Vivo S17t मध्ये मिळेल Dimensity 8050 प्रोसेसर, लीक झाली महत्वाची माहिती

Highlights

  • Vivo S17 सीरीजमध्ये येऊ शकतो Vivo S17t स्मार्टफोन
  • TENAA लिस्टिंगवर पण दिसला आहे डिवाइस
  • Vivo S17 मॉडेलशी मिळते जुळते असू शकतात फीचर्स

मोबाइल निर्माता Vivo सध्या आपल्या Vivo S17 सीरीजसाठी चर्चेत आहे. ह्या सीरीज अंतगर्त कंपनी Vivo S17 आणि Vivo S17 Pro स्मार्टफोन घरच्या बाजार चीनमध्ये सादर करणार आहे. ह्या दोन्ही फोनची एंट्री 31 मेला होणार आहे. तसेच ह्या सीरीजमध्ये एक नवीन मॉडेल Vivo S17t येऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे. तसेच Vivo S17t TENAA लिस्टिंगवर देखील दिसला होता. त्याचबरोबर ताज्या लीकमधून स्मार्टफोनच्या प्रोसेसरचा खुलासा झाला आहे. चला जाणून घेऊया Vivo S17t स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या स्पेसिफिकेशनची माहिती.

Vivo S17t मध्ये मिळेल Dimensity 8050 प्रोसेसर

विवोच्या Vivo S17t डिवाइस बद्दल टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं स्पेसिफिकेशनचा खुलासा केला आहे. त्याने सांगितलं आहे की डिवाइसमध्ये Dimensity 8050 प्रोसेसर दिला जाईल. ह्या प्रोसेसरची माहिती प्राइस बाबाच्या रिपोर्टमध्ये देखील देण्यात आली आहे. तसेच रिपोर्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की फोनचे इतर स्पेसिफिकेशन Vivo S17 सीरीजच्या Vivo S17 मॉडेलशी मिळतेजुळते आहेत.

Vivo S17t चे स्पेसिफिकेशन्स संभाव्य

डिस्प्ले : विवोच्या Vivo S17t स्मार्टफोनमध्ये 6.74 इंचाचा 1.5K+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ज्यात 120Hz रिफ्रेश रेट मिळेल.

प्रोसेसर : ताज्या लीकनुसार Vivo S17t मध्ये Dimensity 8050 प्रोसेसर असू शकतो.

स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 12 जीबी पर्यंत LPDDR4x रॅम आणि 512 जीबी पर्यंत UFS 3.1 स्टोरेज मिळू शकतो.

कॅमेरा : कॅमेरा फीचर्स पाहता डिवाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यात OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सलची Sony IMX766V प्रायमरी कॅमेरा लेन्स आणि 8 मेगापिक्सलची IMX355 अल्ट्रा वाइड अँगल लेन्स मिळेल. तसेच, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी देखील फोन 50 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा लेन्ससह येऊ शकतो.

बॅटरी : बॅटरी पाहता Vivo S17t डिवाइसमध्ये 4600 एमएएचची बॅटरी आणि 80W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळेल.

सुरक्षा : सुरक्षेसाठी डिवाइसमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सारखे फीचर्स दिले जातील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here