Vivo पुढल्या आठवड्यात घेऊन येत आहे आपला सर्वात ताकदवान 5G फोन, टीजर आला समोर

चिनी स्मार्टफोन कंपनी वीवो बद्दल एक अशी बातमी समोर येत आहे, ज्यामुळे तिचे फॅन्स खुश होतील. कंपनीने शांघाई मध्ये 26 जून पासून सुरु होणाऱ्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस मध्ये नवीन 5G फोन लॉन्च कारण्याबद्दल टीजर जारी केला आहे. हा टीजर इशारा करत आहे कि कंपनी आपला 5G फोन पुढल्या आठवड्यात सादर करणार आहे.

चिनी माइक्रोब्लॉगिंग वेबसाइट वर कंपनीने टीजर जारी केला आहे. या टीजर मध्ये कंपनीने ‘गिव मी 5’ च्या टॅगलाइन सह एक पोस्टर शेयर केला आहे. या इवेंट मध्ये कंपनी एखादा 5G फोन समोर ठेवेल कि मग एखादी 5G टेक्नॉलजी दाखवेल हे माहित नाही.

विशेष म्हणजे 26 जून पासून शांघाई मध्ये मोबाईल वर्ल्ड कांग्रेसची सुरवात होत आहे. या इवेंट मध्ये 5G, होम ऑटोमेशन आणि AI वर कंपन्यांचे लक्ष असेल. या इवेंट मध्ये अनेक चाइनीज कंपन्या भाग घेतील. आशा आहे यात अनेक नवीन डिवाइस पण सादर केले जातील.

हि चिनी कंपनी अनेक दिवसांपासून 5जी फोन वर काम करत आहे, पण असे बोलले जात आहे कि हा फोन पुढच्यावर्षी लॉन्च केला जाईल. आता हा टीजर बघून बोलले जात आहे कि पुढल्या आठवड्यात होणाऱ्या इवेंट मध्ये कंपनी आपल्या 5G फोनची घोषणा करू शकते.

विशेष म्हणजे गेल्या वर्षी चीन मध्ये शिनुआ न्यूज एजेंसी मीडिया कॉफ्रेंसचे आयोजन केले गेले होते. या कॉफ्रेंस मध्ये अनेक टेक कंपन्या आपल्या टेक्नॉलॉजी आणि डिवाईसेजचे प्रदर्शन करत होत्या आणि या कॉफ्रेंस मध्ये वीवो च्या 5जी सपोर्ट वाल्या स्मार्टफोन वीवो नेक्स 5जी चा पण एक स्टॉल प्रदर्शित करण्यात आला होता. खास बाब अशी कि वीवो नेक्स 5जी चे प्रदर्शन स्वतः वीवो नाही तर चिपसेट बनवणाऱ्या दिग्गज कंपनी क्वालकॉमने केले होते.

सोर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here