31 मेला चीनमध्ये लाँच होईल Vivo S17 सीरीज, 50MP सेल्फी कॅमेऱ्यासह होऊ शकते एंट्री

Highlights

  • सीरीजमध्ये Vivo S17 आणि Vivo S17 Pro चा समावेश केला जाऊ शकतो.
  • फोन्समध्ये कर्व्ड एजसह 6.78-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो.
  • ह्या सीरीजमध्ये S17e आधीच लाँच करण्यात आला आहे.

Vivo नं अखेरीस आपल्या S17 सीरीजच्या चायना लाँच डेटची घोषणा केली आहे. कंपनीनं चीनच्या सोशल मीडिया साइट Weibo च्या माध्यमातून घोषणा केली आहे़, जिथे सांगण्यात आलं आहे की 31 मेला ही सीरीज लाँच केला जाईल. माहितीनुसार ह्या सीरीजमध्ये Vivo S17 आणि Vivo S17 Pro सह दोन फोन सादर केले जातील. लीक्सनुसार, Vivo S17 मध्ये स्नॅपड्रॅगन 782 प्रोसेसर आणि S17 Pro मध्ये डायमेन्सिटी 8200 प्रोसेसर दिला जाऊ शकतो.

विवो एस17 आणि एस17 प्रो चे स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

डिस्प्ले : लिक्सनुसार S17 आणि S17 मध्ये कर्व्ड एज एचडी+ आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला 6.78-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळू शकतो.

प्रोसेसर : S17 मॉडेलमध्ये Snapdragon 782 प्रोसेसर आणि S17 Pro व्हेरिएंटमध्ये Dimensity 8200 चिपसेट मिळू शकतो.

रॅम व स्टोरेज : Vivo S17 कंपनी 8GB/12GB रॅम व 128GB/256GB इंटरनल स्टोरेजसह सादर करू शकते. तसेच, S17 Pro मध्ये 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज दिली जाऊ शकते.

कॅमेरा : S17 मध्ये ओआयएस सपोर्टसह 64MP प्रायमरी कॅमेरा आणि S17 Pro मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा असू शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन्समध्ये 50MP चा कॅमेरा मिळू शकतो.

बॅटरी : S17 मध्ये 66 वॉट फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी आणि S17 Pro मध्ये 4,600mAh ची बॅटरी 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येऊ शकते.

विवो एस17 सीरीज इंडिया लाँच?

ही स्मार्टफोन सीरीज सर्वप्रथम चायना मध्ये लाँच होईल जी नंतर भारतात येऊ शकते. आशा आहे की येत्या जून मध्ये Vivo S17 series चे सर्व स्मार्टफोन्स बाजारात येतील. सध्या कंपनीनं अधिकृतपणे याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.

विवो एस17ई उपलब्ध आहे बाजारात

कंपनीनं काही दिवसांपूर्वी चीनमध्ये Vivo S17e स्मार्टफोन सादर केला होता. ह्यात 6.78-इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले फुल HD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. तसेच ह्यात ऑक्टा-कोर Dimensity 7200 प्रोसेसर आहे.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here