Exclusive: Vivo S1 चा 6GB + 64GB वेरिएंट झाला बंद

Vivo S1 स्मार्टफोन कंपनीने गेल्यावर्षी ऑगस्ट 2019 मध्ये लॉन्च केला होता. डिवाइस तीन वेरिएंट-4GB + 128GB, 6GB + 64GB आणि 6GB + 128GB स्टोरेज मध्ये सादर केला होता. आता 91mobiles ला रिटेल सोर्सकडून एक्सक्लूसिव माहिती समोर आली आहे कि Vivo S1 6GB + 64GB मॉडेल डिस्कंटीन्यू केला गेला आहे. या डिवाइसची किंमत काही दिवसांपूर्वी कमी करण्यात आली होती.

स्टॉक असे पर्यंत Vivo S1 6GB + 64GB मॉडेल ची विक्री केली जाईल. त्यानंतर मार्केट मध्ये Vivo S1 4GB + 128GB आणि 6GB + 128GB मॉडेल क्रमश: 16,990 रुपये आणि 18,990 रुपयांमध्ये विकले जातील.

स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.38-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने हा 19.5:9 आसपेक्ट रेशियो सह सादर केला आहे. तसेच लॉन्चच्या वेळी हा फोन जगातील पहिला फोन होता जो मीडियाटेक हेलियो पी65 चिपसेट वर सादर केला गेला होता आणि फोन मध्ये 2.0 गीगाहट्र्ज् चा ऑक्टाकोर प्रोसेसर आहे.

फोटोग्राफीसाठी वीवो एस1 मध्ये तीन रियर कॅमेरा देण्यात आले आहेत. मागे एफ/ 1.78 अपर्चर असलेला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. त्याचबरोबर एफ/ 2.2 अपर्चर असलेली वाइड-अँगल लेंस, 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि एफ/ 2.4 अपर्चर असलेला 2-मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फीसाठी फोन मध्ये एफ/ 2.0 अपर्चर असलेला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

कनेक्टिविटी बद्दल बोलायचे तर या फोन मध्ये डुअल सिम सह वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, यूएसबी ओटीजी आणि जीपीएस आहेत. तसेच पावर बॅकअपसाठी कंपनीने यात 4,500 एमएएच ची बॅटरी दिली आहे. एंडरॉयड 9 पाई आधारित हा फोन कलर ओएस वर चालतो.

वीवो एस1 वीडियो

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here