आज पासून सुरु झाली Vivo S1 ची प्री बुकिंग, मिळत आहे 2,500 रुपयांपर्यंतची कॅश बॅक ऑफर

तुम्हाला तर माहितीची आहे कि Vivo S1 भारतात 7 ऑगस्टला लॉन्च केला जात आहे. परंतु आज पासूनच कंपनीने याची प्रीबुकिंग सुरु केली आहे. एस1 प्रामुख्याने ऑफलाइन स्टोर वर उपलब्ध होईल आणि आज पासून स्टोर वर जाऊन तुम्ही तुमचा फोन बुक करू शकता. 91मोबाईल्सला याची एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे ज्यानुसार या फोनचा सेल 7 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजता सुरु होईल आणि ज्या लोकांनी फोनची प्री-बुकिंग केली असेल त्यांना खास ऑफर पण दिली जाईल. कंपनी फोन वर पे टीएम कॅश बॅक व्यतिरिक्त एचडीएफसी आणि इन्स्टा कॅशबॅक ऑफर पण देत आहे. Vivo S1 ची हि प्रीबुकिंग 1 ऑगस्ट पासून सुरु होऊन 7 ऑगस्ट पर्यंत चालेल. जर तुम्ही या फोनची प्री-बुकिंग करू इच्छित असाल तर तुम्हाला सुरवातीला 2,000 रुपये द्यावे लागतील.

कंपनी Vivo S1 च्या 4जीबी रॅम आणि 128जीबी मेमरी मॉडेल साठी प्री-बुकिंग घेत आहे. जरी कंपनीने अजून किंमतीबद्दल कोणतीही माहिती दिली नसली तरी इतके जरूर सांगितले आहे कि उद्यापासून जवळपास सर्व वीवो पार्टनर स्टोर वर लाइव डोमो साठी फोन उपलब्ध होईल. ज्या लोकांनी फोनची प्रीबुकिंग केली असेल त्या 2,500 रुपयांपर्यंतचे पेटिएम कॅश कूपन मिळेल. तसेच एचडीएफसी बॅंकेचे क्रेडिट किंवा डेबीट कार्ड वापरल्यास 7.5 टक्क्यांचा कॅशबॅक मिळेल. तसेच 10 टक्के इंस्टाकॅश ऍप वॅल्यू पण दिली जाईल.

हे देखील वाचा: Samsung Galaxy A सीरीजच्या 9 स्मार्टफोन्सचे झाले पेटेंट फाईल, बघा यांची नावे

Vivo S1 चे स्पेसिफिकेशन

वीवो एस1 च्या ग्लोबल वेरिएंट मध्ये 6.38-इंचाचा फुल-एचडी+ (1080×2340 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन मीडियाटेक हीलियो पी65 प्रोसेसर आणि 4 जीबी रॅम सह येतो. फोन मध्ये 128जीबी ची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी फोनच्या मागे तीन कॅमेरा आहेत. मागे एफ/ 1.78 अपर्चर वाला 16-मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर आहे. सोबतच एफ/ 2.2 अपर्चर वाला वाइड-एंगल 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा आणि एफ/ 2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा तीसरा सेंसर आहे. तसेच वीडियो कॉलिंग आणि सेल्फी साठी फोन मध्ये एफ/ 2.0 अपर्चर वाला 32-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

हे देखील वाचा: 4500एमएएच बॅटरी आणि 48एमपी ट्रिपल रियर कॅमेऱ्या सह लॉन्च झाला Vivo Z5

कनेक्टिविटी फीचर मध्ये वाई-फाई, ब्लूटूथ 5, यूएसबी ओटीजी, माइक्रो-यूएसबी आणि जीपीएस आहे. पावर बॅकअप साठी कंपनीने यात 4,500 एमएएच ची बॅटरी दिली आहे. सोबतच हा फोन एंडरॉयड 9 पाई वर आधारित फनटच ओएस 9 वर चालतो.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here