि अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा रोलओव्हर बेनिफिटसह एकूण 75GB डेटा दरमाह मिळतो. तसेक युजर्सना 6 महिन्यासाठी Amazon Prime सब्सक्रिप्शन, 1 वर्षाचे Disney+ Hotstar Mobile सब्सक्रिप्शन, फ्री हँडसेट प्रोटेक्शन प्लॅन दिला जात आहे. इतकेच नव्हे तर प्लॅनमध्ये नियमित कनेक्शनसह अनलिमिटेड कॉलिंगसह एक फ्री अ‍ॅड-ऑन कनेक्शन देखील घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here